Skip to main content

भाग ३: अनवट घाटवाटा, रतनगड-आजोबा परिसरातल्या

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 22/12/2017 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
-- भाग पहिला -- "पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट" --दिवस तिसरा-- आजचा टप्पा कालच्या एवढा अवघड काही नव्हता. एकतर गुयरीदार घाट सोप्या प्रकारातला होता आणि तो उतरायचा होता. त्यामुळे सकाळी थोडं आरामातच आवरलं. समोरच कात्राबाईचा डोंगर दिसत होता. त्याच्या उजव्या बाजूला कुमशेतचा कोंबडा आणि या दोन्हीच्या मधे कात्राबाईची खिंड जाणवत होती. कोंबड्याच्या जवळच सुर्योदय होत होता. . सकाळचे सात वाजले होते सुर्य बर्‍यापैकी वर येऊनही थंडी काही कमी झाली नव्हती आणि गार वारेही वहात होते.

एका अनावर कैफात

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 22/12/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
एका अनावर कैफात लिहिली होती ती कविता नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत? मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली तेव्हा थोडी भुंडी पण थोडी खरीही वाटली ती कविता नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत? मग कापलं सपासप - वायफळ शब्दतण तेव्हा जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा जास्तच खरी वाटली ती कविता नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ? मग खोडायला गेलो दोन चार ओळी तेव्हा ओळीतल्या रिकाम्या जागेतून सण्णकन फणा काढत जिव्हारी डसली ती कविता
काव्यरस

द डेक्कन क्लिफहँगर - चेकर्ड फ्लॅग..!!!!!

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 22/12/2017 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
द डेक्कन क्लिफहँगर..!! द डेक्कन क्लिफहँगर - रेस डे.. ************ देशपांडे मामा.. .

सुमित

यथावकाश निपाणी सोडले आणि मामांनी येणाऱ्या तवंदी घाटाचं शिवधनुष्य पेललं! पुढचा हा टप्पा खरंच फार कठीण होता. मामांच्या वाटेला फार कठीण आणि लांब लांब चढ आले. मामांनी बहुधा एकच बॉटल सोबत घेतली असावी. त्यांची ती बॉटल संपली आणि त्यांनी पाणी मागितलं. रात्रीच्या वेळी चालू कार रायडरला काही देऊ शकत नाही असा नियम होता.

भाग २: अनवट घाटवाटा, रतनगड-आजोबा परिसरातल्या

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 22/12/2017 01:12 या दिवशी प्रकाशित केले.

-- भाग पहिला --

"पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट"

--दिवस दुसरा--

डेहण्यात रात्री उशीरा पोहोचल्यानं सकाळी थोडी उशीराच जाग आली. तरीही सकाळची आन्हीकं उरकून गाडीत बॅगा टाकल्या आणि पाटेकरांकडे नाश्ता करायला बरोबर सव्वासहाला पोहोचलो. नाश्ता करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मंदीरात आरती केली. . . भात तोडणी झाली होती.

भाग १: अनवट घाटवाटा, रतनगड-आजोबा परिसरातल्या

लेखक दिलीप वाटवे यांनी गुरुवार, 21/12/2017 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कळसुबाई रांगेपासून हरिश्चंद्रगडापर्यंतचा सह्यमाथ्यावरचा प्रदेश म्हणजेच कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य. हा भाग म्हणजे निसर्गाने रौद्र सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केलेला प्रदेश. या भागात कितीही वेळा गेलं तरीही मनाचं समाधान काही होत नाही. मग तो अलंग-मदन-कुलंग, कळसुबाई, सांधणदरी, रतनगड-खुटा किंवा अगदी हरिश्चंद्रगड सुद्धा का असेना? याच भागातील सर्वांच्या वडीलधार्‍या असलेल्या 'आजोबांना' भेटण्यासाठी दिवाळीच्या जवळपास जाण्याचं नक्की केलं होतं, तेही कोकणातल्या डेहण्यातुन पाथरा घाटाने. पण सर्वच गोष्टी काही आपल्या हातात नसतात ना. यंदा पाऊस लांबल्याने हा ट्रेक दोन वेळेला पुढे ढकलावा लागला.

