Skip to main content

आठवणी सवाईग॑धच्या...

लेखक mina यांनी मंगळवार, 16/09/2008 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
कलादालनाला माझी मौल्यवान भेट... ग॑गुबाई हनगल आणि अण्णा..दुसरा फोटो गिरीजादेवी आणि अण्णा कुटु॑बासमवेत्..केव्हाचे फोटो आहे ते आपणच मला कळवा..धन्यवाद. m/3007/2862112897_ef534330c2_s.jpg" alt="" />

एक होता शिंपी (एक छोटीशी गोष्ट)

लेखक मन यांनी मंगळवार, 16/09/2008 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक होतं आटपाट नगर. त्यात होता एक शिंपी. त्यानं नुकताच बापाचा व्यवसाय सांभाळला होता.आणी हळुहळु शिंपी काम सुरु केलं होतं. जीवन त्याचं कसं छान चाललं होतं. नवनवीन,वेगवेगळे कपडे तो शिवत होता. आणि चरितार्थही व्यवस्थित चालत होता. पण एवढ्यात झालं काय की त्याला टोचली एक सुइ. त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुइ. झालं . तो भडकला.एवढिशी सुइ, वाकड्यात जातेच कशी? त्यानं दरडावलं सुइला..झापलं मस्त धरुन. पण सुइ म्हणली "मी तर पडले सरळ-सोट्.बोलुन चालुन एक सरळ्-टोकदार सुइ. मी कशाला जाउ वाकड्यात? तुम्ही शिवता तिथं पोचणं, टाके मारणं इतकच तर माझं काम." पण शिंपी काही ऐकेना. त्यानं ठरवलं "देउ हिला हाकलुन.

ते आणि आम्ही

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 16/09/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
फुले अशी उमलत असताना मधुरसाच्या अपेक्षेने जवळच होते भुंगे दबा धरून... थेंब दवाचे झेलत अंगावर चुरचुरणा-या थंडीत आम्हीही होतो पलिकडेच डबा धरून रेल्वे अशी धावत असताना खिडकीच्या अपेक्षेने जो तो धक्का देत आपापली जागा धरून... आघात त्यांचे झेलत अंगावर गुदमरणा-या गर्दीत आम्ही होतो लोंबकळत डबा धरून देश असा प्रगती करीत असताना देणग्यांच्या अपेक्षेने तिजो-या भरताहेत सर्वांच्या भरभरून... उपहास नि उपेक्षा झेलत अंगावर सत्कार्याच्या अपेक्षेने अजुनही आम्ही आहोत डबा धरून

निकामी

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 16/09/2008 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
नात्यातले उमाळे- नसतात सत्य सारे ओठांवरील शब्द ,नुसतेच वांझ भारे हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे आभाळ शोधताना हातात मेघ येई डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही कोणासही कराव्या का व्यर्थ वल्गना मी माझे मलाच ठावे, ठरलो कसा निकामी
Taxonomy upgrade extras

माय जगो मावशी पण जगो

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 16/09/2008 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
समुपदेशनाचे धडे लहान पणीच मिळाले. आई आणि मावशीकडुन. आई अशिक्षित मावशी बर्या पैकी शिकलेली. दोघी मध्ये डावे उजवे करणे कठीण. घराण्यातले सर्व क्लिष्ट प्रश्नसोडव्ण्यात दोघी एकदम पटाइत. मी लहान असल्यामुळे मी आजुबाजुला रहायला परवानगी. मला काही कळत नाही असे त्याना वाटायचे. चंद्रकांत काकोड्कर ९ व्या वर्षी पचवलेला मी. कधी कधी मावशीला संशय यायचा. तेंव्हा ती सांकेतिक भाषा वापरायची. पण ते पण कळायचे. मावशी स्त्री मुक्ती चळ्वळीची चेयर पर्सन टाइपची. अत्यंत स्फोटक. तेवढीच प्रेमळ. माझ्यावर खुप प्रेम. कारण तीची ३ मुले अमेरिकेत सेट्ल झालेली. कुठ्लेही पाश नसल्यामुळे कोणालाही मदत करायला मोकळी.

बटाट्याचा शिरा

लेखक परीसा यांनी मंगळवार, 16/09/2008 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम बटाटी उकडुन घ्यावी. नंतर ती पुर्णपणे कुसकरुन घ्यावी (पिठासारखी). मग ती तुपामधे मस्त खमंग परतवुन घ्यावी. त्यात दुध, साखर, वेलची पावडर, बदामाची पुड घालुन परतवत रहावे. हवे असेल तर केसर सीरप घालावे. हे मिश्रण घट्ट झाले कि गॅस वरुन उतरवावे. थोडे थंड झाले कि खावे. हे तुम्ही फ्रिज मधे ठेवुन नंतर खाल्लात तर अजुन छान लगेल.

दोडक्याचा भात.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 16/09/2008 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धा किलो दोडकी. (शिराळी) दोन वाट्या बासमती तांदूळ. १ वाटी ताक १ वाटी पाणी ४ हिरव्या मिरच्या २" आलं २ चमचे (टी-स्पून) धण्याची पावडर १चमचा (टी-स्पून) जिर्‍याची पूड मीठ चवीनुसार. फोडणीसाठी तेल आणि मोहरी. ओलं खोबरं कोथिंबीर. साजूक तुप प्रथम तांदूळ तासभर भिजत घालावेत, नंतर निथळवून घ्यावेत. दोडक्याच्या शिरा काढून दोडकी किसून घ्यावीत. आलं आणि मिरच्या वाटून घ्याव्यात.

काकांना जेव्हा राग येतो...

लेखक फटू यांनी मंगळवार, 16/09/2008 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री नऊ साडे नऊची वेळ असावी. नुकतीच जेवणं झाली होती. जुनी जाणती माणसं निवांत बसली होती. अशातच बाल गोपाळ मंडळी आजी भोवती गोळा होऊन, "ए आज्जे आज्जे, आम्हाला गोष्ट सांग ना" असं म्हणून आपल्या आजीकडे हट्ट करू लागली. तेव्हा आजीनेही "बरं ठीक आहे बाळांनो" असं म्हणून गोष्ट सांगायला सुरुवात केली... एक होते काका. एक होता पुतण्या. काका होते भारताच्या पुर्वेकडच्या देशात. तर पुतण्या तिकडे साता-समुद्रापलिकडे पश्चिमेकडे सिलिकॉन व्हॅलीत... काका काय करतात हे तसं फार जणांना माहिती नव्ह्तं. पण त्यांचं व्यक्तीमत्व अगदी भारदस्त होतं.

ज्ञानदेवे रचिला पाया, ............ तुका झालासे कळस!

लेखक वारकरि रशियात यांनी मंगळवार, 16/09/2008 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! आपल्यापैकी बर्याच जणाना आपल्या होम पेज वरचे हे दोन चरण माहित असणारच ! आणि ते एखाद्या अभन्गातून उद्ध्रुत केले आहेत हेही माहित असणारच ! फक्त कदाचित हे अवगत नसेल की हे दोन चरण त्या अभन्गात सलग (ओळीने) नसून येथे मध्यमपदलोपी समास (!) झालेला आहे.