Skip to main content

.

लेखक प्रियाली यांनी गुरुवार, 25/10/2007 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
.

भूप आणि भूपेश्वरी

लेखक मनिष यांनी बुधवार, 24/10/2007 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीप्रमाणे भूप आणि भूपेश्वरी ह्यातला फरक म्हणजे फक्त कोमल "ध" चा आहे - हे बरोबर आहे का? कोणई दोघांच्याही सुरावटी सांगेल का? "सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?

काय करू?

लेखक उदय ४२ यांनी बुधवार, 24/10/2007 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझी राहती जागा चांगली ऑफर आल्यामुळे विकून टाकली, आणि दुसर्‍या जागेचा शोध सुरू केला. पण त्याच वेळी मार्केटमधले दर वाढल्यामुळे नवी जागा परवडत नाही असे लक्शात आले. आता मी भाड्याच्या घरात राहातोय. मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक त्यात रहातात, असे म्हणतात. माझा कोणता निर्णय बरोबर ते समजत नाही.

बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 24/10/2007 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आठवड्याच्या टाइमह्या नियतकालिकामध्ये इराणचे अध्यक्ष अहमदेनिजाद आनि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ह्या दोघांचा एकत्र अर्धंपान भरुन छापलेला फोटो बघितला आणि काळजात चर्र झाले. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती.

मध्यम ते दीर्घ मुदतीची गुंतवणूक...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 23/10/2007 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, खालील कंपन्यांचे समभाग आम्हाला मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता योग्य वाटत आहेत. साधारणपणे येत्या वर्षा-दोन वर्षांच्या कालावधीत सदर समभाग प्रतिवर्षी ३० ते ४०% परतावा मिळवून देतील असा आमचा अंदाज आहे.

खरी मजा आली ती तोडल्यावर!

लेखक गुंडोपंत यांनी रविवार, 21/10/2007 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे, नियमांविषयी! त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले. मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम. कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच! मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे. मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली. मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम! १.

....जाऊ दे मला !

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 20/10/2007 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या जाऊ दे मला या नितांत सुंदर गजलेचे विडंबन. श्री. प्रदीप कुलकर्णी हे अत्यंत प्रतिभावान गझलकार . आम्ही त्यांच्या गझलांचे चाहते. त्यांची जाऊ दे मला ! ही गझल वाचताच आमच्यातला दिड वर्ष सुस्तावलेला गझलकार खडबडून जागा झाला. आणि हे औधत्य आमच्या हातून घडले. सोड माझा हात... जाऊ दे मला ! मी जरी वाह्यात... जाऊ दे मला ! बायको रागावते हल्ली सखे फार झाली रात... जाऊ दे मला ! भेटण्याआधी तिला थुंकून द्या तोबरा तोंडात... जाऊ दे मला ! जेन्ट्स की लेडीज हे सांगू नका वाजताहे वात...
Taxonomy upgrade extras