Skip to main content

आत्म्याच्या आठवणी..., - दिखाऊ यजमानीण*

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 17/10/2019 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्श-क्लेमर:-आम्मी भटजी असलो,तरी सदर लेखण हे प्रत्यक्ष वास्तविक तथा वास्तवावर आधारीत नसूण केवळ काल्पनिक मणोरंजणात्मक या प्रकारातले आहे. ते तितक्यानेच-घ्यावे! ,अशी विणम्र विनंती. ------------–---–--------------------------------------------------------------------- (*पौरोहित्य कामात क्लायंटला यजमान म्हणतात व त्याच्या बायकोस यजमानीण) यज-मानीण:- गुरुजी,पोह्यांवर दही वाढू? मी:-वाढा! वाढलं ते तरी किती?तर चांगल्या* मेसमधे वरणभातावर (ग्राहक हक्क संरक्षण कायद्या अंतर्गत)जेव्हढी तुपाची रेघ-ओढतात ना, तेव्हढच!

भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/10/2019 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ|| हाती धरली कावड गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१|| गड झाला हिरवा साथ दिली पावसानं ||२|| घर माझं भरलं धन धान्याच्या राशीनं ||३|| जगण्याची रीत दावली देवी सप्तशॄंगीनं ||४|| नवसाला पावली आई आशीर्वाद दिला तिनं ||५|| पुजा करून ओटी भरीन कुंकू लावीन हातानं ||६|| सगे सोयरे झाले सोबती पायी चालती आनंदानं ||७|| दर्शनाची आस लागली घाईनं उचलते पाऊलं ||८|| कृपा असू द्यावी भक्तांवरी विनवणी करी पाषाण ||९|| सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ|| १७/१०/२०१९
काव्यरस
Taxonomy upgrade extras