Skip to main content

मजेशीर नावे

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 14/03/2008 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
काल मित्राबरोबर गप्पा मारत असताना त्याने एक मजेशीर गोष्ट सांगितली. त्याच्या ओळखीत एक कुटुंब आहे त्यांच्या मुलांची नावे आहेत - थेंब आणि ठिपका आमचा ग्रुप १०-१५ मिनिटं हसतच सुटला. त्याला म्हणालो की टिंग्या सोडू नकोस म्हणून. पण तो म्हणाला टिंग्या नाही.. खरच आहेत. मग अशाच काहीच्या काही नावांवर चर्चा आणि खीखी - ख्याख्या सुरु झाली. तुम्हाला माहित आहेत का अशी मजेशीर नावे...?? मनस्वी

सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 14/03/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?

प्रश्नच प्रश्न चहूकडे...

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 14/03/2008 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुळेकाठच्या एका दुकानात एक गिर्‍हाईक येते. दुकानदाराचे लक्ष नाही. गिर्‍हाईक घुटमळते. शेवटी आपल्या दुकानात चोर शिरला असावा अश्या दृष्टीने पाहून दुकानदार वसकन् त्याच्यावर ओरडतो, "क्वाय हवांय?" "अहो, असे अंगावर काय येताय?" "मग काय मुका घेऊ तुमचा?" गिर्‍हाईक ओशाळते. भीत भीत विचारते, "डिक्शनरी मिळेल काय?" "एक का हजार मिळतील, पोटमाळ्यावर हव्व्या तितक्या आहेत." "पण..." "पण नाही आणि परन्तु नाही, आमचा नोकर रजेवर आहे. समोरच्या पेण्टराच्या दुकानातून आणा शिडी आणि घ्या हवी ती शोधून आणि हो, अर्ध्या तासात खाली उतरा. आम्ही रात्री दुकान ८ च्या ठोक्याला दुकान बंद करतो.

तू इथे नाहीस...

लेखक सचिन यांनी गुरुवार, 13/03/2008 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू इथे नाहीस सखये साङ्ग कसे पटणार मला गालान्वरती श्वास तूझा भासतो हळुवार मला पौर्णिमेचा चन्द्र हा की लाजरा चेहरा तुझा चान्दणे की हासणे हे ना कधी कळणार मला स्वप्नात तू भासात तू श्वासात उछ्वासात तू नसणे तुझे असणे जणू होउनी छळणार मला

लग्न

लेखक सचिन यांनी गुरुवार, 13/03/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या लग्नाच्या पन्चविसाव्या वाढदिवसाला त्याला मी विचारले, "लग्न म्हणजे कॉम्प्रमाइज.. हे खरय का ?" माझी कीव करत तो क्षणात उत्तरला, "वेड्या, अशा भ्रमात राहू नको ! खरे तर , कॉम्प्रमाइज म्हणजेच लग्न ! "

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-१

लेखक सुनिल डोईफोडे यांनी गुरुवार, 13/03/2008 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
बायकोसोबत मार्केटिंगला जाणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो... म्हणजे आपापल्या बायकोसोबत. ही गोष्ट कोणीही नाकारु शकणार नाही विशेशत: जर त्यांच्या बायकांसमोर विचारलं तर... मी आणि माझी पत्नी एकदा मार्केटिंगसाठी गेलो होतो. जसंकी नेहमी होतं ती पुढे चालत होती आणि मी आपला मागे मागे... काही घेण्यासारखं आहेका ते बघत होतो. एका दुकानावर लावलेल्या एका जाहिरातीने माझं लक्ष आकर्षित केलं. लिहिलं होतं, " लसून शिलण्याचं यंत्र .... फक्त दहा रुपए'. "यंत्र' या शब्दाने माझी उत्सुकता चाळवली गेली ... तसे तर आजकल कोणत्याही गोष्टीचे यंत्र मिळतात ... मी दुकानदाराजवळ गेलो... त्याला मी ते "यंत्र' दाखवायला सांगितलं...

तुझ्याशिवाय माझे जीवन, आता जीवन उरले नाही.........

लेखक विवेकवि यांनी गुरुवार, 13/03/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
आता मला कळून चुकलंय की सारं काही संपले आहे आता चेह-यावरचं हसूसुध्दा माझ्यावरतीच रुसलं आहे तरीही प्रयत्न करतोय पुन्हा ऊभा राहण्याचा तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवरुन खाली उतरण्याचा आता भोवतालच्या जगात तु हरवली आहेस आणि माझ्या जगात मीच मला शोधत आहे रडण्यासाठी आता डोळ्यात अश्रु उरले नाहीत तुझ्याशिवाय माझे जीवन आता जीवन उरले नाही............ -श्रीकांत लव्हटे ह्या॑ची हि कविता आहे.

अश्रु ....

लेखक विवेकवि यांनी गुरुवार, 13/03/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल अश्रु करतात नेहमीच गांलावर खेळ मग प्रत्येक संध्याकाळ होते सुरेख कातरवेळ तुझा चेहरा आजही मनाच्या आरशात हसत आहे तुझ्या आठवणींबरोबर आजही जगत आहे आठवणींच्या धुक्यात मन स्वत:ला हरवून बसतं मग वास्तवात आल्यावरही स्वत:ला शोधत राहतं नकोत मला तुझ्या आठवणी असं रोजच म्हणतो आहे तरीही तुझ्या आठवणींबरोबर आजही जगतो आहे तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण रोज एकटयानेच अनुभवतो वास्तवाला विसरुन स्वत:ला स्वत:त हरवून बसतो मन म्हणतं ते क्षण तुझ्या नशिबी आले हे काय कमी आहे हाच विचार करत आजही तुझ्या आठवणींबरोबर जगतो आहे तु गेल्यावर वाटलं सर्व संपलं स्वत:लाही संपवून टाकावं पण विचार केला प्रेम अमर असतं मी का त्याला सं