Skip to main content

बालपण देगा देवा!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/09/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
"जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो", असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं. प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते. ते पुढे म्हणाले, "त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली. एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत करण्याच्या इराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने दिसले. गोंधळलेल्या मनस्थीतीत असलेल्या त्या वयस्कर आजोबाना, "बसा,बसा" असं म्हणण्यापुर्वीच त्यांचं धडपडीचं हे चाललेलं दृश्य पाहून माझी मलाच अत्यंत लाज व

जीवन नुसतं जगु नका!! त्याचा "उत्सव्"साजरा करा!

लेखक येडा खवीस यांनी रविवार, 07/09/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
Life Should not only be lived, It should be celebrated!!! मध्यंतरी नेटवर सर्फ़ करताना अचानकपणे "ओशो"चं हे एक छान सुभाषित दिसलं! किती सुंदर आणि स्पष्टपणे या गुंतागुंतीच्या जीवनाचे "आधारभुत" तत्व त्यांनी नीटसपणे मांडलय ना? आजवरच्या सगळ्या so called established संतांनी आपल्याला जीवनाकडे बघण्याचा "गंभीर" दृष्टीकोन दिला पण, ओशो जीवनाला एक "उत्सव" म्हणुन बघतात. या एकाच वाक्याला अनेक कंगोरे आहेत, हिर्यासारखे अनेक पैलु आहेत आणि कॅलिडोस्कोप सारख्या अनेक सापेक्ष प्रतिमा आहेत.

समुद्रमंथन

लेखक तिमा यांनी रविवार, 07/09/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ममता, अरुंधती, जयललिता, मायावती, सोनिया, जया, शबाना, सुषमा व तत्सम् स्त्रियांना एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा तुम्हाला मिळाला तर तुम्ही देशप्रेमासाठी काय कराल ?

घावन घाटले

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 07/09/2008 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
गौरीजेवणाला कोकणास्थांकडे घावन घाटले असते.
घाटल्यासाठी:१ वाटी कणिक,१ चमचा तूप,१ वाटी ओल्या नारळाचा चव,३/४वाटी गूळ २ कप दूध+ साधारण १ कप दूध, वेलची+जायफळ स्वादासाठी, बदामतुकडे +बेदाणे सजावटीसाठी घावनासाठी: २ वाट्या तांदूळाचे पीठ+ चवीपुरते मीठ घाटले: कणिक तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या,त्यावर खोबरे घालून थोडे अजून भाजा,गूळ घाला आणि थोडे भाजा,दूध घालून चांगले शिजवा.शिजल्यावर त्यात बदाम,वेलची,जायफळ घाला व ढवळा. हे घाटले तयार झाले.यातील दू

जया बच्चनचा तीव्र निषेध...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 07/09/2008 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
कालच कुठल्याश्या एका (माझ्या माहितीप्रमाणे 'द्रोण') चित्रपटाच्या कुठल्याश्या एका समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन हिने 'हंम यूपीके है, हम हिंदीमेही बात करेंगे. महाराष्ट्रके लोग हमे माफ कर दे!" असे मराठीजन, मराठीभाषा आणि महाराष्ट्र यांचा जाणूनबुजून अपमान करणारे, खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. अनेक वाहिन्यांनी काल रात्री उशिराने हे दृष्य दाखवले. सदर वक्तव्य करतांना जयाच्या चेहेर्‍यावर खिल्ली उडवण्याचे, छद्मीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते!

डाव वेळेने साधला

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/09/2008 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--राजेंद्र्कृष्ण ) दुःखाच्या ह्या दरी मधे रथ खुषीचा लोपला प्रेमाच्या ह्या खेळा मधे डाव वेळेने साधला कुणी समजावे प्रेमातल्या ह्या नीष्ठूर संकटाना दोन जीवाने इच्छीले ते इतराना काही केल्या पटेना हंसण्या आधीच प्रीतिला का आवडे रडायला प्रेमाच्या ह्या खेळा मधे डाव वेळेने साधला नेत्रा समोर प्रीतिचा पुरावा कोणत्या कारणा म्हणावे जर ह्या जीवन मग काय म्हणावे ह्या मरणा प्रीतिचे दैव जाता निद्रे मधे दाह दुःखाचा भोगला प्रेमाच्या ह्या खेळा मधे डाव वेळेने साधला श्रीकृष्ण सामंत

आमचाही छोटेखानी मिपा कट्टा,:)

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 06/09/2008 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
युरोपातला उन्हाळा आल्हाददायक असतो. २२ ते २५ अंश से तापमान,सूर्याचा ढगांशी लपंडाव आणि मध्येच एखादी हलकीशी सर असा 'श्रावण' उन्हाळाभर चालू असतो. साहजिकच ह्या वातावरणाचा जास्तीत जास्त उपयोग सगळे करून घेत असतात कारण त्यानंतर येणारी पानगळ दिवस लहान करते आणि तिच्यापाठोपाठची बोचरी थंडी सोबतीला करड्या संध्याकाळी आणते.त्यामुळे उन्हाळ्यात मौजमजेचे जास्तीत जास्त प्लान केले जातात्.व्हरांड्यात,गच्चीत,अंगणात केलेले बार्बेक्यू हे त्यात अग्रभागी असतात.अशा हवेत आम्हाला एकत्र काहीतरी करण्याची सुरसुरी न आली तरच नवल! त्यात आणि तात्याने अचानक छोटेखानी मिपा कट्टा!

माझी नवीन गुढ(भय्)कथा वाचुन अभिप्राय देणे

लेखक येडा खवीस यांनी शनिवार, 06/09/2008 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मी मिसळपावचा एक नवा सदस्य आहे...व्यवसायाने ज्योतिष मार्गदर्शक आणि गुढविद्या अशा क्षेत्रातील आहे ( म्हणजे पांढर्या कपड्यातील जरा बरा मांत्रिक म्हणलात तरी हरकत नाही) त्याचप्रमाणे एक हौशी गुढकथालेखकही आहे.

राधा

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 06/09/2008 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
कळलेच नाही मजला जडला कसा जिव्हाळा मन चिंब भिजवुनी हा जणु कृष्णमेघ गेला थेंबात प्रीत जागे स्पर्शास ओढ लागे कळले कधी न जुळले आतुर मनांचे धागे सर्वस्व ये फुलुनी जणु केवडा फुलावा हातात चांदण्यांचा जणु ताटवा मिळावा ओल्या मिठीत धुंद तू सावळा मुकुंद राधा तुझी मी झाले तोडून सर्व बंध
Taxonomy upgrade extras