बोलीभाषेची गोडी
लोकहो !!!
मागे श्री. नामदेव ढसाळ यांच्यावरील लेखनाच्या अभिप्रायात "गोलपिठा' हा मैलाचा दगड या शब्दावरून काही चर्चा झाली.
आता मैलाचे अंतर कोणी वापरत नाही आता किलोमीटर आले. त्यामुळे मैलाचा दगड हा शब्द टाकाऊ झाला आहे असा सूर तिथे दिसला.
लोकहो, एक लक्षात घ्या की भाषेला सौंदर्य हे परंपरेनुसार येत असते. सर्वसामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो ती खरी भाषा असते. ती खरी सुंदर असते. कारण ती थेट माणसाच्या हृदयातून आलेली असते. तिला मेकअप केलेला नसतो.
त्यामुळे काही वस्तूंची परिमाणे काळानुसार बदलली तरी भाषेने स्विकारलेले शब्द अत्यंत शुद्ध स्वरूपात राहतात.
मिसळपाव