Welcome to misalpav.com

Thought Experiment No. 3:तळघर

लेखक: भागो | प्रसिद्ध:
मला ते दिवस अजून आठवतात. मी नुकताच बीईची परिक्षा पास झालो होतो. कॉलेजमधेच माझी नोकरी पक्की झाली होती. निकाल लागल्यावर मी तडक पुण्याचा रस्ता पकडला. ऑफिसमधले दोन संटे पकडून आम्ही तिघांनी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पुणेकर कॉलनी”त एक जागा भाड्याने घेतली. पुणेकर कॉलनी”त दोन प्रकारचे लोक रहातात, एक तर म्हातारे, हळूहळू चालणारे, दर दहा पावलांनंतर एक पाउल विश्रांतीचे, थकलेले, वाट पहाणारे, मुलं अमेरिकेत. दुकानात एकमेकांशी बोलताना न्यूयॉर्क, फिला, बफेलो, केम्ब्रिज, टोरांटो. मुलीचे बाळंतपण, इमिग्रेशन, विसा, फराळाचे, पुरणपोळी किती दिवस टिकेल हो, चितळे ह्यांच्याच गोष्टी. दुसरे म्हणजे आमच्या सारखे.


केल्याने होत आहे रे--मोफत वाचनालयवाले दामलेकाका

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
रोज सकाळी फिरायला जाताना महात्मा सोसायटीजवळ मला एका पाराजवळ अल्टो गाडी उभी दिसायची . गाडीत आणि आजूबाजूला १-२ टेबले मांडून त्यावर पुस्तके ठेवलेली दिसायची. कधी कधी एक वयस्कर काका तिथे दिसायचे तर कधी कधी लोकच पुस्तके चाळताना आणि घेताना दिसायचे. हा काय प्रकार असावा? या उत्सुकतेने एका दिवस मी तिकडे वळलो आणि काकांना गाठलेच. b दामलेकाका एक वल्ली आहेत.


‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
जर तुम्हांला बुद्धीला ताण द्यायला आवडतं असेल.आऊट ऑफ बॉक्स साय –फाय सिनेमा आवडतं असेल तर ‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’ हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. मी हा सिनेमा बघण्याचे कारण म्हणजे सात ऑस्कर या सिनेमाने खिशात घातले आहे.तेव्हा पाहायला सुरुवात केलीच.


“ही चोळी कोणाची?”: सुखद दृश्यानुभव

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ? घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ? तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय? आणि शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय? वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट: The Bra. ok विदेशी चित्रपट असल्याने त्याची भाषा कोणती हा महत्त्वाचा मुद्दा.


९९ वर्ष्यानंतर

लेखक: आंद्रे वडापाव | प्रसिद्ध:
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे.


आम्हां काय त्याचे ??!

लेखक: आजी | प्रसिद्ध:
अकरा मे चा दिवस. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. रिटायर्ड केंद्र सरकार कर्मचारी श्रीमती. राधाबाई, सकाळी अकरा वाजल्यापासून टीव्हीसमोर बसलेल्या होता. त्यांचं असं नेहमीच होतं. क्रिकेट मॅच (त्यात भारत खेळत असला पाहिजे हं मात्र! 'इतर' दोन देशातल्या मॅचमध्ये उनको इंटरेष्ट नहीं ।) हां ,तर क्रिकेट मॅच -अगदी बाॅल टु बाॅल-,निवडणुकींचे निकाल,(विधानसभा, लोकसभा, अगदी पंचायत समित्यांचे सुद्धा), कोर्टाचे निकाल, असं काही असेल तर राधाबाई पहाटे उठून, लवकर सर्व आटोपून, शुचिर्भूत होऊन,धूतवस्त्र नेसून,सुखासनात टीव्ही समोर बसत. नजर (नासिकाग्रावर नव्हे तर) टीव्हीवर खिळलेली असे!


पैस भेट

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
काल जागतिक मातृदिन होता. “जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माऊली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच!


एक चावट लेख!!

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी पुण्यात गाडी म्हणजे "स्कुटर". पण ह्या लेखात गाडी म्हणजे "मोटारगाडी" असे वाचावे. तर सहसा प्रत्येक माणसाला गाडी घ्यायची आणि चालवायची हौस असतेच. ठराविक वय झाले की गाडीची गरज प्रकर्षाने भासू लागते. काही जण इतरांची गाडी चालवून आपली हौस भागवून घेतात. पण सगळ्यांचेच नशीब एव्हढे चांगले नसते. त्यांना वाट बघायला लागते. काहीजणांना तर फारच उशीर होतो तर काहीजण त्या फंदातच पडत नाहीत. काहीजणांना गाडीचा इतका वाईट अनुभव येतो की ते प्रतिज्ञा करतात की वेळ पडल्यास टॅक्सीवर काम भागवेन पण पुन्हा आयुष्यात गाडी घेणार नाही. तर मुद्द्यावर येउयात. गाडी घेण्याआधी पैशाची सोय करावी लागते.


ना कर नाटक !

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
नफरत चा बाजारबंद, म्हणाला तो सोनियानंद, मोहबत की दुकाने खुली नाही चालला बजरंगबली अदानीची मोठी ताकद, तर गरीबांची छोटा कद, मोदी-शाह यांची जादू स्वस्त, फूकट्यांचा बांबू गरीबांना नको तो विकास गॅससिलींडरने केला नाश केरल स्टोरीचा ना असर भाजप तू विजय विसर