Skip to main content

राजकीय वादळ

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 22/12/2007 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्री. नारायणराव राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्याचे आज वर्तमानपत्रातून समजले. हे सरकार फक्त एका माणसासाठी चालले आहे, असे श्री. राणे यांना समजले आहे. दुसरीकडे श्री. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीत अशा गोष्टी घडतात.. अशी संयमित प्रतिक्रिया दिली आहे. दुसर्‍या कोणी बंडाचे निशाण रोवले असते तर एकवेळ ठीक होते. पण राणे यांचे आव्हान गांभिर्याने घ्यायचे असते हे महाराष्ट्रातील राजकारणात मानले गेलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? नेतृत्वबदल होईल? जर नेतृत्वबदल झाला नाही तर सगळे प्रश्न आपोआप संपतील.

भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)

लेखक सागर यांनी शुक्रवार, 21/12/2007 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कर यांच्या आर्य चाणक्य यांच्यावरील विष्णुगुप्त या कथेमुळे मला माझ्या एका जुन्या कथेची आठवण झाली. ती संपूर्ण येथे देत आहे... (संपूर्ण) - o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o - भाग १: चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे.

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना - कविता

लेखक सागर यांनी शुक्रवार, 21/12/2007 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना मीच अथांग होऊन जातो... तुझ्या हसण्याचा आनंद घेताना मीच आनंदून जातो ... तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना मीच गुंतून जातो ... तुला स्वप्नांमध्ये हरवलेलं पाहताना मीच हरवून जातो ... तुझ्या हाताला स्पर्श करताना मलाच तुझा स्पर्श होतो ... तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... - सागर
Taxonomy upgrade extras

पाखरु : भाग १ (कविता)

लेखक सागर यांनी शुक्रवार, 21/12/2007 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकराला प्रेयसीपासून तोडून दूर कोठेतरी पाठवले... तेव्हा प्रियकरास पक्ष्याकडे पाहून त्याची आणि आपली अवस्था सम वाटली... त्या अवस्थेचे वर्णन म्हणजे हा पाखरु कवितासंग्रह.... सगळ्या कविता देत नाहिये... पण सुरुवातीच्या ३ कविता देत आहे... या संग्रहाचे विशेष म्हणजे सर्व कविता या एकाच मनोभूमिकेतून लिहिल्या आहेत....की दूरदेशी प्रियकराच्या मनात कोणते विचार प्रकटतात....
Taxonomy upgrade extras

मला आलेले एक सुन्दर इ मेल...

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 21/12/2007 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक मेल आले. ते खूप छान वाटले म्हणून शेअर करत आहे. ते असे.... एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... असा वाटण्याची जागा मग, मूल झालं की ... मोठं घर झालं की... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो. मुलांच्या वाढत्या वयात , त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं. आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...

नवा चित्रपट "दस कहानियाँ :- सिनेमा जगताची पण २०-२० !!!

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 20/12/2007 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
या चित्रपटाच्या प्रदर्शानानंतर चित्रपटस्रुष्टी सुध्धा नव्या साचात बदलत आहे याची जाणीव होते. याच्या आधी "डरना मना है, सलामे इश्क" यासारख्या चित्रपटातून हे प्रयत्न झाले पण प्रत्येक कधेचा कही ना काही धागा शेवटी एकत्र आला. पण "दस कहानियाँ " हा एकदम वेगळा अनूभव आहे. दहा वेगवेगळ्या कथा, एकाचा दुसरीशी काहीही संमंध नाही हे वेगळेपण. माझा नजरेने घेतलेला आस्वाद ....... *** मॅट्रोमोनी **** एका कंपनीच्या अति कार्यमग्न असणार्‍या "वाईस प्रेसिडेंटच्या" पत्नीची ही कथा. एकटेपणाला कंटाळलेली ही पत्नी मग स्वताच वेगळा मार्ग शोधते. अर्थातच पतीला अंधारात ठेवून.

एक दिवा

लेखक मनोज यांनी गुरुवार, 20/12/2007 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवा इवलासा रोज रात्री पेटायचा अंधार ठेऊन स्वतः खाली प्रकाश मात्र वाटायचा मला नवल वाटायचे अन नाही कळायचे असे काही वागुन याला नेमके काय भेटायचे? मी त्याच्या जवळ गेलो आणि हा प्रश्न केला त्याने एका ओळीतच मला 'ब्रह्मोपदेश' दिला दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" तेव्हा होशील तू अन तुला मोक्ष मिळेल....

मला कसा हा म्हणतो मेला....

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 20/12/2007 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अगस्ती यांची कविता हात तुझा हातात...... मला कसा हा म्हणतो मेला.... क्षणभर दे मजला लाज वाटते अता तुला तर....नंतर दे मजला नकोस बांधू कुंपण कारा स्वतः भोवती तू भेटण्यास जर वेळ नसे तर, ...... नंबर दे मजला सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?? आनंदाने जगण्यासाठी....

वहाणा

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 20/12/2007 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध मराठी कथाकार कै. जी ए कुलकर्णी यांची एक "वहाणा" नावाची एक कथा आहे. त्यांच्या सर्वच कथा मला आवडतात ; पण ही विशेष. ही कथा आत्मकथनात्मक आहे. एका औषध-विक्रेत्याचे (मेडीकल् रीप्रेझेन्टीटीव्ह) हे एक निवेदन. या कथेची महत्ता समजून घ्यायला ती कथा मुळातूनच वाचायला हवी. त्या कथेच्या एका महत्त्वाच्या बिंदूपाशी निवेदक म्हणतो : "सार्‍या प्रवासभर टिकतील अशा वहाणा काही मला मिळाल्या नाहीत ! इतका प्रवास केला आणि इतक्या वहाणा बदलल्या , पण शेवटी माझे पाय अनवाणीच राहिले." परवा ही कथा (कितीतरीव्यांदा ! ) वाचत होतो आणि हे वाक्य मनात राहून गेले खरे.