Skip to main content

तू अशी स्वप्नात माझ्या

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 16/09/2008 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू अशी स्वप्नात माझ्या तू अशी स्वप्नात माझ्या येऊ नको ग साजणी कस्तुरीचा गंध उधळित नकोस जाऊ कामिनी !!धृ !! तव तेजाच्या प्रकाश किरणी फूल मनाचे उमलून आले मावळतीला मिटू नको ग सूर्यफूलांचा बहर घेऊनी !! तुझ्या स्वराच्या हिंदोळ्यावर शब्द माझे बांधले मी गीत ते आकाशवेडे गाऊ आपण दोघे मिळोनी !! नेंणीवेच्या काठावरुनी बोलाविशी तू चंचले बोलाविले गे मी तुला सत्यात अन् जागेपणी !! ------------------------------------------ कवयित्री - सौ. उज्वला केळकर. - सांगली

गणेशोत्सव जपानमधला

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 16/09/2008 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
जपानमधील गणेशोत्सवाची काही छायचित्रे पाठ्वीत आहे. तोक्योमधील ग्योतोकुला भारतीयांनी एकत्र येउन गणेशोत्सव साजरा केला, ही विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे श्रींची मुर्ती हा कार्यक्रम हवाच !!!

पटकन एक छोटीशी

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 16/09/2008 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी दिवसात मिपावर आलो नाही. यायला मिळाले तेही ओझरते. आज कुठूनसा एक अर्धा तास हाती लागला. "किती चातक-चोचीने प्यावा वर्षा ऋतु तरी " अशी अवस्था. म्हण्टले मिळालेला वेळ कारणी लावावा. खूप पूर्वी एक कविता नेटावर वाचली होती. तिचे हे भाषांतर. मूळ कवितेच्या कवीचे नाव "शेल्टन" असे आहे. केरळमधला एक माणूस. कविता मला खूप आवडली होती - अजूनही खूप आवडते.
Taxonomy upgrade extras

वाटले की शेवटी होकार झाला

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 16/09/2008 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
****************** वाटले की शेवटी होकार झाला - का विचारे मी पुन्हा इन्कार झाला? *** जो कवी आनंद होता वांझ होता घात होता तो बघा फनकार झाला! *** ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला. *** काल रात्री काजव्याला देखिले ज्या काळरात्री तो जणू अंगार झाला. *** धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला. *** होत गेला हो जयाला पारखा जो होउनी आराध्य तो साकार झाला. ******************
-धनंजय (सप्टेंबर १५, २००८)
Taxonomy upgrade extras

मराठीतील अजरामर गीतांचा इतर भाषिकांनाही आस्वाद घेता यावा म्हणून हा प्रयत्न...

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 16/09/2008 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे - यशवंत देव यांच्या गीताचे स्वैर रुपांतर - बहुगुणी, ऑगस्ट ८, २००८ शक्य झाल्यास चालीतही गाता यावं असा प्रयत्न आहे. ------------------- इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं दिल सौ बार लुटाएं इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं चंचल झोंके, जलकी धारा, भीगी काली मिट्टी जैसे प्राण हो हरे भरे, निकल पडी तृणपत्ती फूल शर्मिले देखके किसकी, होठोंकी याद आए इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं रंगोंका फैलाकर पंखा, सांझ ये किसने बना ली रैनाके दरवाजेपर जैसी, तारोंकी रंगोली छे ऋतुओंकी हो छे मेहेफ़िलें, यहींपर दर्द हटाएं इस जीवनपर, इस जीनेपर, दिल स
Taxonomy upgrade extras

...पुढच्या वर्षी लौक्कर या..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 16/09/2008 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, गेले १०-१२ दिवस सुरू असलेला गणेशोत्सव काल अखेर संपला. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे गणपती काल आपापल्या घरी गेले. आम्ही देखील काल दुपारी साडेअकरा-बारा वाजल्यापासून ते आज सकाळपर्यंत आमच्या लाडक्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो होतो. लालबाग, परळ, चिंचपोकळी आदी गिरणंगाव परिसर मांणसांनी अक्षरश: फुलून गेला होता. रस्ते, इमारती, चाळी, गच्च्या इत्यादी सर्वत्र ठिकाणी लोकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला प्रचंड गर्दी केली होती. मुंगीलादेखील पाय ठेवायला कुठे जागा नव्हती.

आमचे अविवाहित स्नेही श्रीयुत. अंत्या अंतरकर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 15/09/2008 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या एका अविवाहीत स्नेह्याना म्हणालो,समजा क्षणभर आपण विवाहित आहात असं समजू. आपल्याला सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधान पत्नी असती तर तिच्या सहवासात राहून, आपल्या बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम, वृत्तिला थोडा आळा बसला असता. आपण लग्न बंधनात एकदाचे पडल्याने आपल्या आईला पण सुटकेचा निश्वास देता आला असता. आपल्याला एक दोन मुलगे आणि एक दोन मुली असत्या तर एखाद्दा मुलाने आपल्यात असलेले संगीताचे कौशल्य आत्मसात करून आपला वारसा कायम ठेवला असता.दुसर्‍याने आपला व्यवसायाचा अभ्यास करून आपल्याला हातभार लावला असता. मुलीने आपल्या सुंदर गळ्याचा वारसा घेऊन प्रख्यात गायीका झाली

एक शृंगारीक कविता

लेखक रामदास यांनी सोमवार, 15/09/2008 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भिरभिरते अशी नजर कशाला का, पदर चाचपून बघते ग. भाळावरचे थेंब टिपूनी का ,उगाच खुद्कन हसते ग. एकांतामधी चावेचिमटे कोण तपासून बघते ग दाताखाली ओठ चावूनी कोण उसासून थकते ग. झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी कुठे सांडली बुगडी ग दहीवर आले उंबरठ्याशी रात्र तोकडी पडली ग बोटावरती दिवस मोजूनी हिशोब कसला धरते ग लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग.
Taxonomy upgrade extras