Skip to main content

आधुनिक युधिष्ठीर

लेखक जुना अभिजित यांनी शुक्रवार, 02/11/2007 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
ही बातमी पहा: http://www.esakal.com/esakal/11022007/SpecialnewsF062EE1421.htm महाभारत आणि रामायण यात एक मूळ फरक सांगीतला जातो. रामायण हे देव, देवाचा अवतार, आयडीयली लोकांनी कसं असायला हवं वगैरे वगैरे रामराज्य वगैरे वगैरे सांगतं आणि महाभारत हे मनुष्य स्वभाव, षडरिपु, असं असताना माणसाच कर्तव्य काय वगैरे सांगतं. कृष्ण तिथे आहे पण तोही कलियुगाला मानतोय. महाभारत आजही चालू आहे. आणि वरच्य बातमीत गावकर्‍यांनी आधुनिक युधिष्ठीराला ५ हजार अजून द्यायला लावून जुगार्‍यांना पळवून लावले हे कदाचित महाभारताचे फलित असावे.

दिवाळी निमित्त अमेरिकन काँग्रेसमधे ठराव

लेखक विकास यांनी शुक्रवार, 02/11/2007 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू अमेरिकन फांऊंडेशनच्या प्रयत्नाने अमेरिकन काँग्रेस (३५८-०) दिवाळी निमित्त ठराव संमत झाला. तसाच ठराव हा सिनेटमधे पण आहे आणि तो अजून मतदानास येयचा आहे. यात (हिंदू अमेरिकन फांऊंडेश) माझ्या माहीतीप्रमाणे, सर्व अमेरिकेत जन्माला आलेली दुसरी भारतीय पिढी, पेशाने डॉक्टर्स/वकील आणि पॉलीसीमधे कामे करणारी आहेत. या ठरावाची भाषा वाचण्यासारखी वाटली म्हणून येथे जशीच्या तशी इंग्रजीत चिकटवत आहे. मूळ माहीती सारखी आहे फक्त सिनेट/हाऊस मधील ठराव थोडासा वेगळा आहे. 110th CONGRESS House resolution 747 S. RES. 299 Recognizing the religious and historical significance of the festival of Diwali.

माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन )

लेखक kolhapuri यांनी बुधवार, 31/10/2007 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन ) - मिश्टर मिनेश भूभू मध्ये एका आद्य वगैरे संकेतस्थळावर एक मनुष्य केनिया वगैरे देशांवर लिहिण्याच्या निमित्ताने गौरवपर आत्मचरित्रच लिहित होते. आमचाही तसाच प्रयत्न. तुला दोन महिन्याच्या कामाला जकार्ताला जायचय अस साहेबाने फर्मावल्यावर मी म्हनलो बर आहे. तसही मी बर्‍याच देशात फिरलो असलो तरी या भागात कधी गेलो नव्हतो. आणि मला फिरण्याची तर खूपच आवड. माझा स्वभावही बोलका, मनमिळावू. पण जकार्ताशी संबंध आला नव्हता कधी. आणि आला तो मित्रांना तिकडचे टॉम याम सूप करून देण्यापुरता.

तुझ्या एका शब्दासाठी

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 30/10/2007 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या एका शब्दासाठी
तुझ्या एका शब्दासाठी वाट किती मी पहावी तुझ्या एका शब्दामुळे मला कविता सुचावी माझी कविता अधुरी तुझ्या एका शब्दाविना जसा जीव चातकाचा तडफडे थेंबाविना तुझ्या शब्दाचे आभास श्वासाश्वासात गुंतले स्वप्नपाखरासवे मी शब्दशिंपले गुंफले तुझा शब्द येता कानी देहभान हरपले "काव्य झाले तनमन," माझे आभाळ बोलले!!!
Taxonomy upgrade extras

पानगळीचे वैभव

लेखक धनंजय यांनी सोमवार, 29/10/2007 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीचे वैभव ********************************** * मस्त सुस्त महिने ग्रीष्माचे । मंद रात्रिचे, दिन उष्म्याचे दवबिंदूमात्रावर जगती । हिरव्या वल्ली हिरव्या जगतीं * उनाड खारी, त्यांच्या कानीं । कुणी सांगिली, काय कहाणी! खेळ टाकुनि अर्ध्यावरती । दाणा शोधित तुरुतुरु फिरती * दमून दंगुन उन्हात गुंगुन । चराचर जणू निवांत बैसुन - पेंगुळलेला निसर्ग करितो । पेंगुळलेल्या कुतूहला तो * अक्तूबरस्य प्रथमे दिवसे । शिरशिर वारे घेऊनि वळसे झाडाझाडापाशी सांगीं । हेमंत-शिशिर तिष्ठतिं रांगीं * त्या वार्तेने गडबड झाली । नेणति अवघी सृष्टी झाली दिनरजनीचा गोंधळ खासा । उष्

एका शीघ्र कवितेचे दिर्घ काळाने विडंबन !

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 29/10/2007 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
सखे........! जा,आज प्रेमाला रंग चढेना, आपले काय बिनसले ? कधी तरी 'मुक्या'ने हे बोलणारच होतो, वेदनेला अश्रुत जाळणार होतो. सखे ....! तु एकदा ये काय! या शहरातून त्या शहरात, माणसाच्या विचारांच्या वणव्यात, मराठी शब्दांच्या भावविश्वात. त्या संस्थळावरुन या संस्थळावर, 'केशवसुमार' लिहितो !! उभ्या उभ्या !! मिसळपाववर भांडण आपले रंगेना ! वाचून आली तशी निघून जा!

ही ठमा

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 29/10/2007 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा बेसनलाडू यांची गझल पौर्णिमा चिंब भिजली, काल रात्री, घार गोरी ही ठमा पावसाच्या कल्पनेने शिंकणारी ही ठमा भांडण्यांचे रान उठते फक्त थोडे बोलता केवढी बेजार करते बघ पुणेरी ही ठमा! का अशी मम नजर खिळली तिच्या पाठीकडे ओळखू आली कशी ना पाठमोरी ही ठमा? बघ मला, कोजागिरीला अवस वाटू लगली (साजरी हल्ली जरा करते गटारी ही ठमा) राखरांगोळी तुझी बघ "केशवा" होणार ही लागली राशिस आता रोज वक्री ही ठमा!

बँक, खाजगी माहिती व आपण

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 29/10/2007 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १: वेळ रात्री ८ च्या सुमारास. स्थळ: मी रिक्शातून रेल्वे स्टेशन वरून घरी येतोय. मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज. गृ: नमस्कार. देवदत्त का? मी: हो. गॄ: मी xxxx बँकेतून बोलतोय. (फोन नं चेन्नईचा होता म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले) आपले जे हे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे स्टेटमेंट वेळेवर येते का? मी: मागील स्टेटमेंट आले. ह्यावेळचे माहित नाही. गॄ: ठिक आहे. बँकेने आता तक्रार निवारणाकरता फोनवर नवीन सुविधा चालू केली आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. मी: धन्यवाद. गॄ: तुमचा पत्ता पडताळून पाहायचाय. तुम्ही सांगू शकता का? मी: नाही.