Welcome to misalpav.com

सार्थक

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
आभार… तिच्या गारस वयाचे ओळखीच्या समयाचे आतर्क्य यमनाचे आणि त्यामुळे छेडल्या गेलेल्या अरूप यौवनाचे ……. !! त्यातूनच उतारावरचं तारुण्य नात्याचं लावण्य शब्दांचा प्रसव आणि भावनांचा दुर्लभ शृंगार लाभला आहे मला … "माझा मी",… "नसूनही असलेली माझ्यातली ती " भेटलीय मला असंख्य वेळा ……. अस्तित्वाशिवाय ……!! या गंधर्व क्षणांमधून जन्मलेली कविताच जिवंत ठेवील मला चंद्र माधवीच्या प्रदेशात तिची प्रतीक्षा करीत चिरंतन …. !! आभार पुन्हा एकदा आमच्या न भेटण्याचे, …… आजन्म ………………. !! …………………… अज्ञात


फरपट

लेखक: जुईचे फूल | प्रसिद्ध:
नशीबाच्या शोधात दूर देशी आलो अन इथवर येऊन परतीच्या वाटाही विसरून गेलो हीच झाडं, हेच वारे, हेच ऋतू आपले पसरलेले हिरवे माळ अन रस्तेही आपले इथल्या मातीत पाय रोवून उभे राहू लागलो पाळामूळांसकट आता इथेच गुंतू लागलो तरीही येतो एक क्षण असाच अडवा तिडवा हृदयात थेट हात घालून घेतो सारा मागोवा फरपट्ल्यासारखा घेऊन जातो पुन्हा घरट्याकडे रक्ताळलेले आपण खोल आत मनामध्ये जखमा तशाच भरून निघतात पण व्रण मात्र तसेच प्रत्येक व्रण एक दूत होतो आठवणींचा पूल होतो आता पाय मातीत रोवूनही त्यात मूळं रुजत नाहीत त्यांनाही कदाचित वाटत असावं ही माती आपली नाही पायाखालची जमिन सरकतानाही रुजल्याचा आव आणतो ही माती ही झाडं हे सारं आपल


गणराया

लेखक: kalpana joshi | प्रसिद्ध:
गणराया प्रथम नमन तुला गणराया, दाखवतो तू वाट भक्तांना आद्य पूजेचा मान तुझा आवडतो तू आम्हाला , संकट काळी धावून येशी, तुझ्या नामातच गोडवा किती ॐकाराचे स्वरूप तू, सर्व जगाचे रक्षण करशी तू चौशष्ट कलांचा,चौदा भाषांचा तूस्वामी दाता, बुद्धी ची देवता तू,सुबुद्धी दे आम्हांस, दुष्टांचा संहार कर,पापांचा नाश कर, तू सुखकर्ता,तू दु;ख हरता, विघ्नांचा तू विनाश करतो प्रसन्नतेचा तू एक आनंद उत्सव, सर्वाना तू आनंद देतो मंगलमय वातावरण निर्माण करतोस. तुझ गूण वर्णन कराया स्फूर्ती येते, सर्व संकटे घेऊन जाते तुझ्या दर्शनाने आम्ही पावन होतो.


मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे

लेखक: शरद | प्रसिद्ध:
मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ? "गीतरामायणा"तील सर्वात उत्कृष्ठ गीत कोणते? बरेच जण बरीच निरनिराळी गीते सांगतील. पण हे ठरवावयास आपण त्या दर्जाचे परिक्षक आहो तरी कां? तेव्हा प्रश्न थोडासा बदलू. तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे गीत कोणते? आता ठीक. कॊणीही उत्तर देण्यास हरकत नाही. तुम्ही तुमचे मत द्याच. माझी पसंती वरील गाण्यास. पतीने त्याग केल्याच्या बातमीची वीज कोसळ्यावर सीतेने जा धीरगंभीरतेने लक्ष्मणाला निरोप दिला आहे तो तिच्या आईचा, धरतीचा, वारसा सांगणारा आहे. सगळा दोष श्रीरामावर लादण्यास वाव असतांना ती केवळ एकदा तसे म्हणावयास सुरवात करते व लगेच थांबते.


केशर -पिस्ता साँदेश / संदेश मोदक खास बाप्पासाठी

लेखक: सानिकास्वप्निल | प्रसिद्ध:
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मिपाकरांना :) साहित्यः एक लिटर फुल फॅट दुध ३-४ टेस्पून पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी - जास्तं) २ टेस्पून लिंबाचा रस १/४ टीस्पून केशर १/४ टीस्पून वेलचीपूड १/२ टीस्पून पिस्त्याचे काप बर्फाचे तुकडे . पाकृ: मध्यम आचेवर कढईत दूध तापवायला ठेवावे. दूधाला उकळी आली की त्यात लिंबाचा रस थोडा-थोडा करून घालावा व सतत ढवळावे. दूध फाटाय


गुळ पापडी.

लेखक: kalpana joshi | प्रसिद्ध:
गुळ पापडी - साहित्य :- एक वाटी कणिक ,तीन चमचे साजूक तूप ,अर्धी वाटी चिरलेला गुळ . इतर साहित्य -वेलचीपूड ,भाजलेला खोबरं कीस,ड्रायफ्रूट चे तुकडे घालू शकतात .