कूर्ग डायरीज १
कूर्ग डायरीज
बरेच दिवस माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनात होते कि कुठे तरी बाहेर फिरायला जावे पण ठिकाण नक्की होत नव्हते. तसा माझा प्रवासाचा अनुभव मर्यादितच आहे. माझा बहुतेक प्रवास हा माझ्या गावाच्या आजूबाजूलाच जास्त झाला आहे म्हणजे सातारा , पुणे ,सोलापूर आणि कोल्हापूर व कोकण इतकाच. मुळात मला स्वतःला फिरायला खूप आवडते. कॉलेजला असताना पिकनिक आणि ट्रेकिंगमुळे काही पर्यटनस्थळे फिरण्याचा योग्य आला होता , अर्थात तो अनुभव सुद्धा भन्नाटच होता. परंतु गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबासमवेत प्रवास हा मर्यादित स्वरूपाचाच राहिला. त्यामुळे हि सहल प्लॅन करणे थोडे कठीणच वाटत होते.
मिसळपाव