Skip to main content

आख्खे काश्मीर भारतात!!

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 12/09/2008 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज बीबीसी वाल्यांनी आमचा दिवस आनंदी करायला मदत केली बॉ.... चक्क पाक व्याप्त काश्मीर भारताच्या अख्त्यारीत दाखवून.

हा बाजार बंद करा

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 11/09/2008 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळपासून सातत्याने अनेक वाहिन्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिलेला तिथल्या 'कार्यकर्त्या'ने अक्षरश: ढकलुन, अवमानित करून हाकलले त्याचे प्रक्षेपण करीत आहेत. संपर्क साधला असता उत्सवाचे प्रमुख उपलब्ध नाहीत वा कॅमेर्‍यासमोर येत नाहीत असे काही वाहिन्या सांगत आहेत तर एका वाहिनीवर लालबाग राजा चे श्री. सुनिल जोशी यांनी 'ती महिला चपला घालुन व विशेष महत्वाच्या व्यक्तिंकरीता असलेल्या रांगेत जात होती व तिने सांगुन न ऐकल्यामुळे नाइलाजाने कार्यकर्त्यांना असे वागावे लागले' अशी मल्लिनाथी केली. हे कुणाला पटलेले दिसत नव्हते.

वेड्या आठ्वणी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/09/2008 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
अक्का, आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात."आठवणी येतात",असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात. तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझं बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्षाने आठवली.

मेगा`ब्लॉग'

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/09/2008 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू यॉर्कहून परतीच्या प्रवासात बच्चनसाहेब अस्वस्थ होते. विमानाच्या कॉरिडॉरमध्ये त्यांचा येरझारा चालू होता. सारखा ते कुणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होते (बहुधा अमरसिंहांना असावा), पण लागत नव्हता. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत होती. ""सर, मे आय हेल्प यू? वुड यू लाइक टु हॅव सम कॉफी ऑर ड्रिंक?'' एक हवाईसुंदरी मार्दवी सुरात म्हणाली. मुळात बच्चनसाहेबांशी आपल्याला बोलायला मिळालं, याचंच तिला कौतुक होतं. ""नो, थॅंक्‍स.'' बच्चनसाहेबांनी शक्‍य तेवढ्या सौजन्यानं तिला उडवून लावलं. बच्चनसाहेबांचं सामान वगैरे पुन्हा गायब झालं की काय, असं त्या हवाईसुंदरीला वाटलं.

शाळेत गणवेष असावा की नसावा?

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 11/09/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शाळेत (काही अपवादात्मक कॉलेजातसुद्धा) जाणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेष असावा का? असा माझा प्रश्न आहे. गणवेषाची गरज नक्की काय असते? समुहभावना ही गणवेषामुळे तयार होते असे काही जण म्हणतात तर ते आपल्याला कितपत योग्य वाटते? मुले घरात असताना, इतर वेळी मित्रांसोबत खेळताना वेगवेगळ्या कपड्यात असूनही समुहभावात असतात. तसेच कुठे सहलीला गेली (शाळेबाहेरील मित्रांसोबत तर तेव्हा सुद्धा समुहभावानेच असतात. मग शालेय जीवनात गणवेषाला महत्व द्यावे का? समुहभाव हा मुद्दा असेल तर तो कसा तयार होतो हा सुद्धा उहापोहाचा चांगला आयाम ठरेल. (खेळाडु, कंपनीतले कामगार, सैनिक यांचे सुद्धा गणवेष असतात.

ऋण मातीचे..

लेखक राघव यांनी गुरुवार, 11/09/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी? पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी.. का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे? व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी.. चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे, एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी.. वाट कुणाची बघतो आपण?

(प्रवाह)

लेखक बिनडोक बनी यांनी गुरुवार, 11/09/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आर्यचाणक्य यांच्या प्रवाहात मीही हात धुवून घेतले.. ;) मिसळपाववर कोरडे बसण्यापेक्षा मी जेव्हा मिसळीच्या डोहात बुडी मारली... तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय करायचा प्रयत्न करतोय?

प्रवाह

लेखक आर्यचाणक्य यांनी गुरुवार, 11/09/2008 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
किनाऱ्यावर कोरडे बसण्यापेक्षा मी जेव्हा आठवणींच्या डोहात बुडी मारली... तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय शोधायचा प्रयत्न करतोय? कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो तर कधी वाळके पान होऊन भोवऱ्यामध्ये गुरफटलो कधी मोती वेचले तर कधी शिंपले शोधले कधी निसटणारी वाळू हातात घेतली तर कधी चिखलाने बोटे बरबटली पण तरीही मला कळले नाही की मी काय शोधतोय? दमून भागून शेवटी जेव्हा किनाऱ्याला लागलो आणि तट्स्थ नजरेने पुन्हा डोहाकडे पाहीले .... तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या डोहामधूनच उगम पावलाय एक सोनेरी प्रवाह... जो जातोय दूर, दूर...
Taxonomy upgrade extras

मीही एक मृगजळ

लेखक गिरीराज यांनी गुरुवार, 11/09/2008 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
मीही एक मृगजळ.. मृगजळाच्या प्रदेशातून परत येतांना अंगभर हसू मिरवत आणतो मी तुझं… आणि आश्चर्य वाटत राहतं माझ्या कल्पनांना चैतन्य देणाऱ्या या मृगजळाचं... माझ्या हाकेला तुझी उत्तरं मीच दिली आहेत तिथे... आणि तुला आश्चर्य वाटेल इतकी ती तुझीच आहेत... लखकन चमकलेली वीज कुठे संपते आणि कुठे पाण्यात शिरते नाहीच कळत.. तशीच तू आणि तुझे भास, आणि मग मीही एक मृगजळ… ---गिरीराज
Taxonomy upgrade extras

मुम्बईचे पो. उ. आयुक्त प्रसाद यांचे वक्तव्य- मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही.

लेखक केवळ_विशेष यांनी गुरुवार, 11/09/2008 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
मुम्बईचे पो. उ. आयुक्त के.एल. प्रसाद यांचे वक्तव्य- मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही. कालच टि. वी वर वरील बातमी पाहिली. या पदावर असणार्‍या व्यक्तीला एवढी गुर्मी कशी काय चढते? आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील याचा काहीच विचार करायचा नाही का? की, एकदा हातात सत्ता आली की आपण कोणाचीही "ठासू" शकतो, हा व्यावहारीक माज?! आपण कोणत्या पदावर आहोत, त्या मूर्ख (जया) बाईच्या वक्तव्यामुळे आधीच वातावरण ढवळून निघत असतांना अशी बाष्फळ बडबड म्हणजे चिथावल्यासरखे होणार नाही का? यात भरडले जाणार ते सामान्य मराठी पोलिस. कारण जर मनसे कार्यकर्ते पेटून उठले तर पोलिसच त्यांना आदेशानुसार चेपायला बघणार!