Skip to main content

मला वाटतं.....

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 06/09/2008 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच लोक आग्रह करतात की प्रत्येकाने दुसऱ्याकडे चांगल्या दृष्टीने (पॉझीटीव्ह ऍटीट्युडने) पहावं,जरी संबंध वाकडे येऊ लागले तरी ही. हाच मार्ग प्रत्येकाला सुखी,समृद्ध करतो आणि सौष्टव देतो.पण मुद्दा असा आहे की अशा परिस्थितीला सामोरं जाता आलं नाही की मनाला जरा धक्का बसतो. प्रथम, पाडाव होत असल्याने थोडं वाईट वाटतंच,शिवाय हंसतमुख राहून जणू काहीच झालं नाही असा दृष्टीकोन ठेवायला जरा जड जातं किंवा मन कष्टी होतं.कदाचीत प्रत्येक वेळी काहीच झालं नाही असं होतही नसेल. मला वाटतं, एकच मार्ग बरोबर असतो, असं पत्करून ह्या जीवनातले कठिण समस्या सोडवता येणार नाहीत.

एका (पेक्षा एक) कवीं चे मनोगत----!

लेखक मनीषा यांनी शनिवार, 06/09/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कविता (मनोगत) वाचणा-या सर्व कवी /कवयित्रीं नी --- स्वतःस 'सन्माननीय अपवाद' समजावे )
घेउनी ताव अन लेखणीला ठरवले करु कविता एकदा शब्द शब्द चोहीकडे पण.. हाती काही येत नाही काय करु ? कसे करु ? मला काहीच सूचत नाही | अक्षरांपुढे ठेउनी अक्षर शब्द सांडले मी पसाभर जोडूनी त्या शब्दांना पण ... कविता काही जमत नाही काय करु ? कसे करु ? मला काहीच सूचत नाही | कल्पनेचे अश्व दौडले पण प्रतिभेने तर वैर मांडले निळ्या काळ्या शाई मधूनी निरर्थकच ओळी येती काय करु ?

(...बोकडाचे खूर काही!)

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 06/09/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींचे 'मारव्याचे सूर काही' ऐकले आणि एका वेगळ्याच रागाचे चित्र नजरेसमोरुन तरळले! ;) मारले वजनास, स्नायू फुगवले भरपूर काही! जवळ येतानाच गेले, ढेर माझे दूर काही! मी जरी कुथलो कितीही जोर ते मारायला पण.... होत नाही 'बेडकी'चा सांड तो मगरूर काही! ओरडा कोणी कितीही - बाटल्या होती रिकाम्या तोंड अमुचे सोडते मग दाटलेला धूर काही! वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू 'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही ! रोज मी एकेक पळुनी फाडतो प्यांटीस माझ्या... आरसा मग दोंद माझे दाखवी भेसूर काही!

माझ्या म्हातारीची इष्टेट..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 06/09/2008 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन! खरं सांगायचं तर आजचा दिवस उजाडल्यापासून, आज ५ सप्टेंबर म्हणजे 'शिक्षक-दिन' आहे इतकीच माहिती मला होती. 'तसे अनेक दिन असतात त्यापैकी हा एक' एवढीच माझी भावना होती. परंतु आजच्या दिनाचं माहात्म्य काय, मोल काय, हे मला समजायला, किंबहुना अनुभवायला संध्याकाळ उजाडावी लागली! अर्थात, अद्याप माझी पिढी तेवढी मुर्दाड बनली नाहीये हेही तितकंच खरं! प्रांजळपणे सांगायचं तर आज सकाळी उठल्यापासून मला माझ्या कोणत्याही शिक्षकाची याद आली नाही, आठवण झाली नाही. परंतु त्याचसोबत हेही तितकंच खरं की 'शिक्षक' नावाच्या माणसावर माझी खूप श्रद्धा आहे.

आपले वय तपासुन पहा,प्रुथ्विवरिल नव्हे !

लेखक मानव यांनी शनिवार, 06/09/2008 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
इतर ग्रहान्वर आपले आत्ताचे वय काय असेल ते एक्दम सोपे करुन दाखवले आहे क्रुपया टिचकि मारा http://www.exploratorium.edu/ronh/age/index.html

सारोजनीक गनपती उत्सव - खारपाडा

लेखक ब्रिटिश यांनी शुक्रवार, 05/09/2008 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मांगच्या सालची गोस्ट सांगतय कमीटीची मीटींग झाल्ती मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा.

पाहिजे: शेफिल्ड (यूके) येथे राहण्याची व्यवस्था

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 05/09/2008 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
आठवड्याकरता/वर्षाकरता दोन विद्यार्थिनींकरता रेन्टल बेसीस वर राहण्याची व्यवस्था हवी आहे. (Pref. PG in a family house) ठिकाण - Sheffield S1 1WB च्या जवळपास, Sheffield Hallum Univ च्या जवळ असल्यास उत्तम. कोणांस संबंधित माहिती असल्यास पुढील पत्त्यावर कळवावी - gauriphysiox@gmail.com

वाढदिवस म्हणजे

लेखक दिप्ती यांनी शुक्रवार, 05/09/2008 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस म्हणजे ;;) वाढदिवस म्हणजे - नाही फक्त्त वाढत्या वयाची जाणीव देणारा दिवस आनंदाने , उमेदीने नवे दिवस स्विकारण्याचा हा दिवस वाढदिवस म्हणजे - नाही फक्त भूतकाळाचा जमाख्रर्च मांडण्याचा दिवस गमावलं ते गमावलं म्हणून नवं मिळवण्याच्या उभारीचा हा दिवस वाढदिवस म्हणजे- नाहि फक्त जगण्याची पाटी कोरी करण्याचा दिवस जुन्या आठवणींचे दिवे लावून नवीन स्वप्ने रंगवण्याचा हा दिवस

एक छोटी कविता (तक्रारवजा)

लेखक पांथस्थ यांनी शुक्रवार, 05/09/2008 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीने मागील वर्षी केलेली एक कविता. मी जास्त वेळ ऑफिस मधे घालवतो आणि सुट्टिच्या दिवशी खेळायला जातो ह्याची तक्रार आहे इथे -
Taxonomy upgrade extras