हिरवे सोने
एकल्या माझ्या घरट्यात नांदते लाखमोलाचे ऐश्वर्य
माणिक मोत्यांची ना रास तरीही बहरते सुखाचे माधुर्य
दारिद्र्याच्या चिंध्यात लपेटून जाते जीणे
कुजलेल्या छपरातून पाझरते वैभवाचे चांदणे
पोट जाळून घामाच्या धारांनी भिजती राने
फाटक्या स्वप्नांच्या भूमीवर अंकुरते हिरवे सोने
आयुष्याच्या उतरंडीत रीती रीती जिंदगी
जगाच्या भाकरीसाठी लढाया देते बळ अंगी
काव्यरस
शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग १
प्राचीन भारताच्या काळात जे यज्ञ केले जात त्या यज्ञाचे इच्छित फल प्राप्त होण्यासाठी यज्ञ तंतोतंत मुळाबरहुकूम केला जाणे अपेक्षित होते आणि त्यामुळे यज्ञविधीमधील मन्त्रोच्चारण, त्यांचे व्याकरण, शब्दांचे अर्थ कळण्यासाठी व्युत्पत्ति, ऋक्-छन्दांचे ज्ञान, यज्ञास योग्य काळ आणि यज्ञांमधील कृति अशा सहा गोष्टी शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छन्दस्, ज्योतिष आणि कल्प ह्या सहा निरनिराळ्या वेदांगांनी नियमित केल्या गेल्या आहेत. ह्या सहा वेदांगांपैकी कल्प हे वेदांग नाना यज्ञांचे विधि कसे करावेत हे सांगण्यासाठी निर्माण झाले आहे. कल्पसूत्रांचे मुख्यत: दोन विभाग आहेत.
दिवस उजाडता.....
सकाळच्या चालण्याने आरोग्यसंपन्न आयु लाभते असं म्हणतात. पण रात्रीच्या सुखासिन झोपेचे साखळदंड तोडणं फार कठीण असतं, हा अनुभव आहे. त्यातून पुन्हा ह्यात सातत्य राखण्याचे अवघड उद्दिष्ट. मोठ्या कष्टसाध्य यशानंतर अवतीभवतीचं जग मला नव्याने 'दिसू' लागलं. नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाळी वातावरणाने हवेत, सुखदपेक्षा जास्त आणि बोचरा म्हणता येणार नाही असा आल्हाददायी गारवा अनुभवत होतो. दूरवरून जाणार्या गाडीच्या इंजिनाचा भोंगाही, शास्त्रीय संगीतातील पहाटेच्या भूप रागाइतकाच प्रसन्न वाटतो.
देव,धर्मादी संकल्पना-- एंटरटेनमेंट विथ लाईफटाईम वॅलिडीटी.
देव आणि धर्म नावाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे.यावर बर्याच थेअरीज आहेत.पैकी उत्क्रांतीवादानुसार देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.पण ही पण एक थेअरी आहे,याला सर्वानुमते आधार नाही.
मग मनुष्याने मानसिक स्वास्थ देऊ शकणार्या पण
(नोटा)
पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी?
चालः- गे मायभू तुझे मी
नोटा
नोटा कितीक असती
हजार पाचशेच्या
नाही कुणास मुल्य
कागद वाटती साऱ्या
दूरस्थ आयकर विभाग
ठाऊक पाहतो मजला
डोळ्यांत् कॅशियरच्या
अनुकंप दाटलेला
झालो विवश परंतु
बोलणार काही नाही
निःशब्द भावनांना
होळीच साक्षी राही
अत्यंत भित्रे
08112016
पैजारबुवा,
काव्यरस
वाटा
वाटा
वाटा कितीक असती
येती तुझ्याकडे ज्या
नाहीच एकही माझी
परक्याच वाटती साऱ्या
दूरस्थ तूही तेथे
ठाऊक पाहसी मजला
ओठांवरी तुझ्या ही
वसलेला तोच अबोला
वाटे परंतु तरीही
बोलणार कुणीही नाही
निःशब्द भावनांना
आभाळ साक्षी राही
पद्मश्री चित्रे
24102017
काव्यरस
आता ई-बुक मोडी लिपीतही! जाणून घ्या पहिल्या मोडी ई-बुक निर्मिती मागची धडपड
नुकतेच मी मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक वाचले. जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे. ई-बुक वाचून पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे माझ्या पुस्तक परिक्षणाच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले. नेहमी पुस्तक परीक्षणाबद्दल मिपावर लिहीत नाही पण नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे वेगळं आहे म्हणून म्हटलं चोखंदळ मिपाकरांना या बद्दल सांगावं.
माझी पहिली ४२.५ किलोमीटर सायकल राईड
भिंतीवर लटकवलेली सायकल ..., तिच्यामुळे भिंतीवर पडलेले काळे डाग ...!
मनातल्या मनात बडबडत ( आठवले ना...... whats app वरील विनोद ...) मी ते डाग पुसून भिंत स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते.
मग हा घेणार एक पसरट टब... त्यात पाणी .. सायकलचा टायर काढून त्यातील ट्यूब काढून पंक्चर शोधत बसणार. आजूबाजूला पसरलेले दुरुस्तीचे साहित्य! मग पाणी पुसायला, सायकल पुसायला काळी करायला जुनी फडकी मी शोधून देणार! आणि हा सगळा पसारा हॉल मध्ये मांडलेला. त्याच्या परीने नंतर सगळं तो साफ करणार, पण माझ्या मनाला येणार नाही. त्यामुळे मी पुन्हा स्वच्छ करणार.
सायकल मध्ये हवा भर, तिची सीट वर-खाली कर, तिचे हँडल वर –खाली कर ...
आता, 'न्याय' ही संतापला..!
आता, 'न्याय' ही संतापला..!
'तपास सुरु आहे' असं ठरीव आणि ठाशीव उत्तर देणाऱ्या तपास यंत्रणांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. चार वर्ष होतात तरी नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे यांच्या खुनाचा तपास का लागत नाही? दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे? असा सवाल विचारत या दोन्ही प्रकरणातील तपासाची सद्यस्थती न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दाभोळकर- पानसरे हत्येप्रकरणी एका याचिकेवर सुनावणी करत असताना देशातील सद्यस्थतीतवर चिंता व्यक्त करत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
मिसळपाव