Welcome to misalpav.com

चिंब भटकंती: लोहगड

लेखक: प्रचेतस | प्रसिद्ध:
लोहगडला आतापर्यंत कितीवेळा गेलोय याची गणतीच नाही. दरवर्षी पावसाळ्यात किमान दोन भटकंती तर येथे हमखास असतातच. घाटमाथ्याजवळ हा सातवाहनकालीन किल्ला असल्याने येथे निसर्गाने अगदी भरभरून दिलेय. यंदा पाऊस तसा उशिराच चालू झाला, येथेही उशिरानेच पण सध्या मात्र तो अगदी धुव्वाधार कोसळतोय. मागच्याच आठवड्यात येथे पुन्हा एकदा जाउन आलो. लोहगडाचे वर्णन तसे बर्‍याच वेळा मिपावर येऊन गेल्याने फक्त पाऊस आणि हिरवाई अनुभवा. १.


एक सुगंधीत जखम…. ती…!

लेखक: वटवट | प्रसिद्ध:
विधात्यानं दिलेलं हे जगणं जगताना प्राक्तनाशी भातुकलीचा खेळ खेळण्याचा खूपदा प्रसंग येतो. प्राक्तनाशी खेळला जाणारा हा खेळ भातुकलीचा म्हणायचा तो एव्हढ्यासाठीच कि तो कधी न कधी संपणारा असतो म्हणून आणि भातुकलीचा खेळ जरी संपला तरी तो तात्पुरताच संपतो... तो कधीच कायमचा संपत नाही. दिवस बदलत जातात. आपण बदलत जातो. ह्या भातुकलीच्या खेळाचं स्वरूपसुद्धा बदलत जातं. पण हा खेळ खेळण्याचं आपण टाळू कधीच शकत नाही. मग हा खेळ खेळताना आपण ठेचकाळतो, पडतो. जखम होते…. जखमाही होतात. काही बर्या होतात. काही बर्या होतायेत असं वाटतं पण नंतर डोकं वर काढतात.


लय भारीचा टाइमपास

लेखक: मित्रहो | प्रसिद्ध:
हा काही लय भारी किंवा टाइमपासचा रिव्ह्यू नाही. तसेही या शिर्षकाचा आणि खालील लेखाचा काही संबंध नाही. मागे एकदा बहुदा महेश माजरेकरांनीच म्हटल्याचे आठवते मराठी सिनेमा हा कंटेन्टवर चालतो. मराठी सिनेमात कंटेन्ट फार महत्वाचे असते. हे खरेच होते. श्वास नंतर मराठी सिनेमाचा प्रवास बघितला तर हेच दिसते. श्वास कधी कोणी अरुण नलावडे किंवा अमृता सुभाष साठी बघायला गेले नाही तर एक वेगळा विषय आणि त्याची वेगळी मांडणी हे त्याचे मुख्य आकर्षण होते. ऑस्कवारी हे जरी एक कारण असले तर त्याचा विषय आणि त्याची सामान्य प्रेक्षकांना पचेल अशी मांडणी हे प्रमुख कारण होते.


हरवले ते गवसले का? व कसे? भाग 7 किस्सा चोराला धोपटल्याचा...

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...


मढे मोजण्याला

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:
मढे मोजण्याला

लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला


मंत्रचळाच्या मागोव्यावर

लेखक: आदूबाळ | प्रसिद्ध:
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का? आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो.


कचरा

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
शनिवार-रविवार म्हणजे मॉल. मॉल म्हणजे शॉपिंग. मॉल म्हणजे खादाडी, अशी समीकरणं आता रूढ झालेली आहेत. ठाणे-मुंबईसारख्या जागा म्हणजे तर या दृष्टीने मॉलामाल आहेत. मोठेच्या मोठे मॉल्स, त्यातली लखलख, चकचक, ब्रँडेड वस्तूंची दुकानं, दालनं हेच शनिवार-रविवारचं डेस्टिनेशन झालेलं आहे. या मॉल्समधून असंख्य लोक पैसे खर्च करायच्या उदात्त हेतूने ओसंडून वाहत असतात. याची ‘शहरातली जत्रा’ यापेक्षा समर्पक व्याख्या मला करता येत नाही. याच जत्रेत येणा-या प्रत्येकाला आनंद वाटावा म्हणून पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे प्रामाणिक मेहनत घेणारे अनेक लोकही असतात. उदाहरणार्थ, सफाई कामगार किंवा हाउसकीपिंग पीपल.


Online Shopping

लेखक: NiluMP | प्रसिद्ध:
Virtual जगात चतुर माणसाने दुकाने थाटली आणि Online Shopping उदयास आले आणि माणसाची Window Shopping ची हौस एका Click वर येउन टेपली. Online Shopping ने इतर Online सोयीप्रमाणे ब-याच गोष्टी सोप्या केल्या पण विश्वासहर्ता संपादन करण्यात अपयशी ठरल्या आहेत खरंच Online Shopping विश्वासहर्त आहे का?, तुमचे चांगले वाईट अनुभव share करा.


विडंबन - धोबिचा कुत्रा

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
बिभीषणाने दिला होता रावणाला हो दगा. बदल्यात त्याला मिळाली सुवर्ण लंकेची हो गादी. गादी साठी त्याने पक्ष आपला सोडला. विसरला होता तो त्रेता नाही कलयुग आहे हो. घरात त्याला आता प्रवेश नाही मिळाला. घाटा वरचा राजा तो नाही झाला. घर का ना घाट का धोबिच्या कुत्र्या सारखा भुंकत-भुंकत आता भटकतो गल्ली बोळ्यात.


हरिहर - एक ट्रेक कथा

लेखक: विअर्ड विक्स | प्रसिद्ध:
गेल्या एक-दिड वर्षात वेळेअभावी दुर्ग भ्रमंती जवळपास धूमकेतूसारखी झाली होती . या वर्षी मात्र त्या सर्वाची भरपाई करायची असे मनात होते. जूनपासून कचकून जवळपास प्रत्येक शनिवार-रविवार दुर्गभ्रमंती करायचीच असा संकल्प सोडला नि तो बऱ्यापैकी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.चला….आत्मस्तुती पुरे झाली. मुद्द्यावर येऊ या ... तसे आम्ही मुंबईकर मुद्द्यावर येण्यास जास्त वेळ लावत नाहीच म्हणा ... असो... दुर्गभ्रमंती करायची हौस तर फार भारी पण ती एकट्याने करण्याइतकी माझी इच्छाशक्ती माझ्या काही मित्रांइतकी दांडगी नाही. (थोडक्यात एकटे जायला ….. समजून घ्या).