Skip to main content

न्याय झाला, पण...!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 29/11/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय झाला, पण..! मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली.

आप्पा

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 29/11/2017 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श करीत सगळ्यांनी एकदाची आप्पांची तिरडी खाली ठेवली. बबन्या लाकडं रचायला लागला. गावात धड रास्ता नव्हता. एवढ्या लांब कुणाकुणाच्या परड्यातून, कुणाच्या गडग्यावरून तिरडीसकट चढउतार केल्याने सगळेच वैतागले होते. खरंतर बाळ्याच्या वावरातून आणलं असतं तर एवढा लांबचा पल्ला पडला नसता. पण सांगणार कोण ? बापूची जीभ चांगलीच वळवळत होती. "तरी बरा, आप्पा वजनानं हलको व्हतो. भाऊ तू आसतस तर आमचा काय खरा नव्हता." अवाढव्य आकाराच्या भाऊकडे बघत बापू बोलला आणि सगळे चेकाळले. मग कुणाकुणाच्या मयताच्या गजाली चालू झाल्या. बबन्या मात्र गपगुमान लाकडं रचत होता.

शेजाऱ्याचा डामाडुमा - हायो धुआ सलाम - मालदीव भाग २

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 29/11/2017 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग येथे वाचता येईल : http://www.misalpav.com/node/41427 भारताच्या दक्षिण-पश्चिम दिशेला श्रीलंकेजवळ ११९० मोजलेल्या आणि बाकी काही उथळ आणि आकाराने फारच लहान असल्यामुळे मोजता न येऊ शकणाऱ्या अश्या काही प्रवाळ (कोरल) बेटांचा समूह म्हणजे मालदीव हा आपला शेजारी देश. अलौकिक निसर्गसौंदर्याचे दान भरभरून मिळालेला.

डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश मु. पो . सांगला , किन्नर कॅंप्स भाग २

लेखक मालविका यांनी मंगळवार, 28/11/2017 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
चंदिगढ ला भीमसिंग ने आम्हाला वेलकम केले . तिथून पुढे सुरु झाला आमचा सांगला पर्यंतचा प्रवास गाडीने . साधारणपणे १० तासाचा प्रवास आहे . पण आम्ही पूर्ण प्रवास एका दिवशी न करता मध्ये एक रात्र नारकंदाला विश्रांती घेऊन केला . चंदिगढ ते सांगला हे अंतर साधारण ३३५ किमी आहे . दिसायला हे अंतर कमी दिसलं तरी जास्तीत जास्त प्रवास हा अवघड वळणे आणि अरुंद आणि कठीण अशा घाटातून असल्याने प्रवासाला वेळ लागतो . आम्ही गाडीत बसलो आणि आमच्या या लांबलचक प्रवासाला सुरवात झाली . भीमसिंगअतिशय व्यवस्थितपणे , कोणत्याही नियमांचे उल्लंघन ना करता गाडी चालवत होता . एकीकडे आम्हीच त्याच्याशी गप्पा सुरु केल्या .

माचू पिक्चू - भाग ५

लेखक उदय यांनी मंगळवार, 28/11/2017 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६ दिवस ४ आज आम्ही पहाटे ३ वाजताच उठलो आणि ३:३० ला चेकपोस्टला जाऊन बसलो आणि तिथेच सकाळचा नाश्ता केला. आमच्या ग्रुपचाच नंबर पहिला होता. चेकपोस्ट ५:३० उघडतात आणि तेव्हाच इंका ट्रेलचा शेवटचा टप्पा सुरू होतो.

एक कागद

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 27/11/2017 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला एक कागद कस्पटासम ||धृ ।। 
 एक बालक हाती घेई, मायेने मग आकार देई, बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।। 
 उंच विहरता मन स्वच्छंदी, हीन भासली भुतल रद्दी, वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।। 
 वाटे त्यासी उंच उडावे वादळ वारे यांसी भिडावे कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।। 
 इतकी उंची तये गाठली साद मनीची नभी आटली ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।। 
 गगन ठेंगणे खुणवी तारे मांजा परी तो रोखुनी धरे दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।। 
 उंच उंच तो जातच राही स्वानंदी मग

ते...

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 27/11/2017 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ते हायेत आपलेचं असं समजुनं वागलो केला इस्वासं म्हनून असे भिकीले लागलो फोळं ये लोक हाताले असं दयन दयलं पिठं भरुन नेतानी आमी त्याईले पायलं ताट आमच्या नावाचं सफा त्याईनच केलं खाली सांडलं खर्कटं तेई सावळूनं नेलं तेल घालून डोयात केलं पीकाच राखन देठा लांबोला त्याईनं ठुली आमाले आकन शिसी बसले ते आता जीव काताऊनं गेला हेला पखाली चा शेवटी पानी वाहू वाहू मेला

सिंगापूरचा दरवाजा

लेखक विखि यांनी सोमवार, 27/11/2017 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
नाव वाचून तुमच्या डोक्यात आलं असेल ते हे सिंगापूर नाहीये. हे कुठलं परदेशातलं सिंगापूर नसून आपल्याच देशातलं, आपल्याच मातीतलं, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात वसलेलं एक लहानसं ठिकाण आहे. पुण्या पासून 90 एक किमी अंतरावर, तोरणा गडाच्या पायथ्याला असलेलं वेल्हा गावच्या परिसरात हे सिंगापूर वसलंय. ट्रेकिंग मध्ये सक्रिय असलेल्या मंडळींना या गावाची चांगलीच ओळख असेल. 'लिंगाणा' ट्रेक साठी जाताना सिंगापूर हे छोटेखानी वस्ती असलेलं गाव लागतं. कोणताही ट्रेक असो वा ट्रिप असो, भटकंती म्हणलं की बरेचसे सुखद अनुभव हे येत असतात. काही गोष्टी घडतात त्या आपल्या डोक्यात ठाण मांडून बसतात.