Skip to main content

एक वाद्य, तीन पिढ्या आणि दोन संगीतसंस्कृतीचे सीमोल्लंघन

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 16/11/2025 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर आला कीं थंडीची चाहूल लागते आणि चित्तवृत्तीला बहर येतो. पर्यटन, परिषदा, प्रदर्शने, महोत्सव, संगीत समारोह वगैरेंच्या आठवणी मनांत रुंजी घालूं लागतात. वयानुसार फारसे कुठे जाणेयेणे होत नाहीं. आधुनिक तंत्रज्ञानाने संगणक, महाजाल, यू-ट्यूब वगैरे साधनांचा सुंदर नजराणा दिला आणि आकाश ठेंगणे झाले. जाणेयेणे नगण्य झाले तरी महाजालावरची मुशाफरी मात्र अगदी आरामखुर्चीत बसून पण करतां येते. लांबलचक घनघोर पावसाळ्यात चुकला फकीर मशिदीत तसा चुकला सुधीर यू-ट्यूबवर सापडायला लागला. वाट फुटेल तिथें फिरतांना अचानक एखादे अप्रतिम निसर्गदृश्य दिसावे तसे कधीकधी अनमोल रत्नें कानीं पडतात.

कोडी

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 16/11/2025 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
कोडी === -राजीव उपाध्ये १६. नोव्हें २०२५ तो सरळ चालत होता... चालता चालता त्याला आयुष्याने कोडी टाकायला सुरुवात केली. तो कोडी सोडविण्यात मग्न असताना त्याला कुणीतरी धडक देऊन पाडले. तो पडला जखम झाली भळभळा वाहू लागली. मग आजुबाजुच्या लोकांनी त्याला आणखी दगड मारायला सुरुवात केली. त्याला आणखी जखमा झाल्या. पण तरीही त्याने सर्व ताकद एकवटली. नियतीचा धावा केला. धडपडतं परत उठून उभा राहिला. आणि मग... ... ... ... मग त्याने आयुष्याला कोडी टाकायला सुरुवात केली. ती कोडी सोडवता येईनात तेव्हा दगड मारणारे पळाले. त्याला ’शांत’ करण्यासाठी मोठे दगड शोधू लागले.
काव्यरस

गडद अंधार, धुमकेतू आणि तारेच तारे

लेखक मार्गी यांनी बुधवार, 12/11/2025 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
✪ लेमन धुमकेतूचं दर्शन- अविस्मरणीय अनुभव ✪ आकाशगंगेचं पिठुर चांदणं आणि देवयानी आकाशगंगेचा झगमगाट ✪ सौर डाग बघताना सूर्यावरून जाताना दिसलेलं विमान! ✪ डोंगराआडून वर येणारे तारे ✪ जणू विमानाने केलेला कृत्रिम उपग्रहाचा पाठलाग ✪ निबीड अंधारात जणू सावली पाडू शकेल इतकं चमकणारं तेजस्वी ISS ✪ विशेष धुमकेतू आणि उल्का वर्षाव सत्राचं १४- १५ नोव्हेंबरला आयोजन तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे कोणत्याच दिव्याचा प्रकाश येत नाही. आणि हळु हळु रात्र होते आहे. सूर्य मावळून गेला आहे. संधीप्रकाश कमी होतोय. दूरवर दिसणारा तिकोना आणि इतर डोंगर हळु हळु फिकट होत आहेत. अगदी डोंगराच्या मधोमध असलेली ही जागा.

हरवलेला संयम चिंताजनक

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 12/11/2025 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेला संयम चिंताजनक ============== - राजीव उपाध्ये सध्याच्या काळात वैद्यकीय व्यवसाय कमालीचा जिकीरीचा बनला आहे.

वैदिक काळात: स्त्रियांची शैक्षणिक आणि राजनीतिक स्थिति

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 09/11/2025 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, असा प्रचार ब्रिटिशांनी आणि स्वतंत्रता प्राप्तीनंतर ब्रिटिशधार्जिण्या सरकारी तंत्रानेही सतत केला. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधणे अधिक कठीण नाही. मीही त्याची मदत घेऊन वैदिक काळातील स्त्रियांची शैक्षणिक स्थितीबाबत वेदातील उल्लेख शोधले. यथे॒मां वाचं॑ कल्या॒णीमा॒वदा॑नि॒ जने॑भ्यः। ब्र॒ह्म॒रा॒ज॒न्याभ्या शूद्राय॒ चार्या॑य च॒ स्वाय॒ चार॑णाय च। वेदकाळात सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता.

~ गंध धुंद ~

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 06/11/2025 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

धुके असे पडले की

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 05/11/2025 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
धुके असे पडले की धुके असे पडले की धुक्याचा महाल आकाशी सोपान त्याचा असा की त्यावरी उभी तू टोकाशी तू परी अस्मानीची मी फकीर धरतीचा वाट अशी भयंकर मार्ग नसे परतीचा विचार तरी काय करावा ? तोही थांबला तर्कापाशी सोपानावरून खुणवू नको जीवाची होईल तडफड तुजसवे वर जायाचे तर प्राणपाखरू करेल धडपड इथे जगुनी काय करावे ? आता जावे स्वर्गलोकाशी

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 04/11/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

शाळेची वेळ झाली -बालकविता

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 02/11/2025 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेची वेळ झाली चला चला बॅग भरा चला चला डबा भरा शाळेची वेळ झाली शाळेची वेळ झाली एक वही सापडत नाही गृहपाठाचा पत्ता नाही पेन्सिल तर तुटकी बाई पेनामधून गळते शाई शाळेची वेळ झाली अंघोळ म्हणजे दोनच तांबे नुसती बुडबुड जरा न लांबे बाबांची तर चाले लुडबूड टॉवेल मिळेतो माझी कुडकूड शाळेची वेळ झाली डब्यात काय ? पोळीचा रोल आणि दोन बिस्किटं गोल शाळा माझी तिची घाई कित्ती कामं करते आई शाळेची वेळ झाली घाई आमची झाली भारी तोच व्हॅन आली दारी पण आई घे ना पापा नाहीतर करणार नाही टाटा शाळेची वेळ झाली

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला (तरही)

लेखक नाहिद नालबंद यांनी रविवार, 02/11/2025 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची, तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व!
काव्यरस