Skip to main content

अमेरिकेतील आमच्या घरच्या गौरी..

लेखक नाटक्या यांनी बुधवार, 10/09/2008 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबाद प्रमाणे यंदाही आमच्या घरी (बे एरिया, फ्रिमाँट) येथे रविवारी गौरीपूजन व भोजनाचा कार्यक्रम झाला. गौरीचा सगळा स्वयंपाक मी व आमच्या सौं. नी सकाळी ५:०० वाजता ऊठून सोवळ्यात केला होता. मिपातर्फे आमचे जुने मित्र 'एक' सहकुटुंब हजर होते. त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे. सध्या फक्त गौरींचीच छायाचित्रे देत आहे. जमल्यास दर्शनाला आलेल्या ईतर मित्रांची सुध्दा टाकीन... आमच्या सौ.

कधी रे येशील तू... अनामिका....

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 10/09/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
पुनवेच्या चंद्राला नभी शोभतसे, शुभ्र चंद्रिका यमुनेच्या तीरी साद घाली, हरीची मुग्ध सानिका ऐकुनि ते सूर, नुपुरे झंकारित येई वेडी राधिका येई त्वरेने, नजरा चुकवित, परि नसे ती अभिसारिका परमात्म्याची ओढ तिला, ती होय अलौकिक साधिका दिव्यत्वावरि प्रीती करी, ती हरीची प्रियतम प्रेमिका दोन ह्रदयांचे पाहुनि मिलन, मोहुनि जाती वृक्ष-लतिका साक्ष आहे, या अमरप्रेमाची, वृंदावनातील मधु-मल्लिका सांगे मजला ही स्नेहकथा, जाईची अबोध कलिका झुरते मी वेड्या राधेपरि, कधी रे येशील तू... अनामिका....
Taxonomy upgrade extras

वर्षा भोसले - आशा भोसले यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

लेखक वेदनयन यांनी बुधवार, 10/09/2008 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतिच मटा वर ईथे बातमी वाचली. सुन्न झालो. असे का व्हावे - कारण काय? एके काळी वर्षा रिडिफ वर लिहीत असत; ते मला खुप आवडे. पण गेल्या पाच-एक वर्षात त्या काय करीत ह्याचा पत्ता नाही. कुणाला माहित असल्यास जरुर सांगा. लवकर बर्‍या होत हिच ईश्वरचरणी प्रार्थना. रोहित

मिसळपाव कट्टा - सॅन होजे/सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरिया

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 10/09/2008 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सॅन होजे-सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरियामधील मिसळपाव सभासदांचा कट्टा आयोजित करण्याचा मानस आहे. सर्किटराव व एक शी बोलणे झाले असून २७ सप्टेंबर २००८ अशी प्रस्तावित तारीख आहे. वेळ - स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ (प्रस्तावित) प्रस्तुत प्रस्तावाचे/काथ्याकुटाचे उद्देश पुढीलप्रमाणे - ०. कट्ट्याची तारीख आणि वेळ सोईची नसल्यास पर्यायी तारीख आणि वेळ सुचवणे. जास्तीत जास्त सहभागींच्या सोईनुसार अंतिम तारीख आणि वेळ निश्चित करणे. सध्या उपलब्ध माहितीनुसार वरील तारीख आणि वेळ प्रस्तावित केली गेली आहे. १. कट्टा कोठे भरवावा, याबाबत विचारविनिमय. इच्छुक सहभागींनी सूचना केल्यास उत्तम.

मिरचीचे लोणचे

लेखक चकली यांनी बुधवार, 10/09/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
पानगी आणि मिरचीच्या लोणच्याची चर्चा वाचली आणि मिरचीच्या लोणच्याची कृती लिहावी वाटले.

"जीवन मे एक बार आना वेगुर्ला."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 09/09/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ "वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले". वेंग म्हण्जे "कंबर".म्हणजेच "कंबरेवर ठेऊन उरले ते" प्रेक्षणीय स्थळं पहाण्याची ज्याना आवड आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी.

मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 09/09/2008 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे,टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक,सुंदर गणेशमूर्ति विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो.मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच.पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले.कस्टम अधिकार्‍याने आमच्याकडे लक्षसुध्दा दिले नाही.उलट टॅ़क्सी मिळवून दिली.गणेशकॄपा !

श्यामसखा.

लेखक सौरभ वैशंपायन यांनी मंगळवार, 09/09/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी नसावे दुरवर परी, श्यामसखा जवळी असावा, श्रावणधारांसवेच अलगद, श्यामसखा बरसुनी जावा - १ श्यामसख्याच्या निळाईत अन मग, गौरतनु हे रंगुन जावे, वेणु त्याने लावताच ओठी, सप्तसुरात दंगुनी जावे - २ श्यामसखा असा बरसता, चंद्र लाजुनी चुरुन जावा, सैलावल्या केसात अन मग, स्पर्श जरासा उरुन जावा - ३ - सौरभ वैशंपायन(मुंबई).

कथा कढईभर शिऱ्याची!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 09/09/2008 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता. उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली. तेव्हा रत्नागिरीत राहत होतो. दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं. वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं.

लार्ज हॅड्रॉन कोलायडर - अर्थात सर्वनाश नव्हे

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 09/09/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी इजाभौंनी माझ्या ज्ञानात भर पाडली, ती ही इथे पहा. आणि वर मला म्हणाले की यावर थोडं जास्त लिही. म्हणून जरा घाईघाईत चार शब्द खरडत आहे. घाई अशासाठी की जर हा लार्ज हॅड्रॉन कोलायडर जर उद्या सुरू झालो आणि "तेज" बातम्यांप्रमाणे जर आपण सगळे मेलो तर कळलं पाहिजे ना आपल्याला कसे मेलो ते! (हे पण इजाभौंचेच विचार.) मी ही माहिती उचलली, माझ्या दोन मित्रांकडून आणि एक नेहेमीचा मित्र विकीपीडियाकडून. अधिक, परीपूर्ण माहीती तिथे आणि तिकडच्या लिंक्समधून मिळेलच.