Skip to main content

संधी मराठीबोलींच्या सर्वेक्षणात सहभागी होण्याची

लेखक माहितगार यांनी सोमवार, 27/11/2017 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य मराठी विकास संस्थेचे प्र. संचालक प्रा. श्री. आनंद काटिकर सरांनी सोशल मिडियावरुन फॉर्वर्ड केलेला संदेश त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे :
"भाषेत रस असलेल्या सर्वांना अर्ज करायला सांगा. उत्तम प्रशिक्षण विद्यावेतनासह आहे. त्यातील निवडकजणांना पुढील संशोधनासाठी ३ वर्षे निवडले जाण्याची शक्यता आहे. एम. ए. मराठीस विशेष प्राधान्य "
अधिक माहिती डेक्कन कॉलेजच्या मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन’ जाहिरात / दुव्यावर आहे.

ती त्सुनामी...

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 27/11/2017 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते प्रलयतांडव ती त्सुनामी आतले उधळून जाते साचले सांडून जाते घडविले उखडून जाते वेचले विखरून जाते मांडले मोडून जाते ....ती त्सुनामी विप्लवी पण केवढे शिकवून जाते !
काव्यरस

हिवाळी भटकंती: सरसगड ( Sarasgad )

लेखक दुर्गविहारी यांनी रविवार, 26/11/2017 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
अष्टविनायकाची यात्रा तशी महाराष्ट्रात लोकप्रिय. यापैकी पालीचा बल्लालेश्वर हे महत्वाचे ठिकाण, कारण या ठिकाणी मुक्कामाची आणि खाण्यापिण्याची चांगली सोय असल्याने, बहुतेकजण पालीला मुक्काम करता येईल अश्या पध्दतीने या यात्रेचे नियोजन करतात. खोपोलीकडून पालीला निघाले, कि पाली येण्याच्या आधी एक सुळका आकाशाकडे झेपावलेला पहायला मिळतो, पाली गावाच्या मागे तर एखाद्या भिंतीसारखा तो उभा आहे. सर्वसामान्य पर्यटक आणि भाविक मोठ्या कुतुहलाने त्याचे हे रौद्र रुप पहातात आणि तिथूनच त्याचा निरोप घेतात.

माचू पिक्चू - भाग ४

लेखक उदय यांनी रविवार, 26/11/2017 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६ दिवस ३ रात्रभर तुफान पाऊस पडला, पण त्यामुळे की काय, आज हवा खूप छान होती. थोडी वाऱ्याची झुळूक पण येत होती आणि ऊन पण चांगले होते (म्हणजे सनग्लासेस वापरावे लागले नाहीत).

Making of photo and status : ८. वाळूवरच्या रेघोट्या!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 26/11/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.

पुणे ते लेह (भाग ३ - शामलजी ते शाहपुरा)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 25/11/2017 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते लेह (भाग 2 - पुणे ते शामलजी) २६ ऑगस्ट आज देखील लवकर तयारी करून ६:४५ ला मंगलमूर्ती लॉजवरून निघालो. ५ मिनिटात शामलजी बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मंदिरात पोचलो.

माचू पिक्चू - भाग ३

लेखक उदय यांनी शनिवार, 25/11/2017 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६ दिवस २ आज सकाळी ४ च्या थोडे आधीच जाग आली. ४ वाजता गरमगरम लेमन टी देण्यात आला. ब्रेकफास्ट करून आम्ही ५:५० ला ट्रेलवर चालायला सुरुवात केली. कालच्या अनुभवातून शिकल्यामुळे मी बॅकपॅकमध्ये फक्त माझे जॅकेट आणि पाणी घेतले होते. कॅमेरा पण फक्त मोबाईल फोनचा होता.

काल: क्रीडति (भाग ४) - ग्रेगोरिअन कॅलेंडर आणि Leap Years.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शनिवार, 25/11/2017 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस. भाग २ - अधिकमास आणि क्षयमास. भाग ३ - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय. आकाशातील गोलांची दैनन्दिन गति हे एक कालगणनेचे निसर्गनिर्मित साधन आहे. त्यांपैकी चन्द्राची दैनंदिन गति ही अन्य कोठल्याहि गोलापेक्षा मोजायला सोपी असल्याने रोमन संस्कृतीच्या शेतीप्रधान काळातील कालगणना चान्द्रमासांच्या होत्या. त्यांमध्ये मार्च ते डिसेंबर असे दहा महिने होते.

Foolपाखरा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 23/11/2017 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात Foolपाखरा का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? कोण? मी? तू जागी आहेस ना म्हणून, मी पण जागतोय . गिरणीच्या पट्ट्यासारखी अखंड बोलतेस कधी कधी वाटतं दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहातेस माझ्या कार्डावर आणि मग उद्या काय खरेदी करायचे?

माचू पिक्चू - भाग २

लेखक उदय यांनी गुरुवार, 23/11/2017 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६ दिवस १ ज्या दिवशी ट्रेल सुरू होणार होता त्याच्या आदल्या दिवशी ओरिएन्टेशन झाले, ज्यात सर्व माहिती देण्यात आली आणि गाईडची ओळख पण झाली. ट्रेलच्या पहिल्या दिवशी सकाळी ३ वाजता उठलो कारण हॉटेलवरून ४ वाजता पिकअपचे ठरले होते.