Welcome to misalpav.com

तळलेले फणसाचे गरे

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
....बरेच दिवस मनात होतं या प्रकारा बद्दल माहिती देण्याचं. अता तसं पहायला गेलं तर या पाककृतीला फारशी मोठ्ठी कृती नाह्हीच आहे.पण तरिही मी माझ्या भावाच्या सासुरवाडीला (पावसला) त्यांच्याकडे गरे विकतात हे कळल्यावर, एकदा गेल्यावर पाहिनच कसे करतात ते... असं ठरवल होतं. गेल्यावर्षी अशीच एक उडती ट्रीप तिकडे घडली होती.तेंव्हा मी माझ्या सवयी प्रमाणे याचं व्होडिओ चित्रण (खास माझ्या पद्धतिने) करुन ठेवलं होतं. त्यात काल ख.फ.वरती गर्‍यांचा विषय हीटवर आलावता..मग म्हटलं, ही पाककृती प्रोफेशनली तयार करणारे श्री.मुरलीधर पंडीत यांना आपण ती इथे टाकुन त्यांनाच-प्रेझेंट करू.


आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.

लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले


कर्माचरण

लेखक: Bhagwanta Wayal | प्रसिद्ध:
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥धृ॥ जनांसंगे गेलो देवा तिर्थ यात्रेला । दगडच्या मुर्तिमध्ये तुला शोधियेला। नाही भेटलास तिथं झालो मी रे दु:खी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥१॥ उपवास केले नाना नवस सायास । लागला ना कधी देवा तुझा निजध्यास। मंदिरात जाऊनिया नाही झालो सुखी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥२॥ ऐकले मी कीर्तन कथा प्रवचन । आवरेना तरी माझे चंचळ मन । केले अवगुण ते ही चातुर्याने झाकी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥३॥ वाचले ग्रंथ पोथ्या केले पारायण । नाही कळ्ले तरी कोठे आहे नारायण। भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी । आयुष्य हे निघोनिया गेले