सारेगमप महा विजेता - कार्तिकी गायकवाड
कालच रात्री सारेगमप चा शेवटला एपिसोड पाहिला. शेवटी निकाल एकदम अनपेक्षीत लागला. ह्या कार्यक्रामामधे काय काय घडले ते इथे साग्र संगित लिहिले आहे.. जरुर वाचा आणि आपल्या कॉमेंट्स पोस्ट करा.
मी संपुर्ण कार्यक्रामावर काहितरी खरडलंय.. वाचा आणि कॉमेंट्स द्या..
असॉ, हे काही जरी असलं तरी कार्तिकी च्या विजयाचे महत्व कमी होत नाही.
कार्तिकी जिंकली!
झी मराठी च्या सारेगमप स्पर्धेत कार्तिकी गायकवाड अंतिम विजेती ठरली.
कार्तिकीला मन:पूर्वक शुभेच्छा!! :)
अमृतराय झोपडीत का गेला?
सतराव्या शतकात होऊन गेलेल्या अमृतराय नावाच्या पंतकवीसंबंधी एक चर्चा उपक्रमावर वाचनात आली.
'कटाव' ह्या काव्य प्रकाराबद्दल ते प्रसिद्ध होते असे मला त्यातून समजले.
ते असो. सांगायचा मुद्दा हा की तिथला त्यांचा कटाव वाचून त्यांची बायकोबद्दलची तक्रार समजली की सतत बडबडणारी, खाणारी आणि वेगवेगळ्या वस्तू मागत रहाणार्या कजाग पत्नीला वैतागून अमृतराय झोपडीत रहायला गेले.
ते कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो!
वोह कागज की कश्ती वोह बारीश का पानी
आई मला पि.एस्.पी. हवाय, माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडे आहे तो. ''ओन्ली आय डोन्ट हॅव इट". इति माझा ६ वर्षाचा मुलगा.
'अरे पण काही महिन्यांपुर्विच आपण तूला गेमबॉय घेतला ना, तो खेळ ना " इति मी
'अग आई गेमबॉय आता आउटटेड झाला, मला पि.एस्.पी. च हवा. त्यावर वेगळे गेम्स आहेत.' इति माझा ६ वर्षीय मुलगा.
इथे दुबईमधे शुक्रवार शनिवार हे जे सुट्टीचे वार असतात, तेव्हाच काय ते मुलांना एखाद्या क्लब ची वैगरे मेम्बरशीप घेउन बॅडमिंटन, टेनिस अथवा इतर तत्सम जे सोकॉल्ड साहेबी खेळ आहेत ते खेळायला घेउन जाउ शकतो. एरवी शाळा असतांना बाहेर कुठेही मैदानी खेळ खेळायला मुलांना जाता येत नाही. वेळच नसतो.
कवि भूषण
फार पूर्वी मी साधारण साहवी/सातवीत (३० वर्षा पूर्वी) जोधपूर (राजस्थान) ला शिकत असताना माझ्या हिन्दी च्या शिक्षकानी कवि भूषण ची शिवाजी महाराजा वर एक कविता (पाठ्यक्र्मात नसताना) शिकविली होती. त्यात महाराज युध्दाला निघतानाचे वर्णन आहे. आता ती कविता मला पूर्ण आठवत नाही.
कवितेचा अर्थ थोडाफार आठवतो. महाराजा ची चतुरंग सेना युध्दात विजय मिळविण्यासाठी निघाली आहे. रस्त्यात लागणारे ओढे, नद्या, नाले, झाडे, दगड, सगळे त्या सैन्याच्या जोषात सामिल होउन डोलतायेत, नाचतायेत.
कविता जशी आठवतेय तशी लिहितोय. चुकण्याची अगर शब्द फेर फार ची दाट शक्यता आहे.
गाय
आपण गायीला देव मानता का?
एक वेडी आशा
एक वेडी आशा
एक वेडी आशा
कुठेतरी मनात जन्मत असते प्रत्येकाच्या
कधीतरी बदलेल हे सारे
कधी ना कधी होईल की
सारे गोडच गोड छान
सिनेमातल्या सारखं
रोज सकाळी नव्याने जन्मते
अन रोज रात्री मिटुन जाते
लाजळुच्या पानासारखी
प्रत्येकजण जपत असतो तिला
अगदी जीवापाड
स्वतःच्या लेकीप्रमाणे
जोवर तिला धक्का पोचत नाही
तोवर नि तोवरच तो उभा असतो
अगदी ठामपणे
एखाद्या वटवॄक्षासारखा
म्हणून त्यावर घाव घालू नका
तुमची कुर्हाड तुटेल
नाहीतर तो उन्मळून पडेल
एखाद्या छोट्याश्या फांदीसारखा
जपा अगदी मनापासून जपा तिला
कारण ती आहे वेडी आशा
तुमची, माझी, प्रत्येकाची
एक वेडी आशा
-- ज्ञानदा कुलकर्णी
मी माझ्यातच संतुष्ट आहे.
"माझ्या अशुद्ध बोलण्याच्या पद्धतीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही फरक झालेला नाही.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं."
मी एकदा एका लायब्ररीत पुस्तकं चाळीत बसलो होतो.दोन तीन पुस्तकं मला आवडली आणि वाचायला न्याविशी वाटली.ती घेऊन मी काऊंन्टरवर गेलो.काऊंटरवर बसलेली व्यक्ति मला जरा वयाने लहान वाटली.मी कुतुहलाने त्याला विचारलं,
"तू शाळेत शिकत असशिलच."तो हो म्हणाला.
मिसळपाव