तुला हसताना पाहिलं की.......
तुला हसताना पाहिलं
की वठलेल्या झाडाला पालवई फुटते
आणि वर्षभर कोरडी असणारी नदी
दुथडी भरुन वाहू लागते
तुला हसताना पाहिलं
की भर ग्रिष्मात वसंत अवतरतो
पावसाची चाहूल लागण्या आधीच
मोर पिसारा फुलवून नाचतो
तुला हसताना पाहिलं
की त्या मेघालाही पाझर फुटतो
इंद्रधनू तर चोहिकडे
सप्तरंग उधळीत फिरतो
तुला हसताना पाहिलं
की फुलं हसू लागतात
सर्व पक्षी जणू
तुझ्यासाठीच गाणे गातात
तुला हसताना पाहिलं
की तो चंद्र तुझ्या रुपावर जळू लागतो
आणि मी मात्र तुझ्या प्रेमात
चिंब होऊन भिजून जातो.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
साहित्य :
लोणी (बटर) : १०० ग्रॅम
रिकोटा चीझ : ४२५ ग्रॅम (Ricotta cheese)
मिल्क पावडर : ४२५ ग्रॅम
साखर :३०० ग्रॅम
कृती :
प्रथम एका भांड्यात( नॉनसस्टिक्) लोणी गरम करावे.
लोणी वितळल्यावर त्यात रिकोटा चीझ घालावे.
तेही छान वितळल्यावर त्यात मिल्क पावडर घालुन एकजिव करुन घ्यावे.
मग त्यात साखर घालावी.
मिश्रण सतत हलवत रहावे. ते भांड्यापासुन सुटु लागले की ताटलीत काढावे. (त्याचा घट्ट गोळा होत नाही.
-भटोबा