Skip to main content

आठवण....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी गुरुवार, 11/09/2008 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते का? आकाशावर उमटुन गेली होती लाली, आठवतो का? तोच रक्तीमा फुलला होता तुझ्याच गाली. - १ आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर, आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २ आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद, आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३ आठवली का? अधीर वचने अधराची अधराला, आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४ आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली, आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५ - सौरभ वैशंपायन(मुंबई).

दोन प्रष्न

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 11/09/2008 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
असुरक्षितेच्या भाव्ननेनी कायम पछाड्लेली जगभर आढळ्णारी जमात म्हणजे पुढारी. आपल्या कडे दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा मुहुर्त धरुन आपले चेहेरे जनतेसमोर सादर करण्याची जी चढाओढ लागते ती बघण्यासारखी असते. अशाच एक पोस्टर वरच्या मजुकराचा अर्थ काही कळ्ला नाही. मि.पा.वरचे डोकेबाज ह्यावर प्रकाश टाकतील काय? मा.खा.आ. अबक जी बकड साहेब म्हण्जे काय? सक्रिय कार्यकर्ते - अबक बकड म्हण्जे काय?

वजन कमी करायचय ?????? ज़नरलमोटर कंपनीचा डाएट

लेखक शुक्राची चान्दनी यांनी गुरुवार, 11/09/2008 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपणापैकी बरेच जणांनी ज़नरल मोटर ह्या कंपनीने आहारतज्ञांच्या मदतीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी बनविलेल्या डाएट बद्दल ऐकले-वाचले असेल. मी गेले आठवडाभर हा डाएट करीत होतो. आज शेवटचा दिवस ! कंपनीच्या दाव्यानुसार तुमचे वजन किमान ५-८ किलो कमी होते. हा दावा अर्थातच अतिरंजीत आहे. माझे वजन आत्तापावेतो ४ किलो कमी झाले आहे. अर्थात उद्यापासून नेहेमीचे जेवण सुरू केल्यावर त्यात किमान अर्धा-पाऊण किलोनी वाढ झाली तरी, दोन्-अडीच किलो तरी घट झाली असे म्हणायला हरकत नाही.

कडीपत्ता चट्णी

लेखक किर्ति यांनी गुरुवार, 11/09/2008 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
हा माझा प्रयोग माझ्या नवरया ला आवडला म्हणुन लिहित आहे साहित्य:- एक जुडी कडीपत्याची पाने,थोडी कोथबिर्,थोडेसे शेगदाणे,मिरच्याचे तुकडे, मीठ,एक चमचा तेल क्रुति:-तेलात आधी कडीपत्याची पाने तळून घेणे नन्तर कोथबिर तळुन घेणे त्यानन्तर मिरच्या आणि शेगदाणे वेगवेगळे तळुन घेणे हे सर्व खलबत्यात जाडसर वाटून घेणे मीठ घालायला विसरु नये झक्कास कुरकुरित होते हि चटणी

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व भाग १

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 11/09/2008 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... मी आज तुम्हा सर्वांसोबत माझे सवाई गंधर्व महोत्सवाचे फोटो शेअर करु इच्छीते..... पंडीत जसराजजी.. मला यांचे फोटो काढायला नेहमीच आवडतं कारण यांचा चेहरा फार फोटोजेनीक आहे...

डाम्बीसपणा

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 11/09/2008 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या ब-याच तज्ञांकडुन गझल या विषयावर बरीच काही माहिती मिळाली आहे. गझलेच्या दोन कडव्यांमधे काही संबन्ध असलाच पाहिजे असे नाही हे एक म्हणणे आहे प्रत्येक कडवे /शेर हा स्वतन्त्र लिहिले जाते दोन कडव्यांत / शेरांत एकमेकाना जोडणारा अर्थाचा प्रवाह एकसंध वाहिलाच पाहिजे असा आग्रह नसावा. हा अर्थात मी त्या चर्चेतुन माझ्या मगदुरानुसार काढलेला अर्थ. थोडा प्रयत्न केला आहे तसेच काहिबाही लिहिण्याचा.

"मुघलीस्तान"ह्या होऊ घातलेल्या देशाबद्द्ल काही माहीती आहे का?

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 11/09/2008 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
पाकीस्तान व बांग्लादेश यांच्या सद्य कारावायां बाबत माहीती पुर्ण लेख....

पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष

लेखक वाटाड्या... यांनी गुरुवार, 11/09/2008 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, भारतीय अभिजात (शास्त्रीय) संगीताच्या आपल्या परंपरेत अनेक उत्तमोत्तम दिग्गज कलाकार होउन गेले. काही कलाकार समाजापुढे आले तर काही आले नाहीत वा येऊ शकले नाहीत. त्याबद्दल नंतर कधीतरी. जे समोर आले त्यातील काही कलाकारांची थोडीशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. नुकतेच पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचे 'स्वरांची स्मरणयात्रा' हे पुस्तक वाचनात आले आणि त्यापासून स्फुर्ती घेऊन आपणही चार शब्द लिहावेत असं वाटून गेलं आणि त्यामुळे हा प्रपंच.