( १ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती
मागच्या आठवड्यात खजुराहो, झाशी, ओरछा अर्थात चांदेला आणि बुंदेला प्रांतात भटकंती झाली.
गाभा
भारतातील परदेशी पर्यटकांची जी आवडती ठिकाणं आहेत त्यात ताजमहाल, गोवा, पॉन्डीचेरी, हरद्वार,वाराणसी,कूर्ग,खजुराहो, अजिंठा,वेरुळ, केरळ आणि राजस्थान राज्ये येतात. मागच्या आठवड्यात यांपैकी खजुराहो पाहण्याचं जमलं कारण तिथे सकाळी सहाला पोहोचणारी इंदौर-खजुराहो गाडी (19663) एक जुलैला (२०१९)सुरू झाली. तसा खजुराहो विमातळ आहेच (५ किमीवर) , दिल्लीची एक गाडी स्टेशनला (८किमी)अगोदरपासून आहे. फक्त खजुराहो न करता त्याला जोडून काय पाहता येईल याचा शोध घेतला.
मिसळपाव