Skip to main content

दुहेरी फायदा- (लघुकथा )

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 17/09/2008 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपतीभवनातून एक वटहुकूम जारी करण्यात आला. या वटहुकूमाद्वारे सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक लस टोचून घेणे, अनिवार्य करण्यात आले. वर्तमानपत्रातून आवेदन दिलं गेलं. निविदा मागवण्यात आल्या. कमी किमतीच्या निविदेवर शिक्का मोर्तब करण्यात आलं. त्यांना ऑर्डर देण्यात आली.लसीचे शिशे आले. डॉक्टर आले. या सगळ्या गोष्टी इतक्या झटपट घडल्या , की प्रथम कुणाला काही कळंलच नाही. शासकीय अखत्यारीतील कदाचित ही पहिलीच गोष्ट असेल, इतकी झटपट घडलेली !

काटा रुते कुणाला

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/09/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
लाचलुचपतीचे विडंबन..... काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे. मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? सांगू कसे कुणाला ते स्वच्छ शुभ्र बगळे चिरकाल चरणे त्यांचे, साहतात लोक सगळे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काही करू कसे मी? सारेच साव ठरले. भरतात पोतडी ते आडदांड बोके सगळे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? ह्या शर्मवंचितांना काटा कधी रुतेना पाहूनी लूटमारी मज बोच सलत आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे. मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे ........ रुते कुणाला?
Taxonomy upgrade extras

लघुपाककृतीस्पर्धा

लेखक गणा मास्तर यांनी बुधवार, 17/09/2008 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार, अनोख्या पाककृती ज्यांना करता येतात त्यांच्यासाठी ही लघुपाककृती स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे १) पाककृती जास्तीत जास्त २० मिनिटांत करता येण्याजोगी हवी. २) घटक पदार्थांमध्ये साबुदाणा, कडीपत्ता, कोथिंबिर चिंच, गुळ, हिंग, सोडा, अंडी, कैरी यांचा समावेश नसावा. ३)खाद्यपदार्थ हा नाष्ट्यासाठीचा पदार्थ हवा.

झानटामाटीक ब्रेड.

लेखक लक्ष्मीकान्त यांनी मंगळवार, 16/09/2008 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेडचे तुकडे करुन घ्यावे कान्दा बारीक चिरुन घ्यावे ,टोमाटो बारीक चिरुन घ्यावे प्रथम कडईत तेल गरम करुन त्यात जीरे घाला.नन्तर थोडि कोथिम्बीर व कडीपत्ता घाला. कान्दा लालसर तला.मग टोमटो घाला ,चविप्रमाने तीखट व मिठ घाला. सगल्यात शेवटि ब्रेड्चे तुकडे घाला.व ५ मिनिटे वाफवुन घ्या. टी वी पहात हा नाश्ता खावुन पाहा.

समस्यापूर्ती

लेखक रामदास यांनी मंगळवार, 16/09/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
कडव्याच्या पहील्या दोन ओळीत समस्या आणि नंतरच्या दोन ओळीत पूर्ती असं लिहून पाहीलं आहे.एक प्रयोग. जर टोचते पाठीला जर बोचते दंडाला खसखसूनी घासावी जर मऊ लागते अंगाला. *** निर्‍या काचती पोटाला जीव कासावीस होई एका धुण्यामधी कशी खळ जाईल ग बाई. *** असं कसं पायताण चावे जागोजाग बाई थेंब तेलाचा सोडावा अंगठ्याला सैल जाई. ***
Taxonomy upgrade extras

सामान्य माणूस असामान्य गोष्टी करतो तेव्हा......

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 16/09/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातल्या तुळस नावांच्या एक खेड्यात रमाकांत तुळसकरने खूपच सामाजीक कार्य केलं आहे,असं माझ्या एका मित्राने मला सांगितल्याने मला माझ्या शाळेतला दोस्त रमाकांत तुळस्करची आठवण आली.हा तोच तर नसेल,असं कुतुहल मनात येऊन मी त्या खेड्यात मुद्दाम गेलो.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनातला तोच रमाकांत होता.मला इतक्या वर्षानी पाहून त्याला ही खूप आनंद झाला. इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला म्हणालो, "काय रे बाबा!

रंग बदलताना (प्रकाशचित्र)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 16/09/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावरून उतरून लाल मातीच्या जमिनीवर येताच मातीचा रंग अंगावर धारण करणारा सरडा. तोंड , मान, गळा, पुढचे पाय वगैरे लाल झालेले आहे. मागचे अंग भुरकट आहे; तो रंग बहुधा झाडावर असताना झाडाच्या खोडात मिसळुन जायला सोयिस्कर असावा. अंगावरचे खवले चिलखताची आठवण करुन देतात तर पायाच्या नख्या अणकुचीदार शस्त्रासारख्या दिसतात. पळताना एकवार चोहोकडे पाहणार्‍या डोळ्यात 'सावधान' चे भाव आहेत.

(टाळतो)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 16/09/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
केदार पाटणकर ह्यांचे 'टाळणे' बघून आम्हाला आमची वारंवार चालणारी टाळाटाळी आठवली! ;) रोजचा छळवाद आता टाळतो मी जरा व्यायाम आता टाळतो पाहिजे आहे तनाला शांतता कोणतीही चाल आता टाळतो गोड 'केका'ची खुमारी आगळी वरण-भाता हळुच आता टाळतो सोडले पळणे, तरण केव्हाच मी 'जीम'चीही वाट आता टाळतो घेर ढेरीचा कितीही वाढला घोरण्याचे मी न आता टाळतो! चतुरंग