लेखकप्राजुयांनी मंगळवार, 16/10/2007 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी,
थोडी स्वस्तुती करते आहे. इथे अमेरिकेत एक इंटरनेट रेडिओ आहे. तिथे मी निवेदिकेचं काम करते. माझे २-३ कार्यक्रम झाले आतापर्यंत. आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे.
पॅसिफिक टाईम सकाळी ७.०० , ११.००
www.eprasaran.com
इथे मराठी चॅनेल.
भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल.
कार्यक्रम मिसळपाव करांनी ऐकावा ही विनंती आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
- प्राजु.
लेखकहरिप्रसादयांनी सोमवार, 15/10/2007 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये "गाढव " हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे.
गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल मुळी जंगलच आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही.
लेखकधनंजययांनी सोमवार, 15/10/2007 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
भास
*****************
चाहुल लागुनि का मी जागे?
पाउल नव्हते तव ते मागे -
शेजार्यांच्या खोल्यांमधुनी
कुणी फिरकते रात्री उठुनी
*
भिंतीवरती एक सावली
कशी उमटली, कुठे धावली
नसे आकृती तव जी आली
टाकुनि झोता गाडी गेली
*
मस्तकावरि स्पर्श कसा हा
गोंजारे मज हात तुझा का?
छे! तो अभ्रा केस हलवितो
पंखा वारा जसा फिरवितो
*
जीभ चटावे काय कारणा?
फुका शोधते तुझ्या चुंबना
जशी लागली सहज ती जरा
सुकलेल्या या बधीर अधरा
*
भास तुझे हे अवतीभवती
क्षणभंगुर तरी भ्रम हे असती
निरसे ना परि, छळे गंध हा
ओतप्रोत तव भिने मंद सा
*****************
लेखकनरेंद्र गोळेयांनी रविवार, 14/10/2007 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोई लौटा दे मेरे
मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: किशोरकुमार, गायक: किशोरकुमार
चित्रपट: दूर गगन की छाँव में, साल: १९६४, भूमिका: किशोरकुमार, सुप्रिया चौधरी, अमितकुमार
अलबेले दिन प्यारे, मेरे बिछड़े साथ सहारे | हाय! कहाँ गये, हाय! कहाँ गये ||
आँखो के उजियारे, मेरे सूनी रात के तारे | हाय!
लेखकविसोबा खेचरयांनी रविवार, 14/10/2007 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून २० वर्षांपूर्वी!
१३ ऑक्टोबरची १९८७ ची संध्याकाळ! त्याचे वेडे असलेले आम्ही काही मित्र त्याच्या अंतयात्रेला निघालो होतो. त्याची अंतयात्रा जुहू येथील त्याच्या राहत्या घरावरून निघून चेंबूरला आरके स्टोडियोत येणार आहे असे आम्हाला कळले होते. आम्ही आरके स्टुडियोपाशी पोहोचलो. तिथे माणसांचा अक्षरश: महासागर पसरला होता. त्याचे आमच्यासारखेच हाजारो वेडे त्याच्या अंत्यदर्शनाकरता जमले होते! थोड्याच वेळात तो सजवलेला 'ट्रक' आला आणि आरके स्टुडियोत प्रवेशला. तेथे स्वत: शोमॅनने दादामुनींचे सांत्वन केले!
परंतु कुणीच बोलायच्या स्थितीत नव्हते.
तो आला होता, त्याने पाहिलं होतं, आणि त्याने जिंकलं होतं!