जानराव : येका संडासाची कथा

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 21/12/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमदा आमच्या सल्लू भाईची ट्यूबलाइट काही पेटली नाही, पार फ्युज उडाला. लइ बेक्कार वाटल जी. सालभर भाइच्या पिक्चरची वाट पायलीआन असा पचका झाला. सल्लू भाइनच असा पचका केल्यावर आम्ही कोणाचे पिक्चर पाहाचे? आता टायगर येउन रायला हाय. तसा खिला़डी भारी हाय, मस्त फाइटा मारते पण तो बी फायटा गियटा माराच्या सोडून संडासवाला पिक्चर घेउन आलता. ज्यान हवेत उडी मारुन कोणाले हवेतच उचालाच तो संडासात बसाच्या गोष्टी सांगत होता. हे का टाकीजमंधी जाउन पाहाची गोष्ट हाय? आपण तर तवाच ठरवल हे अस पिक्चर पाहाचच नाही. नाही पायल म्या, तिकड भटकलो बी नाही. पण म्हणते ना नशीबात जे असन ते चुकत नाही.

साऊंड डिझाईनिंग

लेखक सर टोबी यांनी बुधवार, 20/12/2017 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
क्षमायाचना: साऊंड डिझाईनिंग बद्दल माहिती मिळेल या आशेने जर धागा उघडला असेल तर आपली निराशा झाली असेल. हा लेख सदर विषयासंदर्भात अज्ञानमूलक असा आहे. स्लम डॉग मिलिओनेरसाठी रसूल पुलकुट्टीला साऊंड डिझाईनिंगचे ऑस्कर मिळूपर्यंत सिनेमासंदर्भात अशी काही गोष्ट असते हे मलातरी ठाऊक नव्हते. कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, निर्माता, डान्स डायरेक्टर, पोस्टर लावणारे, मशीन ऑपरेटर, पडदे ओढून अंधार करणारे आणि उशिरा येणाऱ्यांना कुठे तरी अंधारात सोडून देणारे टॉर्च बेअरर एवढीच सिनेमा संदर्भात माझी माहिती.

भेट - शतशब्दकथा

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 20/12/2017 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती मला भेटायला येणार होती. अजूनही का येत नाही ? दरवेळी ही उशिरच करते. या वेळेस चांगलाच जाब विचारणार आहे मी. मी हा विचार करतोच आहे तेवढयात तिच्या बांगड्यांचा आवाज आला. एखादया महाराणीच्या आगमनाची वर्दी सेवे-याने द्यावी तशीच वर्दी ह्या बांगड्या देत असत. "कसा आहेस ?" "ठीक ..आजही तू उशीर केलास.." ती फक्त हसली आणि आमचा सगळा राग निवळलासुदधा ती काहीबाही बोलत राहिली. मी फक्त ऐकत राहिलो. निर्विकार होऊन मी फक्त पहात राहिलो. "मॅडम आज का टाईम खतम हो गया. अगली तारीख को आना अभी" त्याच्या कमावलेल्या पोलिसी आवाजात हे वाक्य ऐकले तेव्हा आपण प्रत्यक्षात कुठे आहोत याची दुखरी जाणिव झाली..

शेजाऱ्याचा डामाडुमा- मालदीवचा 'जाहिलिया' इतिहास आणि इस्लामी सत्तावतरण - मालदीव भाग ४

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 20/12/2017 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील आधीचे ३ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील  मालदीवमधल्या काही कट्टर इस्लामधर्मीय लोकांच्या मते इस्लामच्या आगमनापूर्वी सगळीकडे 'जाहिलिया' काळ म्हणजे अज्ञान-अनागोंदीचे वातावरण होते. त्यामुळे त्याआधीचा इतिहास हा काही फारसा महत्वाचा नाही. पण तसे अर्थातच नाही. काळाच्या ओघात मालदीवच्या सांस्कृतिक मुख्य धारेला वेगवेगळ्या धर्म-वंश-जमातीच्या लोकसंस्कृतींचे प्रवाह येऊन मिळाले आहेत.