पहिला पाउस
पहिला पाउस बालमनाचा
कागदी होडया वल्हवण्याचा
बेडका मागे धावण्याचा
डबक्यामध्ये डुंबण्याचा
आईच्या कोरड्या पदराचा
ओला स्पर्श ममतेचा.
पहिला पाउस तरुण मनाचा
मस्ती - मौजेच्या झर्याचा
स्वप्नाच्या कोवळ्या पालवीचा
प्रेम धाराना अंगावर झेलण्याचा
प्रितीमध्ये न्हाउन निघण्याचा
पहिला पाउस वृद्ध मनाचा
ब्लॅकेटमध्ये लपेटण्याचा
कांदा भजी अन गरम चहाचा
वाकड्या दांड्याच्या घत्रीचा
आठवणींच्या पागोळ्यांचा
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
