Skip to main content

एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति

लेखक शरद यांनी गुरुवार, 04/01/2018 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति श्री. माहितगार यानी त्यांच्या "कुराण आणि हदिथ ..." या धाग्यात * एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति - ऋग्वेद 1.64.46 - meaning wise people explain the same truth in different manners. असा एक सुविचार दिला आहे. wise people explain the same truth in different manners. याला सुविचार म्हणावयास काहीच हरकत नाही. परंतु या वाक्याचा ऋग्वेदाशी काही संबंध नाही असे मी प्रतिसादात लिहले. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न विचारला की ' सत' ला आपण ऋग्वेदातील वर्णित देवतां अग्नी, सोम, वरुण.. पर्यंत आपण मर्यदीत करू इच्छित आहात का ? आता याचे उत्तर दिले पाहिजे.

पुणे ते लेह (भाग ७ - सोनमर्ग ते झोजिला वॉर मेमोरियल (गुमरी))

लेखक अभिजीत अवलिया यांनी गुरुवार, 04/01/2018 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
३१ ऑगस्ट भल्या सकाळी कडाक्याच्या थंडीत सोनमर्गच्या एकमेव रस्त्यावर फिरून आलो. भारतीय सैन्याने बांधलेले एक सर्व धर्म प्रार्थनास्थळ आहे इथे. भगवान शंकराचे मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा एकत्र आहेत. एका सैनिकाने तिघांचीही पूजा करून प्रसाद दिला.

इतिहासाचं वर्तमान

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 04/01/2018 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वज्रलेप इतिहासावर उभा आश्वासक वर्तमान? निळ्या-भगव्या दगडांचे भागधेय सेम भगव्या-निळ्या डोक्यांवर बिनचूक नेम खळ्ळ खटॅक- खळ्ळ खटॅक : किडुकमिडुक चक्काचूर भक्क पिवळा आगडोंब : काळा धूर सर्वदूर १४४ कलमाच्या निगराणीला खाकी बंदूकदस्त्यांचे कुंपण पांढर्‍या बगळ्यांच्या अश्रुंचे इथेतिथे मतलबी शिंपण आलबेल इतिहासखपली कोण आत्ता खरवडतंय? सांभाळा, खाली आरपार सडकं वर्तमान वाहतंय
काव्यरस

प्रवास

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 04/01/2018 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
घरी चाललो मी आज आसावला प्रवास भर समूद्रात टाकले होडके किती योजने वाहलो खास होते काही प्रयोजन अन काही उद्देश पण तरंगण्याला न लागले सायास स्वार्थाने जाळे टाकले जीवनी अनूभवाचे आले मासे त्यात जेथून आलो तेथेच चाललो आसावला प्रवास - पाभे
काव्यरस

थोडेसे गीतेबद्दल ...

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 03/01/2018 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे दोन लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी! त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! - निमिष सोनार * * * || लेख क्र १ || * * * कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच "भगवदगीता" सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "कर्म कर पण ते करतांना फलाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे त्या फलाशी तू बांधला जाऊन तुला ते फळ भोगावे लागणार नाही!

जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंग

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 02/01/2018 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंगची‌ योजना जानेवारीमध्ये जम्मू- कश्मीर राज्यातल्या लदाख़ क्षेत्राचं‌ तपमान -२० ते -२५ इतकं‌ कमी होतं. तेव्हा ह्या प्रदेशाचं मुख्यालय असलेलं‌ लेह फक्त विमानाने जगाशी‌ जोडलेलं‌ असतं. अशा वातावरणातही काही पर्यटक तिथे जाऊन तिथल्या हिवाळ्यात फिरतात. लेह आजवर दोनदा बघितलं आहे, पण ते तिथल्या उन्हाळ्यात. त्यामुळे एकदा ते हिवाळ्यामध्ये जाऊन बघायचं आहे. अशा प्रतिकूल वातावरणामध्ये जितकी शक्य असेल तितकी सायकल तिथे चालवायची आहे. लेहच्या जवळपास रस्ते सुरू‌ असतात. त्यामुळे लेहवरून निम्मू आणि शक्य असेल तर खार्दुंगला इथेही‌ सायकल चालवता येऊ‌ शकते.

तू कसला भिक्या? तू तर श्रीमंत्या!

लेखक Jayant Naik यांनी मंगळवार, 02/01/2018 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू कसला भिक्या? तू तर श्रीमंत्या! नदीच्या च्या काठी ,घाटावर नेहमी वर्दळ असे. घाटाच्या थोडे पुढे एक दत्ताचे पुरातन देऊळ होते. सकाळ संध्याकाळ आरतीचे आणि घंटेचे आवाज आसमंतात भरून जात असत. देवळात गेले कि मोठे प्रसन्न वाटे. देवळाच्या शेजारीच एक उंबराचे झाड होते. ते सुद्धा त्या मंदिरासारखेच पुरातन होते. कदाचित मंदिरापेक्षा जास्त पुरातन असावे. त्या झाडाभोवती बसण्यासाठी एक पार कुणीतरी बांधला होता. तो मात्र नुकताच कुणी तरी बांधला असावा. आज त्या पारावर एक साधू महाराज बसले होते. त्यांच्या समोर त्यांचे सात आठ भक्त गण बसलेले होते. स्वामीजी मोठ्या गोड आवाजात भगवत गीतेवर काही भाष्य करत होते.

भुबनेश्वर

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 02/01/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
भुबनेश्वर किंवा त्रिभुबनेश्वर ही ओडिशा राज्याची राजधानी स्वातंत्र्यानंतर झाली. अगोदर कटक होती ती महानदीच्या बेटावर असल्याने जागा अपुरी पडू लागली. ब्रिटिशांनी ही भुबनेश्वरची जागा नियोजित करून बांधायला घेतली. रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागात जुने शहर होते तिथूनच कटक - पुरी रस्ता(NH 203) जातो. पश्चिम भाग हा नवीन भाग. इथे तीन किमिवर विमानतळ, पाच किमिवर मोठा बस स्टँड आहे.( NH 5 ) रस्ते मोठे आणि दोन्ही बाजूस सुंदर इमारती दिसतात. साठ किमिवरच्या जगन्नाथपुरी आणि कोनार्क येथे जाण्यासाठी हे मुख्य शहर असले तरी भुबनेश्वरला स्वत:चे असे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व होतेच.

सांस्कृतिक भारत (संक्षिप्त)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/01/2018 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भारत देशाची राजधानी दिल्ली असून भारताचे सर्वात मोठे शहर मुंबई हे आहे. भारताची आर्थिक राजधानी सुध्दा मुंबईच आहे. देशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,287,263 चौरस किमी इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1,210,854,977 इतकी आहे. (आजची-2017 ची लोकसंख्या 1,293,057,000 इतकी असावी.) भारताची साक्षरता 86.43 टक्के असून राष्ट्रीय अधिकृत भाषा हिंदी आणि इंग्रजी या असल्या तरी देशात त्या त्या राज्यात त्या त्या प्रांतीय भाषा अधिकृत मान्यताप्राप्त आहेत.

अ क्लोथलाईन.

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 01/01/2018 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर.. निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा.. नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट.. आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट, भोकाभोकाचं बनियन.. टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट.. कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट.. चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक.. काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे, त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे दोरीवर वाळत घातलेले कपडे खूप काही सांगून जातात, घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
काव्यरस