दोन बाजू... क्षणाच्या!
....सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पाहात दाटीवाटीनं, एकमेकांशी लगट करत ताटकळलेल्या गाड्यांचे कर्कश हॊर्न वाजायला लागले आणि रस्ता ओलांडायच्या प्रयत्नातली गर्दी जागच्या जागी थबकली...
हुतात्मा चौकातला तो मैदानी रस्ता आता क्षणभरात गाड्यांच्या गर्दीखाली दिसेनासा होणार होता.
सिग्नलचा हिरवा बाण लकाकला आणि पलीकडच्या गाड्यांनी वेग घेतला.
पण नुकत्याच चार पायांवर चालायला लागलेल्या त्या इवल्या जिवाला त्याची जाणीवही नव्हती.
मिसळपाव