India Deserves Better - ६. हसदेव अरण्य, कोळसा खाण, पर्यावरणाचा ह्रास आणि अदानी.
नोटः शेती आणि समस्या या विषयावर लिहिताना, शेतकर्यांच्या बेसिक प्रश्नांनाही सरकार विरोधी अजेंडा, शहरी लोकांच्या करावर चाललेला बाजार अश्या आशयाच्या टीका थोड्याफार प्रमाणात ऐकाव्या लागल्या, परंतु त्यामुळेच शहरी नागरीकाची माणसिकता आणि व्यथा यावर लिहायला घेतले होते, आजपर्यंत मध्यमवर्गीय नोकरदार आणि शहरी नागरीक यांच्या वर जास्त काही लिहिले गेले आहे असे माझ्या वाचनात कधी आले नाही.
मिसळपाव
चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.
जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.