Skip to main content

मास्तरांची "एक प्रश्नपत्रिका"

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 14/09/2008 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरची रहदारी जोरात आहे सध्या, भरपूर नवीन सदस्य येत आहेत... तर नवनवीन सदस्यांना असलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आणि आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हे समजण्यासाठी ही एक प्रश्नपत्रिका. ( अर्थात अभ्यासक्रम व्यापक आहे, आणि प्रश्नपत्रिका अतिशय छोटी आहे..ती सर्वसमावेशक आहे असा अजिबात दावा नाही... खूप महत्त्वाचे उल्लेख राहिले असणार... आपण आपापले प्रश्न प्रतिसादात लिहू शकता..) संदर्भासहित स्पष्टीकरण करा. १. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन. २.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल. ३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.

आकड्यांचा महिमा

लेखक पक्या यांनी रविवार, 14/09/2008 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी एक दोन तीन चार शिकताना आकड्यांशी झालेली ओळख पुढे इतकी घट्ट होते की आपल्या रोजच्या जीवनात या आकड्यांशिवाय पानही हलत नाही....घड्याळातील आकडे, टिव्हि च्या रिमोट वरील आकडे, मोबाईल वर आकडे, पगाराचे तसेच बिलाचे आकडे....एक ना दोन (परत आकडेच) अभिजितचं 'म्हणी मॅटर्स ' वाचलं आणि एकदम डोक्यात आलं - आपल्या भाषेत आकड्यांचेही कितीतरी वाक्प्रचार आणि म्हणी आहेत. पुराण, धर्मग्रंथ, इतिहास, साहित्य , बोलीभाषा ,चालीरिती वगैरे मध्ये डोकावले तर आकड्यांचा शब्दांशी घातलेला मेळ दिसून येईल. बर्‍याच आकड्यांना काही ना काही महत्व आहे आणि त्या गोष्टी त्या आकड्यांमध्येच बसतात. उदा.

आईस कचांग

लेखक वैशाली हसमनीस यांनी रविवार, 14/09/2008 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
येथे ''आईस कचांग''हा बर्फाच्या गोळ्यासारखा दिसणारा पदार्थ जेवणानंतर डेसर्ट म्हणून लोकप्रिय आहे.मोठ्या ग्लासात तळाशी शेंगदाणे,शिजविलेले रेड बीन्स,कॉर्न घालावे. त्यावर आपल्या आवडीचे सरबत(रोज,काला खट्टा इ.)घालावे. त्यावर बर्फाच्या चुरा एकत्र म्हणजे गोळा करून ठेवावा.त्यावर पुन्हा सरबत घालावे.आपल्याकडील बर्फाच्या गोळ्यासारखीच चव पण शेंगदाणे,बीन्स इ.मुळे अधिक चविष्ट लागतो.

विघ्नहर्त्यावरचे संकट टळणार?

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/09/2008 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा, ही बातमी खरी असेल तर तुम्हाला आमच्या उत्सवातली हजेरी संपवुन घरी जाताना काही अडचण येणार नाही असे वाटते.

गणेशभक्त सलमान!

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/09/2008 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
बेफाम गाडी चालवुन केलेला अपघात, केलेले तमाशे वगैरेसाठी कुप्रसिद्ध झालेल्या सलमानने घरात गणपती बाप्पांना आणले, त्यांची सहकुटुंब पूजा अर्चा केली. या कृत्यामुळे मुल्ला मौलवी व धर्मांध संघटनांनी त्याच्याविरुद्ध फतवा काढला आहे.

कण-भौतिकी आणि LHC

लेखक राहूल यांनी रविवार, 14/09/2008 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
आगाऊ सूचना: जर कुणाला विज्ञानाची (विषेशतः भौतिकशास्त्राची) ऍलर्जी असेल तर हा लेख वाचून स्वतःचे डोके आपटून घेऊ नये. हे लिखाण विकिपिडिया तसेच इतर काही पुस्तकांच्या आधारे केले आहे. याच संदर्भातील 'मिपा'वरचा अजून एक धागा येथे सापडेल. कण-भौतिकी विषयाचे नाव वाचून धक्का बसला असेल... मलाही बसला.

कका ची बाराखडी (भारूड)

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 14/09/2008 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
चाल- काट्याच्या अणीवर वसले तीन गांव... ककाच्या नांवावर काढल्या मालीका ककाच्या नांवावर काढल्या मालीका काही सूरू काही संपेचना संपेचना ठार केले नायकाला नायीका रडते व्हीलन बधेचिना बधेचिना रीपीटले ब्राउन तुकडे फॉरवर्ड करती प्रेक्षक बघेचिना बघेचिना त्याचा केला पुनरजनम पुनरजन्मानी नायीका तरुण पुन्हा तरुण पुन्हा दादीचे केस काळे डिस्को करते दादी खपेचिना खपेचिना तिने मारल्या तीन थपडा तीनदा लागल्या एपीसोड सरेचिना सरेचिना टाकले कमरशीयल ब्रेक चहा ढोसूनही प्रेक्षक टळेचिना टळेचिना पाडल्या नवीन कहाण्या वाढता वाढे बाराखडी संपेचिना वाढता वाढे ककाराचा विकार मूर्ख बघे
Taxonomy upgrade extras

नशेचे प्रकार---अंतरीच्या नाना कळा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 14/09/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी कधी दारू प्यायलो नाही परंतु, दारू पिणाऱ्याच्या अंगात नशा आणण्याच दारूत सामर्थ्य असतं हे मला ठाऊक आहे.आणि ते कळण्यासाठी दारू पिऊन पाहिली पाहिजे असं नाही.ह्या नशेत माणूस, माणूस म्हणून राहात नाही असं म्हणतात. म्हणजे काय?