संस्कार आणि संस्कृती
पर्वती पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेलं मध्यवर्ती ठिकाण. मी बऱ्याचदा सकाळी तिथे फिरायला जातो. त्यावेळी योगा करणारी, फिरणारी बरीचशी लोकं तिथं असतात. पण त्यादिवशी मी जरा उशिरा म्हणजे ९-१० च्या वेळेस गेलो. तर तिथे शाळकरी गणवेशातली काही मुलं मुली अगदी प्रेमीयुगलांसारखी बिनधास्त बसली होती. त्यांच्याकडं बघून प्रश्न पडला ह्या वयातल्या मुलांना प्रेम खरच कळतं ? ते समाजातील वास्तव अंतर्मुख करायला लावणार होत. पण आजकालच जर एकंदरीत वातावरण बघितलं तर मोबाईल आणि इंटरनेट चा वाढता वापर आणि ज्या थाटणीचे चित्रपट येतायत हे सगळं प्रामुख्याने जबाबदार आहे.
आनंद नगर
ही कथा दुर्दैवाने काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा वास्तवाशी बराच संबंध आहे. तो लागल्यास निव्वळ योगायोग समजू नये.
आनंदनगरात क्रिकेटची मॅच रंगात आली होती. गणेश ,सुर्याजी विरुद्ध अहमद , सिद्धार्थ असे गट पडले होते.
अहमदची विकेट आधीच पडली होती. बॅटिंग करायला सिद्दार्थ उभा होता. या पठ्याला बॅटिंग जमायचीच नाही. या चौघात तो लहान होता. जी अवजड बॅट त्याला उचलायचाच कष्ट पडायचे त्याने खेळणे खुपच लांबची गोष्ट !
गोलंदाजीसाठी सुर्याजी उभा होता. आपल्या खेळीतून त्याने अहमदच्या टिमसमोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान ठेवले होते.
वलय (कादंबरी) - प्रकरण १
(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या "वलय" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)
कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –
जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या वलयांकित अशा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी असून ही एक पूर्णपणे काल्पनिक कादंबरी आहे. काही अपरिहार्य अपवाद वगळता यात उल्लेख असलेली सिनेमांची नावे, सिनेमाशी संबंधित विविध ठिकाणे, कलाकार, चित्रपट, टीव्ही सिरियल्स, नाटके, थिएटर्स, पुस्तके, लेखक वगैरे यांची नावे काल्पनिक आहेत!
आजकालची पोरं आणि संस्कृती
लेखक - जोकर
गोलूची चहाची कळशी गावांतील सर्वांत प्रसिद्ध अड्डा. त्याच्या बाजूला हनुमान मंदिर आणि समोर सखारामच्या सुनेचे नवीन उघडलेले ब्यूटी पार्लर. ज्या दिवसापासून ते सुरु झाले तेंव्हा पासून गोलूच्या दुकानावरील गर्दी आणखीन वाढली. मी तिथे चहाचा कप घेत माझ्या ऍक्टिवावर बसलो होतो इतक्यांत देवळांतून दर्शन घेऊन येणाऱ्या नानांची स्वारी दिसली. "अरे, हल्ली व्हाट्सअँप वर काही आवाज नाही तुझा?" त्यांनी विचारले. "नाही, परीक्षा होती ना... म्हणून वेळ नाही मिळाला", मी उत्तर दिले.
"काय नाना, तुम्ही सुद्धा त्या व्हाट्सअँप च्या नादी लागलात ?" मागून आवाज आला पाहिलं तर समोर काका पाटील दिसले.
अनवट वाट २
सुरेखा , तिचं नाव येताच मनात कालवा कालव झाली . ती मनात होतीच कायमची पण फक्त माझ्या समोर, पण आज असं दुसऱ्यांकडून ऐकताना बरंच वेगळं वाटलं . खरंच मी थोडं धाडस करायला हवं होत का ? या समाजाला , घाबरून कि इतर काही . कि ते नेहमीचंच लोक काय म्हणतील या विचाराने ? त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे . तेव्हा सगळे नातेवाईक, भावकी या सगळ्याच्या विरुद्ध होती . आणि त्यांचा मान कि मन राखण्यासाठी कि आणखी कश्यासाठी आज आम्ही सोबत नाही . पण हे सगळे तरी कुठायत आता आमच्या सोबत आता प्रत्येकजण आपापल्या कामात , परिवारात व्यस्त आहे आणि मी मात्र त्यावेळी ....
" अहो कधी येणार आहेत साहेब ?
अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण)
अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण)
या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
भाग ६:
क्रीडायुद्धस्य कथा वाहा(ब) जी वाहा(ब)
आपल्याला ड्रामा आवडतो. क्रिकेट असो वा सिनेमा वा लाइफ.... आपल्याला ड्रामा आवडतो. आपला हीरो कसा... हातात बंदुक असली तरी त्याच्या दस्त्यानी हानत हानत १० लोकांना लो़ळवील... पण गोळी नाही घालणार. सरळ समोरच्याला गोळी घालुन मामला खतम केला तर पिक्चरमध्ये मजा काय राहिली? जरा काचा तुटल्या, डोकी फुटली, मानसं हिकडून तिकडं उडून पडली, हाडं मोडली की कसं जरा पैशे वसूल झाल्यासारखं वाटतं. एका टीमनी अमुक अमुक रन केल्या आणि दुसर्या टीमनी तमुक तमुक ओव्हर्समध्ये त्या चेस केल्या अशी साधी सरळ सोपी स्टोरी असलेलं क्रिकेट आम्हाला कसं आवडणार? मग तो पाठलाग कितीही शिस्तीचा का असेना.
महाराष्ट्राच्या ईतिहासातील ऐतिहासिक प्रसंगांबद्दल माहिती हवी आहे.
नमस्कार मंडळी,
मी National Institute of Technology Karnataka, Surathkal येथे संगणक अभियांत्रिकी शिकत आहे. आमच्या येथे दरवर्षी भारत दर्शन नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. त्यामध्ये प्रत्येक राज्यामधून आलेले विद्यार्थी त्या त्या राज्याची कला व संस्कृती सादर करतात. येथील महाराष्ट्र मंडळ देखील महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडते.
यामध्ये आम्हाला (प्रत्येक सहभागी राज्याला) ऐतेहासिक गोष्टींवर आधारित दोन नाटिका सादर कराव्या लागतात.
प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता
मलयगिरीचे वारे वासंतिक वारे चैतन्य नांदे घर-अंगणी
शहरी वारे स्मागी वारे मृत्यू नांदे घर-अंगणी.
काव्यरस
मिसळपाव