Welcome to misalpav.com

चप्पल . .

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
चप्पलच्या दुकानातंही आत चपला काढून शिरावं लागतं . धर्म नावाचं मूल्य मनात, असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं नुसतच," हे असं कसं !? " असं म्हणून भागत नाही . एकट्यानीच जगायचं . . ?, तर मग यापेक्षा काहीच लागत नाही . पण टोळीत जगणार ना तुम्ही ? मग द्यायला हवी हमी . पत्ते आवडत नसले खेळायला, तरी जमवावी लागेल रम्मी !


साक्षीला दिवस आहे

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:
साक्षीला दिवस आहे दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो तारतम्य लागले जर हेलकावे खायला भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो - गंगाधर मुटे 'अभय' ====== बारा/आठ/चोवीस