Welcome to misalpav.com

दिवा आणि ती

लेखक: अमेय६३७७ | प्रसिद्ध:
सजतानाही थिजलेली ती  रोज मनाचे द्वंद्व मनाशी  भिंतीवरती बापुडवाणा  दिवा एकटा जळे स्वतःशी  बोथटलेली जुनी वेदना  जशी काजळी दिसे दिव्याची जळता अवचित विझून जाणे  हीच वंचना जन्मभराची  अशा तमातुन प्रकाश कोठे  कुणी कुणाचा ना कैवारी दिवा जळो वा शील, सुखाचे    मोल सारखे त्या बाजारी  तिजला ठावे दैव स्वतःचे  आयुष्याच्या सरत्या वाती   जोवर आहे तेल वाहते  दाह सोसणे उरले हाती  -- अमेय


गूढ भाषा नयनांच्या !!

लेखक: बाळअमोघ | प्रसिद्ध:
गूढ भाषा नयनांच्या मृदुल आसवे झेलीत ओंजळ हृदयी जागल्या स्वप्नांच्या .... मौनाहूनही मूक असे हृदयबिंबही तरी दिसे धुंद मनाने छेडीत जाव्या अगणित तारा देहाच्या .... गूढ भाषा नयनांच्या परी कधीतरी अश्रू ढळावे कधी ज्योतीवर पतंग जळावे मनी साचल्या कृष्णघनांतून सरी बरसाव्या दु:खाच्या .... गूढ भाषा नयनांच्या आयुष्याच्या स्वप्नंझुल्यावर शोधीत जावे आकाशी घर डोळे मिटुनी हात गुंफुनी मिठीत मिटावे सजणाच्या .... गूढ भाषा नयनांच्या


कविता : घरची मैफल !!

लेखक: बाळअमोघ | प्रसिद्ध:
घरची मैफल !! मैफल झाली गंधर्वांची अहा काय ते गाणे झाले सूर अजूनही संगीताचे कानी माझ्या भरून राहीले रात्रीच्या त्या दुसऱ्या प्रहरी असा कसा मी असतो गाफील कसे पामरा ठाव असावे सुरू व्हायची घरची मैफल खिसा रिकामा, किल्ली विसरलो आठवतो कालचाच तंटा अन दारावरती वाजवतो मी मैफलीची ही तिसरी घंटा जरा कुठे मज झोप लागली वेंधळ्याची ही जात कशी दारामागून शिव्या देऊनी सुरवातीची नांदी अशी संताप राग हा तार सप्तकी ताल तिखट अतिद्रुत ती लय पाहुनिया आवेश हिचा मज वाटू लागे भलते भय संथ आलापी रुसव्याची ती नंतर ताना कडकड कडकड दमदाटीचे घेऊन तीय्ये बोलतानी तर अशक्य बडबड रौद्र भयाची


सौर-कुन्ड ट्रेक.. फोटोंसहित..

लेखक: तिन तेरा | प्रसिद्ध:
माणसे हिमालयात जाऊन ,भारावून का जातात हे तिथे गेल्याशिवाय समजणं अशक्य आहे. आम्ही 13000 फुटांवर जिथे गेलो होतो तिथे शांडिल्य ऋषींनी तप केलं होतं. जवळच सौरकुंड नावाचं एक कुंड आहे .7000 फुटांवर मानवी वस्ती नाही. रस्ते इथेच थांबतात.आता अधिक वर जायचं तर पाय वाटांवरूनच जायचं, त्याही निसरड्या आणि खड्या!इथले धनगर या 'वरच्या पहाडात' सात महिने मुक्काम ठोकून असतात.बरोबर हिमालयन शेळ्या मेंढ्यांचे कळपच्या कळप आणि भरीला घोडे आणि खेचरं!


गव्हाची खीर

लेखक: wrushali kulkarni | प्रसिद्ध:
साहित्य :-१/२ कप दलिया,१/२ कप गूळ, १/४ कप ओले खोबरे, थोडी वेलची पुड,पाणी. कृती:- प्रथम दलिया भाजून घ्या. आता हा दलिया कुकर मध्ये शिजवून घया. जास्त पाणी घालून भरपुर शिट्या करा (१/२कप दलिया साठी दिड कप पाणी)म्हणजे दलिया छान शिजेल. आता या शिजालेल्या दलिया मध्ये गूळ ,वेलची पुड आणि खोबरे घाला. आणि थोडावेळ मंद आचेवर ढवळा. आता गरमागरम खीरीवर तूप घालून खायला दया. ही खीर काही वेळाने घट्ट होते तर काही लोक त्यावर दूध घालूनही खातात. p1