Skip to main content

निवेदन...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 14/12/2007 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आजपर्यंत पंचायतसमितीच्या कामामध्ये तसेच येथील लेखन संपादित करण्यामध्ये मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही/करत नाही हे सर्वप्रथम नमूद करतो. आणि तसं मी अनेकदा जाहीरपणे सांगितलंही आहे! आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर अवश्य ठेवा किंवा ठेवू नका, ही आपली मर्जी! आपण जर येथील काही लेखन पुन्हा एकदा चाळलेत तर माझी थट्टामस्करी, माझ्यावर जाहीर आरोप, असले अनेक प्रकार इथे केलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व लेखन आजही येथे शाबूत आहे!

उत्तरे

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 14/12/2007 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
सर्किटकाकांना कबूल केल्याप्रमाणे माझ्यावरील आरोपांची स्वतंत्र उत्तरे या लेखाद्वारे देत आहे - सर्वश्री गा. बापूसाहेब, 'विनोद' या लेखावरील प्रतिसादात विनाकारण आणि अनाकलनीयरित्या आमचा उल्लेख 'पुचाट'असा केल्यावर, शेपूट घातलीन म्हटल्यावर तुमचा उल्लेख आमच्याकडून होता कामा नये, अशी धमकी देण्याचा अधिकार तुम्हाला राहत नाही. सबब, अशी धमकी देण्याआधी आधी स्वतःचे कर्तृत्त्व कसे कुठे पाजळले आहेत, हे बघावे :) कसें? सर्वश्री सर्किटकाका, तात्यांनी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याचे खापर माझ्या प्रतिसादांवर फोडू नये.

यातना

लेखक सहज यांनी शुक्रवार, 14/12/2007 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
कळतील कुणा यातना होतात आमच्या मना मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना पंचायत-मालक कोण कूठे समजेना कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा लेखन-वाचनाचा आनंद मिळेना साहित्यप्रेमाच्या मोठ्या वल्गना माय मराठी काय म्हणेल कोणास नाही याची तमा
Taxonomy upgrade extras

सोडुन गाव मी माझा ...

लेखक मनोज यांनी शुक्रवार, 14/12/2007 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
सोडुन गाव मी माझा उडून आलो यैसा पश्चिम स्वप्न उराशी अन डोळ्या समोर पैसा प्रफुल्ल रान ते हिरवे अन २० घरांची वाडी विसरून पार ते गेलो भरधाव हाकतो गाडी बेधुंद रांगडा पाउस कस्तुरी गंध मातीचा ते हरवून बसलो सगले आवडे श्वास येसीचा त्या पारावरच्या गप्पा जोश्यांची सुन्दर पारू मिटउन टाकले सारे जोडीला डिस्को अन दारू ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी

शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! ..१

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 14/12/2007 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, ख्याल गायन, ज्याला 'ख़याल गायन' असेही म्हटले जाते हे आपल्या भारतीय अभिजात संगीताचं, विशेष करून हिंदुस्थानी रागदारी संगीताचं एक प्रमूख अंग आहे. मैफलीत गाताना गवयाकडून ख़याल (यापुढे ख्याल) गायला जातो, तसाच तो श्रोत्यांकडून ऐकलाही जातो. आता ख्याल किंवा ख़याल म्हणजे विचार. 'आपका क्या ख़याल है', किंवा 'आपका क्या विचार है' हे संवाद आपण नेहमी ऐकतो. मग मंडळी, आता दोन मुख्य प्रश्न असे पडतात की, १) अभिजात संगीतातला 'ख्याल' म्हणजे काय? २) आणि जर तो 'ख्याल' असेल तर तो कसा मांडतात?