Skip to main content

मसाला मिर्च-मकई

लेखक योगेश कुळकर्णी यांनी गुरुवार, 25/10/2018 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
- एक मोठं मक्याचं कणीस (मधुमका/ स्वीट कॉर्न) - २ मोठ्या शिमला मिरच्या (साधारणपणे २५० ग्रॅम) - २ मध्यम टोमॅटो - २ मध्यम कांदे - ४/६ लसणीच्या पाकळ्या - धणेपूड + जिरेपूड + हळद + लाल तिखट मिळून १ ते १.५ टेबलस्पून - मीठ, चवीला जराशी साखर - फोडणीकरता तेल आणि जिरं अशीच कुठेतरी पाहीलेली रेस्पी पण एकंदरीत प्रकरण चवीला फार जमलंय म्हणून शेअर करतोय इथे. - सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. सिमला जरा मध्यम आकारात चिरावी. - तेलाची फोडणी करून जिरं फुलवावं आणि त्यात कांदा जरा सोनसळू द्यावा; तो तसा झाला की मगच टोमॅटो घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावं - यात आता कोरडे मसाले घालून मिनिटभर होऊ द्यावं.

बघ्याची भूमिका

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/10/2018 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रवर्य मंदार भारदे याची बघ्याची भूमिका आता ‘एकगठ्ठा’ वाचायला मिळणार हे प्रत्यक्ष त्याच्याकडून आणि त्याच्या फेसबुकवरून कळले आणि पुस्तक हातोहात संपल्यामुळे येणारी निराशा टाळण्यासाठी लगेच आॅनलाईन खरेदीसाठी नंबर पक्का करून टाकला. (नंतर कधीतरी तो पार्टी देईल तेव्हा त्यावर त्याची सही घेणार आहे.) भारदे नावाचे हे ‘रसायन’ मला पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच त्याची जबरदस्त ‘किक’ (लहान) मेंदूत बसली होती. या माणसाकडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असल्याने त्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे मला वाटू लागले आणि लोकसत्ताच्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘बावनकशी’ सदरात मी त्यांच्यावर लेख लिहिला.