Skip to main content

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ४

लेखक कलम यांनी गुरुवार, 25/10/2018 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याहून परत आल्यावर शांभवी खूप खुश होती, खूप सारी पैंटिंग्स, अथर्वंबरोबर मिळालेला भरपूर वेळ, त्याच्याबरोबर घालवलेले जादुई क्षण ह्यांनी मंतरलेले सात दिवस कसे गेले हे तिला कळलंच नाही. तसं सांगायचं झालं तर तिच्या डोक्यात अमितच्या प्रस्तावाचं काय करावं ह्याचे विचार चालूच होते पण तरीही कुठंतरी अथर्वने दिलेल्या आश्वासनामुळं ती निर्धास्त होती. शेवटी खूप विचार केल्यावर तिला हे पटलं कि अथर्वने सांगितलेलं काही चुकीचं नाहीये.

कच्च्या टोमॅटोची चटणी

लेखक जेडी यांनी बुधवार, 24/10/2018 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - चार ते पाच कच्चे टोमॅटो चार ते पाच हिरव्या मिरच्या ओले खोबरे (पाव वाटी तुकडा) दोन ते ३ चमचे दाण्याचे कूट १ ते २ चमचा दही थोडा गूळ (एक छोटा खडा ) चवीपुरते मीठ फोडणीसाठी एक चमचा तेल, मोहरी , जिरे , कडीपत्ता कृती कच्या टोमॅटोच्या छोट्या फोडी करून घ्याव्यात , त्यात मीठ, मिरच्या , खोबरे, थोडे जिरे , दही घालून मिक्सरला वाटून घ्यावे . वाटून झालयावर त्यात दाण्याचे कूट आणि गुळ बारीक करून घालावा. वरून जिऱ्या , मोहरी कडीपत्त्याची फोडणी करून ओतावी . चव अतिशय अप्रतिम लागते . फोटो काढण्याचा सोस नसल्याने फोटो काढला नाही.

त्यांचे भोंगे

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 24/10/2018 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
गावात गेलो की नारायण पेठेतल्या दामले काकांची भेट ठरलेली. दोन दिवसांपूर्वी गेलो तेव्हाही त्यांच्या घरी गेलो. पण त्यांच्याशी बोलणे मात्र शक्य झाले नाही कारण आम्ही बोलायला लागलो की मागून डॉल्बीचा मोठ-मोठ्याने आवाज यायचा. शेवटी दामले काकांनी मला खुणेनीच बाहेर जाऊया असे म्हटले म्हणून मी दारात जाऊन थांबलो. ते आतल्या खोलीत गेले आणि दोन मिनिटांनी अत्यंत त्रासिक चेहऱ्याने बाहेर आले. आज एकूणच दामले काका चिंताग्रस्त दिसत होते.

मीटू: कारण तो पुरुष असतो!

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 23/10/2018 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
(अन्यत्र पूर्वप्रकाशित) अस्वीकृती (Disclaimer) 1: या लेखातील काही भाग याअगोदर माझ्या फेसबुक भिंतीवर इंग्रजीत खरडलेला आहे. अस्वीकृती 2: मी कायदा, मानवाधिकार, कामगार हक्क, लिंगसमानता, राज्यघटना यापैकी कोणत्याही विषयाचा अभ्यासक वा तज्ञ नाही. अस्वीकृती 3: हा लेख केवळ एक वाचिक विचारच्छल (Loud thinking) म्हणून वाचावा. यातील सर्व मते ही माझीच आहेत, परंतु त्या दगडावरील रेघा नव्हे. सबळ तार्किक प्रतिवाद झाल्यास मी माझी मते प्रांजळपणे बदलतो. --- शीर्षक कुणाला असंवेदनशील किंवा प्रक्षोभक वाटण्याची शक्यता, पण तसे काही नाही. उद्देश कळ लावून देणे हा नसून एक पर्यायी भूमिका मांडणे हा आहे.

आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 23/10/2018 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला” चाळीशीतील हुंकार साप्ताहिक सदर मुलाच्या अतिकाळजीने अस्वस्थ होतो, मुलं सक्षमपणे बाहेरच्या जगात वावरत असतानाही त्याच्या डोक्यावर ‘हेलिकॉप्टर’सारख्या घिरट्या घालत होतो. आमचं हे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ त्यांच्या आणि आमच्यासाठीही त्रासदायक ठरतंय हे मान्यच करायला तयार नव्हतो आम्ही. काहीची मुलांच्या संगोपनाच्या नादात स्वतःची स्वप्नं मागे पडली होती, तर एखादी सिंगल पॅरेंटींगमुळे स्वतःलाच विसरली होती. एकीनं भरपूर आयुष्य जगलं पण आता तिला रितेपण जाणवत होत.

रफाल - भाग ३

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 23/10/2018 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे https://www.misalpav.com/node/43446 https://www.misalpav.com/node/43450 भाग ३ - संरक्षण खरेदी प्रक्रियेबद्दल थोडेसे आद्याक्षरांच्या शब्द समूहांची यादी AoN - ऍक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी. ASR - एअर स्टाफ रीक्वायरमेंट्स. CAG - कंपट्रोलर ऑडिटर जनरल. CCS - कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. DAC - डिफेन्स एक्विझीशन कौन्सिल. DCS - डायरेक्ट कमर्शियल सेल्स.