Skip to main content

मायदेशी जाताना..

लेखक प्राजु यांनी रविवार, 04/11/2007 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
यु.एस. ला आल्यानंतर दर ११ महिन्यानी कंपनी (नवऱ्याची) एकदा भारतात जाण्यास परवानगी देते. तशीच आम्हालाही मिळाली. आणि त्यातून नणंदेचे लग्न ठरले आणि मी आत्याही झाले. भावाला मुलगा झाला. म्हणून आम्ही तिच्या लग्नाला आणि भाच्याच्या बारशाला पोहोचू अशा दृष्टीने बेत ठरवले. दिर-जाऊ कॅनडातून निघणार आणि आम्ही न्युअर्क वरून. पण काही कारणाने नवऱ्याला आमच्यासोबत यायला जमणार नव्हते. तो नंतर ८-१० दिवसांनी निघणार होता.

मी पाहिलंय...

लेखक प्राजु यांनी रविवार, 04/11/2007 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
इथे आजकाल 'फॉल' (पानगळ) वर खूप कविता येत आहेत. म्हणून वाटले आपणही ही कविता प्रकाशित करावी.
Taxonomy upgrade extras

एस. डी. - लताची सर्वोत्कृष्ट पाच गाणी

लेखक नंदन यांनी रविवार, 04/11/2007 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यातच एस. डी. बर्मन यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले. हिंदी चित्रपट-संगीताचा सुवर्णकाळ म्हणता येईल, अशा पन्नास ते सत्तरच्या दशकांत एस. डी. आघाडीचे संगीतकार होते आणि लताबाई आघाडीच्या पार्श्वगायिका. यूट्यूबवर भटकताना एस. डीं. नि संगीतबद्ध केलेली आणि लताबाईंनी गायलेली काही गाणी सापडली, त्यातलीच आवडती पाच येथे देत आहे. कृपया केवळ स्मरणरंजन म्हणूनच या लेखाकडे पहावे, कारण या गाण्यांच्या सांगीतिक बाजूबद्दल काही लिहावे एवढा माझा वकूब नाही. १. तुम न जाने किस जहाँ में खो गये लताचा एकविशीतला, कोवळा दुःखाने ओथंबलेला आवाज केवळ ऐकत रहावा असा.

फॉल २००७

लेखक लयभारी यांनी रविवार, 04/11/2007 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
असा गाफिल होऊन चालू नकोस हे बघ, फक्त रंग बदलतायेत माहितीये झाडांचे कसे पारे उडालेत वाटतं पार कायापालट झालाय असलं हे नेहमीचंच बरं-का चांगलं हिरवं भरलं रान असतांना रुसून सन्यासाची करायची सोंगं मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे मग बर्फांचे फवारे लागले थंडीनी चांगली जरब आणली की येईल जरा डोकं ठिकाणावर हळूच चढेल पुन्हा खराखुरा रंग अरे सोंगं कधी टिकत नाहीत मी कधीच फसलो नाही, सांगतो तू ही जास्तं भाव देऊ नकोस त्याचं हे असं नेहमीचंच आहे...

पत्रके

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 03/11/2007 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
"अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना", एक लहान मुलगा मला म्हणत होता. दुपारी बेल वाजल्यावर मी दरवाजा उघडला. समोर दोन ८/१० वर्षांची मुले एका पिशवीतून काही कागद काढत होते. त्यातील एक मुलगा मला म्हणाला "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना". मला हसू आले. त्या मुलाचे वाक्य मार्मिक होते. मी तो कागद घेण्याकरीता वाट बघत होतो. पत्रक हिंदीत होते. "क्या पटाखे फोडना जरूरी है?" ह्या संबंधी. मला त्या मुलाच्या वाक्यावरून पत्रके (किंवा जास्त करून जाहिराती) आणि ते वाटणारे आठवले.

सिंडी क्रॉफर्ड!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 03/11/2007 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपल्यापैकी अनेक मंडळी ही सध्या अमेरिकेत राहतात. त्या सर्व मंडळींना माझी एक विनंती! मला अमेरिकन नटी आणि मॉडेल सिंडी क्रॉफर्डचा घरचा आणि मोबाईल नंबर हवा होता! :) आपल्यापैकी कुणी जर तो मला शोधून दिला तर त्या व्यक्तिचा मी आभारी राहीन. गेले बरेच दिवस मी हे आपल्याला विचारीन विचारीन म्हणत होतो, आज सवड मिळाली! त्याचप्रमाणे सिंडीबद्दल इतरही काही खाजगी माहिती कुणाला द्याविशी वाटली तर तीही इथे अवश्य द्यावी. कृपया तिच्याबद्दल सर्वांना माहिती असलेली माहिती (उदा तिची वेबसाईट, विकी इत्यादी) इथे देऊ नये ही विनंती, कारण गुगलवर सिंडीचं नांव टाकल्यावर २५,२०,००० पानं उघडतात!

सायबर क्राइम - काळजी घ्या

लेखक कौटील्य यांनी शुक्रवार, 02/11/2007 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच नासिकअपडेट वर वाचलेली बातमी क्रुपया योग्य काळजी घ्या http://nasikupdate.com/node/440 बातमी खालिलप्रमाणे ---------------------------------------------------------------------------------------- नाशिकमध्ये सायबर क्राईमचा शिरकाव; उद्योजकाच्या नावाने बनावट मेल; गंडा घालण्याचा प्रयत्न फसला मी नायजेरियात आलो आहे. माझी पैशांची बॅग टॅक्सीत राहून गेली, आता भारतात परतण्यासाठी मला दोन हजार डॉलर तातडीने पाठवा....

बातमीतील अवतरण चिन्हांचे महत्व

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 02/11/2007 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
दैनिक सकाळ दि.२ नोव्हे. २००७
एकट्यानेच "समाजसेवा' केल्याने "घाट्या'तील "वाटे'करी संतापले!
पुणे, ता. १ - ठरलेल्या "वाट्या'त "घाटा' झाल्यामुळे महापालिकेतील एका समितीच्या माननीयांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाल्याची चर्चा सध्या महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. ....... "दिलेला शब्द पाळा,' असा इशारा इतरांनी दिल्यामुळे तेथील प्रमुखांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

एक तत्व नाम

लेखक विकास यांनी शुक्रवार, 02/11/2007 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या संतसाहीत्यात "नामाचा महीमा" सांगीतला आहे. एखादे नाव सतत घेतले तर त्यात तसे नाम घेणारी व्यक्ती आंतर्बाह्य समरस कशी होऊ शकते याचे हे उदाहरण :-) --------- सोनियांनी देशासाठी गोळ्या झेलल्या - कोडा [ Thursday, November 01, 2007 05:44:44 pm] रांची मटा ऑनलाइन वृत्त सोनिया गांधी यांनी आपल्या देहावर गोळ्या झेलून देशासाठी प्राणाची आहुती दिली, त्यामुळे आपण सोनिया गांधी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, अशी गोंधळलेली आदरांजली झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांनी वाहिली.