Welcome to misalpav.com

जनोबा रेग्याचे वंशज!

लेखक: kool.amol | प्रसिद्ध:
जर तुम्ही पू लं चे चाहते असाल तर जनोबा रेगे हा इसम/व्यक्तिरेखा तुम्हाला माहिती नाही असे होणे शक्य नाही. बटाट्याच्या चाळीतला एक अफलातून विनोद बुद्धी असणारी ही व्यक्ती. चाळीत खर म्हणजे एकापेक्षा एक नमुने आहेत, पण ह्याची बात काही औरच. ह्या व्यक्तिरेखेची 2 ठळक वैशिष्ट्ये, अत्यंत मोजक्या शब्दात विनोद निर्मिती आणि अफलातून म्हणावी अशी टायमिंग. एखादा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे त्यात सगळे गंभीरतेने चर्चा करत आहेत आणि अशा वेळी अचानकच असं काहीतरी ही व्यक्ती बोलून जाते की त्या प्रसंगाच गांभीर्य समूळ नष्ट होऊन जातं आणि चालू असणारी गोष्ट खरोखरच गांभीर्याने घ्यायची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो.


वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया ( वनौषधी विश्वकोश) म्हणजे काय रे भाऊ

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
तब्बल चार वर्षांनंतर दिल्लीच्या पुस्तक मेळाव्याला भेट दिली. तीन-चार पुस्तके ही विकत घेतली. अचानक लक्ष अत्यंत सुंदर मुखपृष्ठ आणि उत्तम कागदावर छापील वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियावर गेले. माझ्या सारख्याला या पुस्तकातले काही एक कळणे शक्य नव्हते. तरीही वनस्पति विश्वकोशाची विवरणिका मागून घेतली. विवरणिकात वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाची इत्यंभूत माहिती तर होती या शिवाय प्रत्येक खंडाची वेगळी माहिती होती. जगात पहिल्यांदाच हे कार्य ते ही भारतातील एक संस्था करत आहे, हे वाचून गर्व झाला. विवरणिका आणि यू ट्यूब वरून ही माहिती मिळविली. त्या आधारावर हा लेख.


कानात “बसलेले” संगीत

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
मनाला रिझवणाऱ्या गोष्टींमध्ये संगीताचे स्थान फार वरचे आहे. व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच. वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक प्रकारे आपण संगीत ऐकत असतो - मग ती विविध संगीतप्रसारक श्रवणमाध्यमे असतील किंवा प्रत्यक्ष संगीताची मैफिल. कधी आपण शुद्ध वाद्यसंगीत ऐकतो तर बऱ्याचदा गीत आणि संगीताचा सुरेख संयोगही ऐकतो. यांच्या जोडीला अजून एक संगीताचा प्रकार आपल्या कानावर वारंवार पडतो आणि तो म्हणजे संगीतमय जाहिराती.