.. एक क्षण भाळण्याचा(३).....
मागील दुवा http://www.misalpav.com/node/41677
चला तुमचं चहा पाण्याचं बघु या. आलेल्या पाहुण्याला नुसत्या गाण्यागीण्यावर पाठवलं तर त्या रागावतील. तुमच्या वहिनी हो. बसा हं आलोच मी . आम्ही कशाला कशाला म्हणायच्या आतच ते आलोच असे म्हणत आत गेले.
सुमीत माझ्या कडेच पहात होता. त्याला बहुतेक हे नवीनच होते.
नाथ साहेब हे सुमीतला अगदी सुरवातीला कोणत्यातरी कंपनीत मॅनेजर म्हणून होते. त्यावेळेस सुमीतची त्यांची भेट झाली होती. वाचन ही त्यांची कॉमन आवड. त्यातून ओळख वाढत गेली. चित्रपटाची आवड हेही आणखी एक कारण.
मिसळपाव