Skip to main content

शस्त्रास्त्रांचा बाजार- २

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 30/12/2017 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
शस्त्रास्त्रांचा बाजार- २ अनंताने राहुलला जायच्या अगोदर विचारले कि तुझा स्टॅनफोर्डचा प्रवेश कसा झाला आणि पुढे काय करायचा विचार आहे? त्यावर राहुल हसून म्हणाला आवश्यक त्या ठिकाणी आपले संबंध असले(right contacts in right place) कि सर्व जमते. माझे एम एस झाले कि तेथेच माझी नोकरी ठरलेली आहे त्यानंतर व्हिसा आणि ग्रीन कार्ड. अनंत म्हणाला, 'एवढं सगळं पुढचं कसं ठरवता येईल?" त्यावर राहुल त्याला म्हणाला, "हे बघ तू साधा सरळ आहेस. तुला म्हणून सांगतो आहे. बाहेर कुठेही बोलू नकोस आणि बोललास तर मी कानावर हात ठेवेन.

हुच्चभ्रू एलिट शिरेल्स

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 30/12/2017 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात? हा धागा वाचला आणि मला तो न्यून कि काय म्हणतात तो गंड आला ना राव !! बघणं तर सोडाच वो, कितीयेक शिरेलची नाव बी ऐकलेली न्हाईत. माझी उडी ज्याच्या मध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं अश्या फालतू मराठी शिरेल पासून फार तर हिंदी पर्यंतच किंवा जास्तीतजास्त हुच्च् म्हणजे डब केलेली एखादी ल्युसी. आता आमची अभिरुचीच अशी त्याला काय करणार? आमचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे वाघिणीचे दूध. आम्ही ते भीत भीतच पिलेलो त्यामुळे च्यामारी काय बोलतोय काय बी कळंना अशी अवस्था. हरी पुत्तरचं नाव ऐकलेलं ते सिनेमाच्या संदर्भात.

म्हातारपणाआधीची प्रतिज्ञा

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 30/12/2017 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
जेंव्हा कधी दुखणी मागे लागतील तेंव्हा लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पीडणार नाही त्यांची त्यांना कामं आहेत, माझी मी वेळेवर औषधं घेईन किती वेळा ‘जावं’ लागलं, चर्चा करणार नाही माझ्या दुखण्याची काळजी घेणारे आहेतच त्यांचा मान ठेवेन, पण भार होणार नाही गरज असेल तेंव्हा हक्काने मदत मागेन पण नावडता म्हातारा होणार नाही!

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 29/12/2017 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
भोपळ्यात बसून आपल्या लेकीकडे जाणाऱ्या हुशार म्हातारीची गोष्ट आपण सर्वांनीच  लहानपणी ऐकलेली आहे. तिला अडवणाऱ्या कोल्ह्याल आणि वाघाला ती सांगत असते,"लेकीकडे जाईन तुप-रोटी खाईन जाडी-जुडी होईन मग तू मला खा."  गम्मत सांगू का? आमच्या लाहानपणी माझे आजी-आजोबा अगदी क्वचित राहायला यायचे आमच्याकडे. त्यावेळी माझी आई खरच आजीला आवडणारे पदार्थ मुद्दाम करायची. आजीसुद्धा,'अग कशाला इतकं करतेस?' अस म्हणत पण कौतुकाने खायची ते पदार्थ.

किक भाग ३ ... झंस्कार

लेखक किल्लेदार यांनी शुक्रवार, 29/12/2017 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
किक... भाग १ किक भाग २...नुन - कुन चे साम्राज्य... रंगदुम हे काही नकाशातले ठळक ठिकाण नाही, असायचे कारणही नाही. मग एक जुनाट डाक बंगला, एक लहानसे गेस्ट हाऊस आणि पाच-पन्नास घरटी असलेल्या या आडबाजूच्या ठिकाणी सुखासीन जीव आणायचाच कशाला? पुण्यातल्या एखाद्या प्रथितयश डायनिंग हॉल (किंवा खाणावळ म्हणा हवं तर)मध्ये जाऊन जेवताना जो फील येतो तसाच एखाद्या नावाजलेल्या पर्यंटनस्थळी येतो.

(खुरपणी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 29/12/2017 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा खुरपणी संयम संपला संतापाने, फुलला माझा श्वास लागलात जर मागे माझ्या, घेइन मिपा संन्यास ||१ || इक्षुदंडी कविता लिहिता, धावत येती टवाळ प्रतिसादांच्या उतरंडीने, मन होते किती घायाळ ||२ || पान खाऊन येती दाजीबा पिंकाच्या टाकीत चुळा, चार शब्दही कौतुकाचे लिहीले न माझ्या भाळा ||३ || एकएक प्रतिसाद वाचून माझे अंगअंग शहारले श्वास होतो विग्दद, हे माझे विश्वची न उरले |||४ || प्रतिसादांनी तुमच्या राया स्वत्व माझे हरवले कॅलेंडरी कविता करता माझे भान हरपले ||५ || असेल तुमची प्रीती म्हणूनी, कितीदा दुर्लक्ष मी क

निरोप आणि स्वागत..!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शुक्रवार, 29/12/2017 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप आणि स्वागत..! 'परिवर्तन' हा निसर्गाचा नियम आहे..तो सर्वाना मान्य करावाच लागतो. याच निसर्गनियमानुसार २०१७ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ जवळ येवून ठेपली आहे. भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता असल्याने नवीन विचारांचे, नव-संकल्पाचे स्वागत करण्यासाठी तो नेहमीच उत्सुक असतो. नवे वर्ष आले म्हटल्यावर त्याचे स्वागत आणि त्यानिमित्ताने संकल्प करणे देखील ओघाने आलेच! सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील, आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल..

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग २ - अंगकोर वाटमधील भित्तिशिल्पे.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शुक्रवार, 29/12/2017 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग २ - अंगकोर वाटमधील भित्तिशिल्पे.

भाग १

अंगकोर वाटचे विहंगम दृश्य - विकिपीडियावरून, श्रेय चार्ल्स शार्प

सारंगखेडा यात्रे निमित्ताने घोडा बाजाराचे काही फोटो

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी शुक्रवार, 29/12/2017 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताची यात्रा भरते त्यानिमित्ताने तेथे घोडे बाजारही भरतो तेथील घोडे बाजारातील काही फोटो