एक सल नेहमीच
एक दरवळ नेहमीच
अंगावरून जातो
डोळ्यांदेखत नेहमीच
एक काठ नदीचा भरतो
एक नाव नेहमीच
किनाऱ्याशी थडकते
एक रीत मला नेहमीच, लांबून खुणावते
मी आहे तिथेच बसतो
एक दृश्य नेहमीच, धूळीत साकार होते
एक चंद्रही नेहमीच
खिशात सापडतो
धिटुकली खार झाडावर
सूर्य गिळून घेते
हे जग तेव्हा नेहमीच
वाटाण्याएवढे भासते
एका तळहातावर जणू अलगद मावते
मी आहे तिथून उठतो
एक रात्र नेहमीच, मुंगीच्या पावलांनी येते
एक हसणे नेहमीच
झुळूकीसारखे वाटते
एक नजर नेहमीच
उबदार कानटोपी चढवते
एक गोष्ट नेहमीच
पर्वतासारखी दिसते
एक नीरवता नेहमीच
मला गुंडाळून ठेवते
मी जिथे असतो तिथून चालू लागतो
एक सल नेहमीच, प्रवास होऊ