ही वाट भटकंतीची : आठवण आणि उजळणी २०१९
आज २०१९ चा शेवटचा दिवस, या वर्षातल्या घटना मागे वळून पाहताना छान वाटते आहे. लिखानाचे म्हंटला तर राजकीय आणि त्याच बरोबर सामाजिक मुद्द्यांमुळे मी पुन्हा मनातले बरोबर चुकीचे विचार शब्दात उतरवू लागलो... कविता , लेख हे जरी मी लिहित असलो तरी लिखान हा माझा मेन छंद कधीच नव्हता आणि नसेलही.
त्यामुळेच कदाचीत, माझ्या लेखांवरील विरोधी मतांना मी कधी तावातावाने, हमरी तुमरीवर उत्तरे दिली नसतील. आणि हे माझ्या स्वभावाच्या कदाचीत उलटे आहे :).
शब्दांना कदाचीत चेहरा चिकटला की ते अहंकाराचे रुप बनत असावेत ... येथे शब्द, लेख आणि लिखान हे माझे विचार असले, तरी त्यावर माझाच चेहरा उमटला आहे असे माझे मतच नाही.
मिसळपाव