फेनॉमेनल मिपाकट्टा
रामराम्स .. रामराम्स !! (णको .. णमस्कार्स लै बोर झालं)
काल बराच पाउस झाला नै ? लाईटही गेली .. करायला काही नव्हतं .. धम्याची धमी देखील नव्हती घरी .. त्यामुळे धम्या जाम पकला होता ... सगळी कामं हातानी करावी लागत होती .. किमान जेवणाचं तरी बाहेर होईल ह्या आशेनं त्याने कट्टा आयोजित केला .. (उसातनं आलेले) सुर्य .. मी .. आणि धम्या .. आणि जर खरडवह्या उचकण्यातून वेळ भेटला तर पर्या येणार होता ...
लाईट गेल्यामुळे आपला लॅपटॉप वर "नाईट ट्रेन" नावाचा "के व ळ अ प्र ति म" मिस्ट्रीपट पहात होतो .. सहाला धम्याचा फोन वाजला .... म्हंटलं आता निघायला हवं .. साडेसहाला निघालो .... पावसाची रिपरिप होती ..
मिसळपाव