जोकशाही
- Read more about जोकशाही
- Log in or register to post comments
- 534 views
हा मुख्यमंत्री की
तो मुख्यमंत्री
सामान्यांच्या हाती
वाणसामानाची जंत्री
भाडोत्री बँडवाले अन्
भाड्याचे वाजंत्री
आकड्यांची कुतरओढ
लोक'शाई'ची जोकतंत्री
लोकल ला अजून लटकतात
ट्रॅफीकमधे अजून अटकतात
तरुण नोकरीसाठी भटकतात
शेतमाल दलाल अंग झटकतात
ह्याची वटवट की
त्याची खटपट
सिहासन चित्रपट कि
राष्ट्रपती लागवट?!
हा मुख्यमंत्री की
तो मुख्यमंत्री
जनतेला पडत नाही फरक.
त्यांना रोजचाच झालाय
समस्यांचा नरक !!
मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.