Welcome to misalpav.com

केरळा स्टाईल गव्हाचा हलवा

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
#केरळाफूड अ केरळ फुड सिरीज मध्ये आता पुढचा केरळी पदार्थ आहे गव्हाचा हलवा! तसं पाहिलं त्याला गव्हाची आपण बर्फी सुद्धा म्हणू शकतो कारण की हे खाताना आपण वड्या पाडून खात असतो‌. तर पाहूया याची कृती आणि साहित्य. अगदी कमीत कमी साहित्यात आपण तयार करणार आहोत.


वडोदरा,पावगढ-चंपानेर-३

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
वडोदरा,पावगढ-चंपानेर-१ https://www.misalpav.com/node/52359 वडोदरा,पावगढ-चंपानेर-२ https://www.misalpav.com/node/52364 श्री क्षेत्र गरूडेश्वर भरपुर नाष्टा झाला होता. सहलीचा पहीला दिवस, उत्साह ओसंडून वहात होता. साधी वेषभूषा,कॅमेरा,दुर्बीण,मोबाईल घेऊन खाली पार्किंगमधे आलो.चालक वाट पहात होता. संभाषणाला वाचा फोडण्या साठी मी "जय श्रीराम", म्हणालो तर उत्तरादाखल तो "जय कुबेर",म्हणाला,हाडाचा गुज्जुभाई. हसतमुख, कपाळावर गंधाचा टिळा,"छरहरी काया", पस्तीशीतला तरूण.पर्यटन करताना सर्व गुणसंपन्न चालक मिळणे हे सुद्धा खरे नशिबच म्हणले पाहीजे.


X/0 = ∞ ? !

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो


**भूत त्याचे ठार काही होत नाही**

लेखक: कानडाऊ योगेशु | प्रसिद्ध:
घोट घे रे यार काही होत नाही जीव जातो फार काही होत नाही. एकदा रक्ताळली बेधुंद झाली. म्यान ही तलवार काही होत नाही. बांधता घर एकदा कळले उन्हाला सावली मग पार काही होत नाही. भूत नसते सिध्द करण्या ठार मेला. भूत त्याचे ठार काही होत नाही. गंजलेल्या जिंदगीला धार देतो आणि मी भंगार काही होत नाही. पोरसवद्या बालिकेची माय होते. स्वस्थ ती घार काही होत नाही. एकदा तिज आपुलेसे मानले कि वेदनेचा भार काही होत नाही. +कानडाऊ योगेशु