Welcome to misalpav.com

रौद्रगर्भा वसुंधरा भाग २ : आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग

लेखक: शेखरमोघे | प्रसिद्ध:
या आधीचे संबंधित लिखाण रौद्रगर्भा वसुंधरा भाग 1 (मी १९८३ साली प्रथम जपानमध्ये ज्वालामुखी पाहिला. त्यानंतर इंडोनेशिया आणि न्यूझीलंड या अनेक ज्वालामुखी असलेल्या दोन्ही देशांतील बरेच तसेच अमेरिकेतील काही ज्वालामुखी -कांही कधीही उद्रेक पावतील असे वाटणारे, कांही नुसतेच धुमसणारे, काही सुप्त, काही मृत, काही तरुण, काही वृद्ध - पाहिले.


हा गणितसंबंधित प्रश्न क्रुपया सोड्वुन द्यावा

लेखक: शानबा५१२ | प्रसिद्ध:
एक गणित संबंधित प्रश्न आहे जर एका प्रकारच्या पाच वस्तूंची किंमत १२५ रुपये आहे तर त्याच प्रकारच्या बारा वस्तूंची किंमत किती असेल? हे गणित आपण खालीलप्रमाणे सोडवतो, ५ = १२५. मग १२ =? म्हणून ? = १२५ X १२ भगिले ५ म्हणजे ३०० असे उत्तर येते. या अशाच प्रकारच्या गणितामध्ये मोडणारा एक प्रश्न होता. ही गणितीप्रक्रिया शेअर मार्केटशी संबंधित आहे. समजा मी २५ च्या संख्येमध्ये पहिले ३०० च्या भावाने कॉन्ट्रॅक्ट घेतले.


कोर्टाचे नरो वा कुंजरोवा (अर्थात डबल ढोलकी)

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
खोकेबाज धोकेबाज । इतरा म्हणत गद्दार! स्वत: दिला पदभार। सोडोनिया ।। ठाकरेंनी जरी घातले, सर्वोच्च कोर्टा साकडे, पाऊल पडले वाकडे, भलतेची।। अननूभवी कुणी बनला । निवडणूकीस न उभारता। मालमत्ता अर्ज न भरता। मुख्यमंत्री।। शाह- नानाने मात दिली। भाज्यपाल जरी चूकले। महाविकासआघाडी झूकली। यामुळेचि।। आत्मविश्वास अभाव? अल्पमताची चाहूल? कि अल्पमतीची हूल। राजीनामा!! बंडखोरांची ती सहल। हाॅटेल डोंगर ती हिरवळ। 16अपात्र म्हणे झिरवळ। योग्य होते?! हेटाळले तुम्ही ज्यांना। अलीबाबा,चाळीस चोर। ठरले काळीज शिरजोर। शिंदेशाही।। आपण लाचारपणे। केला असंगासी संग। व सोडला भगवा रंग। खुर्चीसाठी।। नाव गेले,चिन्ह गेले। संपली र


एक सहल: मणिपूर धुमसत नव्हते तेव्हा..

लेखक: चलत मुसाफिर | प्रसिद्ध:
जानेवारी 2022मध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आम्ही मणिपूर राज्याची एक छोटेखानी, चार दिवसीय, रोमांचक रस्ता सहल स्वतःच्या चतुष्चक्रीने केली होती. इंफाळ, लोकटाक व मोरे या ठिकाणी भेट दिली होती व इंफाळमध्ये एका उच्यमध्यमवर्गीय मैती कुटुंबाने चालवलेल्या airbnbमधे राहिलो होतो. मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात उफाळलेला कुकी- मैती संघर्ष हिंसेच्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचून ती सहल पून्हा आठवली. या दुव्यावर इथे माझ्या ब्लॉगवर या सहलीचा प्रकाशचित्र वृत्तांत आहे. इंग्रजीत असला तरी समजण्यास कठीण जाऊ नये. https://chalatmusafir.wordpress.com/2022/01/17/imphal-good-things-come-to-those-who-drive/ धन्यवाद.


रौद्रगर्भा वसुंधरा भाग १ : प्रास्ताविक

लेखक: शेखरमोघे | प्रसिद्ध:
एखादे सफरचंद किंवा एखादा लाल भोपळा आतून खराब तर नाही ना असा जर प्रश्न पडला तर काय करता येईल? चक्क ते सफरचंद किंवा तो भोपळा कापून त्याच्या आंत "डोकावता" येईल. पण जर "पृथ्वीच्या पोटात कांही गडबड तर चालू झालेली नाही ना" असा जर प्रश्न पडला तर? तर काय करता येईल? पृथ्वीचा आकार लक्षांत घेता (सुमारे १२,००० कि. मी. व्यासाचा एक गोल) सफरचंद किंवा भोपळा यांच्यासारखा पृथ्वीचा पृष्ठभाग कापून "थोडेसे" तरी पृथ्वीच्याआंत "डोकावता" येईल?


दोन शशक--मधुसापळा

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
अहो लक्ष कुठेय तुमचे? मी म्हणतेय मुलाकडे सिऍटलला जाऊया. पण तुमचे आपले काम आणि काम .सारखे मोबाईलमध्ये डोके खुपसलेले. जणू सगळ्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावरच. नाही जमणार ग.या महिन्यात दिल्लीला क्वाडची मीटिंग आहे. त्यानंतर युरोपला जायचे आहे. सध्या तर बोलूच नकोस सिऍटलचे. आता हे युरोपचे कुठून काढलेत? तुम्ही तर याआधी कामासाठी कधीच गेला नाहीत युरोपात? आणि आजकाल तुम्ही फारसे बोलतही नाही घरामध्ये. एनी प्रॉब्लेम? आता कसे सांगू हिला? सिमरन मागच्यावेळी बँकॉक मध्ये भेटलेली तेव्हा काय मजा केलेली आम्ही. फोनमधले फोटो पहिले की त्या आठवणी पुन्हा उफाळून येतात. आताही ब्रसेल्सला बोलावतेय.


चाललोय....

लेखक: चक्कर_बंडा | प्रसिद्ध:
काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट, वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे मुरवत चाललोय.... हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं निरखत चाललोय.... देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव नजरेतला नखरा, माळलेला गजरा आठवत चाललोय.... क्षण तुझ्या दरवळत्या अस्तित्वाचे कण तुझ्या विरघळत्या भासांचे दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना जगणं कसलं ???