Skip to main content

पाथेय

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 31/12/2017 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
पाथेय शुभेच्छा... एक लहानसा शब्द. म्हटलं तर खूप मोठा आणि नाहीच मानलं, तर अगदी बिंदूएवढा. आस्थेने पाहिलं तर आभाळाएवढा; नाहीच असं बघता आलं तर अगदीच नगण्य, नजरेत न भरण्याएवढा. तरीही या शब्दाच्या असण्या-नसण्याला मर्यादांचे तीर धरून वाहणाऱ्या आयुष्यात अनेक आयाम असतात. ते असावेत की नाही, याबाबत कोणास काय वाटते माहीत नाही. पण कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात म्हणून प्रगतीची शिखरे एखाद्याला सत्वर संपादित करता येतात असं नाही. आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात फार काही क्रांतिकारक बदल घडतात असंही काही नसतं.

कोहली आणि भारतीय मानसिकता

लेखक रुस्तुम यांनी रविवार, 31/12/2017 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
थोडा है थोडे की जरुरत है जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है ऐकायला खूप छान वाटतं पण मानवी प्रवृत्ती ह्याच्या अगदी विरुद्ध असते, जरा काही कमी असलेलं चालत नाही. भारतीय क्रिकेटमधली तज्ज्ञ मंडळी तरी सध्या हे अनुभवत आहेत. आणि हे जरूरत असलेलं थोडं त्यांना डोंगऱ्याएवढ्या दुःखाइतकं भासतंय पण डोंगराएवढे सुख त्यांना जवाइतकं हे वाटत नाहीये. पण खरं पाहता त्या सुखामुळे क्रिकेट परत खूबसूरत वाटतंय. तर जरुरत असलेलं थोडं म्हणजे रहाणेचं सध्याचं अपयश.

नींद नही आती बडी लंबी रात है.

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 31/12/2017 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
मला जाग आली. कुठे आहे मी. आणि हे काय कसला आवाज येतोय. बीप बीप बीप बीप एक सारखा. ठरावीक अंतराने येतोय. कुठे आहे मी. हॉस्पिटलमधे असल्या सारखा वास येतोय. कुठे आहे मी. माझ्या डावीकडे तो आवाज येतोय. ठरावीक अंतराने बहुतेक प्रत्येक एक दोन सेकंदाने तो आवाज येतोय. बीप बीप बीप बीप. डोळ्या समोर काहीच दिसत नाहिय्ये. कुठे आहे मी. फक्त एक पांढरा कसलासा रंग. मी डोळे फाडून बघतोय. बहुतेक खोलीचे छत आहे. तो सिलींग फॅन फिरतोय. पण हा त्याचा आवाज नाहिय्ये. मग कसला आवाज आहे हा. आणि मी कुठे आहे? काहीच कळत नाही. कोणीतरी बोलल्याचा आवाज येतोय. " डॉक्टराना सांगायला हवं. नो .

२०१८ मधील काही महत्वाच्या खगोलिय गोष्टी !

लेखक ओरायन यांनी रविवार, 31/12/2017 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! उद्यापासुन नविन इंग्रजी व आंतरराष्ट्रिय वर्ष २०१८ सुरू होत आहे त्यानिमित्त काही मोजक्या २०१८ मधील खगोलिय घटना इथे थोडक्यात देत आहे. १. जानेवारीमध्ये २ पोर्णिमा व १ चंद्रग्रहण आहेत. पहिल्या पोर्णिमेला ( २ जानेवारी, पौष पोर्णिमा ) आपण सुपरमुन बघू शकतो.सुपरमुन म्हणजे मायक्रोमुनच्या आकारापेक्षा १४ टक्के मोठा व पर्यायाने अधिक तेजस्वी चंद्र. हाच सुपरमुन परत माघ पोर्णिमेला म्हणजे ३१ जानेवारीला बघु शकतो. ऐकाच महिन्यात दुसरा सुपरमुन आला की त्याला ंब्ल्यु मुन ं असे पण म्हणतात. २. २०१८ मध्ये ' संपुर्ण सूर्य ग्रहण ' नाही. केवळ २ छोटेसे सुर्यग्रहण आहेत.

अन्नदाता सुखी भव (क्रमशः)

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 31/12/2017 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (अपूर्ण) या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/n

एक पत्र

लेखक मिडास यांनी रविवार, 31/12/2017 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वैष्णवी, आज चुकून पहाटे डोळा उघडला. बाहेर मस्त थंडगार वारा सुटला होता. कशी कोण जाणे पण तुझी आठवण आली मला. थंड हवेत तुझा चेहरा एकदम वेगळाच दिसतो. डोळ्यातून हसणं तू कुठून शिकलीस माहित नाही, पण तुझे डोळे बघितले कि खूप उबदार वाटतं मला.

पानिपत - सदाशिवराव भाऊंच्या वीरकथा

लेखक मनो यांनी रविवार, 31/12/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी श्री. जयंत कुलकर्णी यांनी "सुरजमल जाट आया भाऊके दरबार" अशी पानिपत लढाईवरती तीन भागात लेखमालिका लिहिली होती.त्यात त्यांनी श्री जोशी यांच्या एका पुस्तकाच्या आधारे पानिपत विषयी ज्या आख्यायिका त्या काळात प्रचलित होत्या, त्याविषयी लिहिले आहे. ती लेखमालिका इथे वाचायला मिळेल सुरजमल जाट आया भाऊके दरबार ती मालिका वाचून मूळ पुस्तक वाचायची उत्सुकता खूप वाढली. श्री जयंत कुलकर्णी याना व्य. नि. करून विचारले पण त्यांच्याकडे पहिली पाने गेली असल्यामुळे पुस्तकाचे नाव नव्हते.

अनवट वाट

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 30/12/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
" बापू " कुणी हाक मारली ? वळून पाहिलं , ' अरे हि इथे कशी आणि कशाला हाक मारतेय आपल्याला , ' चवचाल ' आणि कायकाय शब्द ऐकलेत हिच्याबद्दल . उगाच कुणी पाहिलं आपल्याला इथं तिच्या सोबत तर काय बोलतील ? पण आता समोरून न बोलता जाऊ तरी कस ? शेवटी पर्याय नसल्यामुळे तिला समोर जाण्याशिवाय पर्याय नव्हता . "अरे बापू इकड कूठ ? " .... ती " नाही जरा काम निघालं होत म्हणून आलो होतो , पण तू इकडे इतक्या लांब कशीकाय ? "... मी " काय सांगू आणि काय नाही ? चल तिथं चहा घेऊ मग बोलूया कि . "... ती " नाही नको म्हणजे ...